हे प्रभाग आ.लहामटे दत्तक घेणार.! शेळकेंच्या हुकुमशहीचा कारभार संपला.! दहशत कराल तर बंदोबस्त करु.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले नगरपंचायतीत प्रभाग क्रमांक 6 (एससी) आणि 16 (एसटी) हे राखीव असून त्याच प्रवर्गाचा नगराध्यक्ष होईल. अशा प्रकारचे चिन्ह आहे. त्यामुळे, काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी यांनी त्या जागांवर आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मात्र, तरी देखील येथे प्रभाग 66 मध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी अशी लढत अपेक्षित असून 6 मध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यात अटातटीची लढत असणार आहे. त्यामुळे, ऐनवेळी जर अर्थपुर्ण तडजोडी झाल्या तर कदाचित गणिते बदलु शकतात. अन्यथा राष्ट्रवादी काँगेसचे पारडे तेथे जड असल्याचे बोलले जात आहे. तर, प्रभाग क्रमांक 5 मध्ये देखील यंदा सुप्त लाट असून तेथे सोनाली नाईकवाडी की गणेश कानवडे? हे अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी एकीकडे सिताराम पाटील गायकर व डॉ. लहामटे यांनी अंतर्गत हलचाली सुरू केल्या असून त्यांना शह देण्यासाठी स्वत: माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, कैलास वाकचौरे यांनी कंबर कसली आहे. यापलिकडे प्रभाग क्र. 17 मध्ये परसराम शेळके यांच्या हुकूमशाही पद्धतीवर डॉ.लहामटे यांनी थेट इनाम लावला असून जर शेळके यांचे डिपॉजीट जप्त केले तर तो प्रभाग आमदार दत्तक घेणार आहेत. त्यामुळे, तेथील जनतेने आमदारांना तसा शब्द दिला आहे...
खरंतर प्रभाग क्रमांक 6 चा इतिहास पाहिला तर येथे निखिल जगताप हे पाच वर्षे जीव तोडून समाजसेवा करीत होते. मात्र, दुर्दैवाने तेथे महिला आरक्षण लागले आणि त्यांनी आपल्या आईचे नाव पुढे केले. जगताप हे विखे गट की काँग्रेस, शिवसेना की भाजप अशा कोणत्या पक्षात होते की आहेत हे निच्छित नसल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला फार मोठा फाटका बसला. परंतु, या दरम्यानच्या काळात त्यांना भाजपने निमंत्रीत केले आणि हो-हो म्हणत ऐनवेळी त्यांची उमेदवारी रद्द करुन ती घोडके यांना दिली गेली. त्यामुळे, भाजपवर वैराग्य धारण केलेल्या निखिल यांनी पुन्हा राष्ट्रवादीला साथ देणे पसंत केले. आता निखिल जगताप यांच्याकडे जवळपास हक्काचे 30 ते 40 मतदान आहे. त्यामुळे, हाच फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो. तर, राष्ट्रवादीच्या उमेदवार स्वेताली घोलप ह्या मुळत: मिलिंद रुपवते यांची मुलगी आहे. तर रुपवते हे शिवसेनेचे उपशहरप्रमुख आहेत. त्यामुळे, सेना-राष्ट्रवादी युती ही देखील एक जमेची बाजु आहे. त्यापलिकडे अरुण रुपवते यांनी स्वत: या महिलेची उमेदवारी पक्षाकडे नेली होती. तेव्हा मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. त्यामुळे, वाड्यातून देखील मतांची गोळाबेरीज ही जमेची बाजु आहे.
आता एकंदर प्रभाग क्रमाक 6 मध्ये मतांची बलाबल पाहिली तर एकुण मतदान 934 असून त्यात मराठा मते 300, दलित 72, चर्मकार आणि बौद्ध 186, मुस्लिम 73, गुजर 57, घोडके 46, न्हावी, गोसावी यांच्यासह अन्य मतदान 50 ते 60 आहेत. आता यात आडनाव फार मायने ठेवणार आहे. त्यात घोडके जड भरले तरी चर्मकार आणि बौद्ध लोक तसेच मराठा समाज राष्ट्रवादीच्या पारड्यात आपली मते टाकु शकतात. कारण, येथे प्रकाश नाईकवाडी यांनी विजय घेतला होता. त्यामुळे, सिताराम पाटील गायकर हे या प्रभागात उभे राहिले तर 300 मराठा मतदानापैकी त्यांना विजय प्राप्त होईल. इतकी मते तरी ते सहज आणू शकतात. तर तेथे अमित नाईकवाडी यांची भूमिका अगदी केंद्रस्थानी असणार आहे. कारण, तेथे नाईकवाडी वसाहत आणि मित्रपरिवार याच्या जोरावर प्रभाग स्वेताली घोलप ह्या सहज विजयी होतील अशा प्रकारचे मत स्थानिक सुज्ञ विश्लेषकांनी मांडले आहे.
तर पानसरवाडी गाव दत्तक...
तर, प्रभाग क्र. 17 मध्ये आशा पानसरे यांच्या प्रचारासाठी डॉ. किरण लहामटे, सिताराम पा. गायकर, संपतराव नाईकवाडी, स्वातीताई शेणकर, सुरेश गडाख, अशोक देशमुख, ईश्वर वाकचौरे, राजेंद्र कुमकर, चंद्रभान नवले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. यातील अनेकांनी शेळके यांच्या पाच वर्षाच्या कार्यकीर्तीवर ताशेरे ओढले. गावात त्यांची हुकुमशाही चालते अशा प्रकारचे वक्तव्य स्थानिक गावकर्यांनी केले. त्यावर डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले की, येथे लोकशाही चालते. त्यामुळे, कोणी हिटलरशाहीचा अवलंब करु नये. जो कोणी करीत असेल त्याला आता घरी बसवायचे आहे. एकंदर जेव्हा नेते बोलत असताना गावकर्यांना आधार देत होते. तेव्हा, त्यांच्याकडून प्रचंड उत्स्पुर्त प्रतिक्रिया येत होत्या. त्यामुळे, अवघ्या 507 मतदारांच्या प्रभागात सभेला चांगलीच गर्दी जमली होती. कदाचित तेथे उपस्थित असणार्या प्रत्येकाने जरी मतदान केले. तरी पानसरे ह्या निवडून येतील असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. तर भाजपसाठी 17 म्हणजे आता खतरा आहे असे म्हणत या उमेदवाराच्या विजयावर मोहर लावली.
एकंदर गेल्या पाच वर्षात शेळके यांनी कामे केली नाही. असे म्हणणे चुक ठरेल. मात्र, अपेक्षित कामे झाली नाही. तर, ज्यांनी त्यांना मोठं केलं, एकमताने बिनविरोध दिले. त्यांच्यावर तावतुगारी करण्याचे काम केल्याची खंत तेथील ज्येष्ठ मंडळींनी बोलुन दाखविली. त्यामुळे, व्यक्ती पाहुन अवघे 10 देखील मतदान नसणार्या शेळके कुटुंबाला गावाने उमेदवारी दिली. मात्र, त्याच्या वाट्याला भ्रमनिरास आल्याची खंत अनेकांनी बोलुन दाखविली. तर, गावातील ज्येष्ठ व्यक्तींनी आता ठरविले आहे. की, आशा पानसरे यांना एकमताने विजयी करुन आणायचे आहे. मात्र, महिला राखीव असताना देखील शेळके यांनी मोठे मन करुन पानसरे शीट देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. यांना पदाची आणि तालुक्याच्या राजकाणाची हाव लागल्याची टिका देखील तेथे करण्यात आली. विशेष म्हणजे, या सभेला प्रचंड गर्दी असल्याने डॉ. किरण लहामटे यांनी शब्द दिला आहे. की, विरोधी उमेदवाराचे डिपॉजीट जप्त करा. मी हा प्रभाग दत्तक घेतो. त्यामुळे, आता गावाचा विकास करायचा असेल व्यक्तीप्रेम करायचे की, गाव हिरवेगाव करायचे.! हा विचार गावकर्यांनीच केला पाहिजे.
तर एकंदर राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. तर नगरविकास मंत्री देखील शिवसेनेचा आहे. त्यामुळे, येणार्या काळात अकोले तालुक्याला निधी कमी पडणार नाही. तर, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले आहे की, येत्या तीन वर्षात 50 ते 60 कोटी रुपयांचा निधी अकोले तालुक्याला दिला जाईल. त्यामुळे, काल सत्ता नाही म्हणून हेच नगरसेवक भाजपमध्ये गेले होते. आज राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे, यांना निवडून देऊन काही उपयोेग होणार नाही. त्यामुळे, राष्ट्रवादी आणि शिवसेनाच्या 13 जागा निवडून द्या. या तालुक्यात 40 वर्षे रखडलेला विकास आम्ही करु अशा प्रकारचा ठोस विश्वास सिताराम पाटील गायकर यांनी संवाद सांधताना दिला आहे. तर येथे मतांची गोळाबेरीज लक्षात घेता 507 एकुण मतदान असून पानसरे यांचे 150 मतदान आहे. त्यामुळे, आडनावाचा पहिला फायदा त्यांना होईल. यात तिळमात्र शंका नाही. तर, मुस्लिम 90, शेळके 10 ते 12, सुरसे 50, नाईकवाडी 30, हगवणे 15 ते 20 आणि आदिवासी बांधव 40 अशा प्रकारचे मतदान आहे. त्यात पानसरे यांचा मोठा वाडा असून त्यांनी संपुर्ण वाड्याने एकमताने उभे केले आहे. त्यामुळे, प्रभाग 17 मध्ये आमदार म्हणाले की, आपला उमेदवार विजयी झालाच आहे. फक्त तो लिड घेऊन त्याने विरोधकाचे डिपॉजीट जप्त करावे. असे झाले तर मी हे गाव दत्तक घेईल. खरंतर, गावच्या विकासाठी शेळके यांनी पराजय स्विकारला तर आमदार गाव दत्तक घेतील आणि पानसरवाडी राज्याच्या नव्हे देशाच्या नकाशात अजरामर होईल. मग गावाच्या विकासाचा पुळका आणणारे आता नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे....
तर, प्रभाग क्रमांक तीनमध्ये भाजप, राष्ट्रवादी आणि मनसे अशी लढाई होणार आहे. येथे १ हजार ४३ मतदान आहे. तर येथे ३३७ मतदान हे गुरव समाजाचे असून २५० मतदान आभाळे पुनर्वसन झालेले कुटुंब आहे. येथे महत्वाचे मत २४७ हे मुस्लिम मतदान आहे. तर मनकर यांचे १५ ते २० मतदान देखील नाही. त्यामुळे, येथे गुरव, आभाळे आणि मुस्लिम मतदान निर्णायक आहे. मनकर हे उमेदवाऱ असून त्यांच्याकडे स्वत:चे मतदान नाही. मात्र, यशवंत आभाळे यांची त्यांना मदत होणार आहे. तर दुसरीकडून अक्षय आभाळे यांचा मंदा पांडे यांना जाहिर पाठींबा असून त्यांचे तिकिट कापल्याची कोणतीही नाराजी त्यांनी दाखविली नाही. तर, येथील गुरव समाज हा पांडे यांच्यासोबत राहू शकतो. म्हणून तर पांडे अग्रही राहिले आहे. तर, मुस्लिम समाज भाजपला कमी माननारा आहे. त्यामुळे, येथील २५० मतांचा आकडा पांडे यांच्याकडे शत-प्रतिशत वळला जाण्याची शक्यता आहे. एकंदर मनसेचे शीट कोणाचे मतदान खाईल.! हे देखील पाहणे महत्वाचे आहे. अर्थीत मनसे भाजपचे मतदान खाऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पहायला मिळाले आहे.