ते एकमेकांचे पाय ओढून टिका करण्यात व्यस्त आहे, अशाने कारखाना बंद पडेल, राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाने पिचडांची टोलेबाजी.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात राजकारणाची पातळी अगदी खालच्या थराला गेली आहे. विरोध राहिले बाजुला आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच सत्ता आणि वर्चस्वासाठी भांडण सुरू झाले आहे. एक म्हणतो मी निवडणुक लढविणार नाही तर दुसरा म्हणतो नाही नाही तुम्हाला निवडणुक लढवावी लागणार आहे. त्यामुळे, एकाने रडल्यासारखे करायचे आणि दुसर्याने मारल्यासारखे करायचे.! तर तिसर्याने पारांपारिक दृष्ट्या फक्त एकमेकांची आयमाय काढून शब्द अपशब्दांनी आम्ही कट्टर विरोधक असल्याचे भासवायचे.! त्यामुळे, हा ड्रामा लक्षात घेता तालुक्यात चर्चेला एकच उधान आले आहे. ते असे की, पिचडांना विजयी करण्यात अनेकांनी अदृष्यरित्या मदत केली आहे. त्यामुळे, आता देखील त्यांच्या विजयाचा वटवृक्ष फुलण्यासाठी नव्याने कोणी बीजे रोवू पाहात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर, राष्ट्रवादीच्या या अंतर्गत वादात आता मा.आ. पिचड यांनी एक पोष्ट केली असून ते एकमेकांचे पाय ओढून टिका करण्यात व्यस्त आहे, अशाने कारखाना बंद पडेल अशा प्रकारचे विधान करुन जनतेला आपल्या बाजुने कौल मागितला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असणारी अंतर्गत गटबाजी आणि मतभेद याहून विरोधकांचे बाहु बळकट होऊ लागले आहेत. म्हणून तर मा.आ. पिचड यांनी आता टोलेबाजी सुरू केली आहे. ते म्हणतात की, ज्यांनी देवगावला आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरे यांची शपत घेतली. तेच आज एकमेकांच्या पायात पाय घालण्याचा प्रयत्न करीत आहे. तर विकासाचे मुद्दे सोडून टिका टिपण्णी करण्यात व्यस्त आहे. ज्या लोकांमध्ये सुसूत्रता नाही ते जर संस्थेत आले तर जास्तकाळ संस्था टिकू देणार नाहीत. हे जनतेच्या लक्षात आले असून ती यांच्या पाठीशी उभी राहणार नाही. उगच आरडाओरडा करुन तत्थ्यहिन आरोप आता केले जात आहे. अगदी खालच्या भाषेचा वापर केला जात आहे. खरंतर आम्ही देखील जशास तसे उत्तर देऊ, मात्र, ती आमची संस्कृती नाही. आजवर आम्हाला तत्वनिष्ठ राजकारणाची शिकवण मिळाली आहे असे म्हणत त्यांनी शिवराळ भाषेचा वापर करीत परिवर्तनाच्या व्यासपीठाला पुरोगामीत्वाच्या सौम्य व संस्कारक्षम भाषेत उत्तर दिले.
आता, अकोले तालुक्यात आमदारकीसाठी भागरे आणि पिचड ही दोघे दावेदार उमेदवार होते. मात्र, या दोघांच्या भांडणात तिसर्याचा लाभ (डॉ.लहमटे) होऊन गेला. त्यामुळे, कारखान्यात राष्ट्रवादीच्या दोन गटांचे भांडण आणि तिसर्याचा लाभ झाला तर नवल वाटण्याचे काहीच कारण नाही. त्यामुळे, यावर तोडगा म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेणे अपेक्षित आहे. तर, डॉ. किरण लहामटे यांनी देखील त्यांचे मत निच्छित करून त्यावर ठाम राहिले पाहिजे. तर दादांनी काही सुचविण्यापेक्षा तालुक्यात खरोखर काय परिस्थिती आहे. सभासद कोणाच्या बाजुने आहे. जनतेचा कल कोणाकडून आहे. याचा विचार करुन दादांना रिपोर्टींग करणे अपेक्षित आहे. कारण, खर्या अर्थाने ही नैतिक जबाबदारी त्यांची आहे. जर ते त्यास कसोटीने उतरले नाही. तर, नेतृत्वापर्यंत चुकीचा संदेश जाऊ शकतो. कारण, अंतर्गत गटबाजी आणि हेवेदावे वाढले की, सन 1977 सारखी परिस्थिती निर्माण होते. थोडक्यात वसंत दादा मुख्यमंत्री तर नाशिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री होतेे. त्यांच्या दोघांमध्ये इतकी गटबाजी आणि मतभेद झाले की, तेव्हा सरकार बरखास्त करुन नव्याने पुलोद सरकार स्थापन झाले होते. म्हणजे, एकमेकांचे जमले नाही तर अचानक नवा इतिहास रचला जातो, असे अभ्यासक सांगतात. त्यामुळे, डॉ. लहामटे यांनी पक्षाच्या नेतृत्वाची वाट न पाहता नेतृत्वाकडे त्यांनी जाऊन हा विषय मार्गी लावणे त्यांच्यासाठी व फार गरजेचे आहे. तर, विपक्ष परिस्थितीत त्यांनी पक्ष उभा केला तर तो संभाळ्याची कुवत देखील आपल्यात आहे. हे सिद्ध करण्याची हिच खरी वेळ आहे.
आज तालुक्यात सर्व काही ठिक होते कोठे नाहीतर राष्ट्रवादीत एक नाही एकात आणि बाप नाही लेकात अशी स्थिती उद्भवली आहे. अर्थात त्याला आमदार साहेब दोषी मुळीच नाही. अजित दादांनी दोन दगडांवर हात ठेवल्याने पक्षांतर्गत गटबाजीला बळ मिळाले आहे. त्यामुळे, आता मतभेद झालेच आहे, मनभेद होण्यापुर्वी यावर हल काढले म्हणजे बरे.! अन्यथा निवडणुकीत याचे वाईट परिणाम पहायला मिळणार आहे. आता हा सगळा पसारा सावरणे वाटते तितके सोपे नाही. कारण, तालुक्यातील सुज्ञ व तज्ञ लोक एक गोष्ट आजही बोलतात की, परिवर्तन पॅनलच्या नेत्यांना आता सत्तेचे डोहाळे लागले आहेत. त्यामुळे, आज दादांच्या नावाने राजकारण सुरू असेल तरी उद्या दादा यांना म्हणाले की, तुम्ही गप्प बसा.! तर हे नेते गप्प बसतीलच असे नाही. कारण, यातील काही व्यक्ती ह्या राष्ट्रवादी निष्ठावंत नसून केवळ सत्तेच्या लालसेपोटी एकत्र आल्या आहेत. त्यामुळे, त्यांचे राजकीय इतिहास तपासल्यानंतर पक्षनिष्ठेचा बुरखा फाडायची देखील गरज पडणार नाही, इतका तो विरलेला आहे.
आता, या सगळ्या अपशब्दांच्या परिवर्तनवादी मंचकावर डॉ. अजित नवले यांनी खंत व्यक्त केली आहे. ते म्हणाले, मार्क्सवादी पक्षाने मोदी साहेबांवर सडकून टिका केली. पण, त्यांच्या व्यक्तीगत पातवळीवर कधी टिपण्णी केली नाही. मी परिवर्तनाच्या चळवळीत नक्की सामिल होईल. मात्र, तेथे विचारांची मानसे असली पाहिजे. त्यामुळे, एक प्रकारे त्यांनी या मंचकाची कान उघडणी करुन त्यांच्यातील तुर्रमखान यांना संदेश दिला की, अशा पद्धतीने कोणाचे चारित्र्य हनन करणे योग्य नाही. या व्यासपिठावर तत्वखानाची बेरीज केली जाईल. तर तत्व सोडून स्वार्थासाठी अनेकदा पक्ष बदलणार्यांना देखील त्यांनी चांगलीच चपराख दिली. त्या निमित्तेने एकाच दगडात दोन पक्षांची शिकार झाली. ज्यांचा कोट्यावधींचा टर्नआव्हर आहे त्यांना व गायकर पाटलांना देखील त्यांनी धारेवर धरले. तर साहेबांनी आता थोड थांबून येणार्या पिढीला निवडणुकीसाठी आशिर्वाद दिले पाहिजे असे म्हणून त्यांनी पाटलांवर निशाणा साधला. यापलिकडे बी.जे.देशमुख यांच्या हुशारीचे कौतुक केले तरी त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यापेक्षा त्यांच्या सोबत काम करण्यास त्यांनी संमती दर्शविली. तर येणार्या काळात साखर संकुलनावर मोर्चात आपण सहभागी होणार नसून किसाड घाई करण्यात काय अर्थ आहे. असे मत त्यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले. एकंदर त्यांच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष लागले होते. त्यामुळे, काही अंशी त्यांचे मत त्यांनी माध्यमांपुढे मांडले.
क्रमश: भाग ४