प्रिय अजित दादा, डॉ. लहामटे कधीच चुक नव्हते.! पण पुढील तिकीटासाठी त्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र राचले होते.! राष्ट्रवादीत दोन गट कोणी केले.!



- सागर शिंदे 

  सार्वभौम (अकोले) :- 

                  अकोले तालुक्यात पिचड साहेबांचा पक्ष बदला होतो काय आणि सर्व पक्ष फिरुन आलेले तथा आज निष्ठावंत म्हणून मिरविणारे काही नेते राष्ट्रवादीत दाखल होतात काय.! आम्ही पुर्वापार पिचड विरोधक आहोत हे सांगण्यासाठी काही नेत्यांनी शब्दांची इतकी पातळी सोडली की, त्यांना असे वाटले, जाहिराती देऊन आपण हवे ते छापून आणू आणि आम्हीच कसे या तालुक्यात पात्र उमेदवार आहोत.! असा टेंभा मिरविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, राष्ट्रवादी म्हणजे, काल उदयास आलेला पक्ष नव्हे.! किंवा पवार कुटुंब म्हणजे उन्हाने म्हतारे झाले की काय.! असे काहींना वाटले असावे. परंतु, तालुक्यात दोन सभा झाल्या आणि अगदी योग्य उमेदवार अजित दादांनी तालुक्याच्या पदरात टाकला. ज्याची 1 ते दिड कोटी इनकम नसूनही सारवलेल्या घरात मांडी घालुन बसणारे डॉ. किरण लहामटे यांना जनतेच्या स्वाधिन केले. त्यामुळे अनेकांच्या दिवास्वप्नांवर पाणी फिरले आणि ही नाही तर पुढील संधी जायला नको म्हणून या तालुक्यात नकळत दोन गट पाडण्याचे यंत्रणा कोणी आखली याची माहिती निष्ठावंत आणि सामान्य कार्यकर्त्यास विचारल्यास तो अगदी डोळे झाकून सांगेल. त्यानंतर डॉ. आमदार झाले आणि राष्ट्रवादीने दिलेला उमेदवार अयोग्य कसा आहे. हे सिद्ध करण्यासाठी काही चेल्या चपाट्यांना उभारी दिली गेली. तेच लोक दादांना पत्र लिहीत होते, भेटण्यासाठी गळ घालत होते, सुप्रिया ताईंच्या भेटीगाठी घेत होते. त्यामुळे, डॉ. एकला चलो रे.! अशी भुमीका घेतात आणि स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही. अशा प्रकारचा संदेश मंत्रालय ते बारामती पर्यंत पोहचेल अशा पद्धतीने व्युव्हरचना आखण्यात आली. मात्र, प्रिय अजित दादा डॉ. किरण लहामटे हे येथील एका पक्षांतर्गत राजकारणाचे बळी ठरले होते. ते कधीच चुक नव्हते.! अशा प्रकारची माहिती, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अकोल्यातून आता देण्यात आली आहे.


सन 1952 च्या सार्वत्रिक निवडणुकांपासुन अकोले तालुक्यात काँग्रेसने पाय रोवले होते. सन 1957 (संयुक्ती महाराष्ट्र- नारायण नवाळी) व 1967 (कम्युनिस्ट- बी.के.देशमुख) वगळता येथे काँग्रेस म्हणून आदरणीय स्व.यशवंतराव भांगरे साहेब व माजी मंत्री मधुकर पिचड यांनी तालुक्यात अन्य कोणाला पाय रोवू दिले नाही. तर 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाल्यनंतर तर नाहीच नाही. त्यामुळे, येथे येणार्‍या काळात ही दोन पक्ष वगळता अन्य कोणाचा आमदार होणे सध्या तरी शक्य नाही. सन 2019 साली पिचड साहेबांनी पक्ष सोडला आणि अनेकांना आमदारकीचे डोहाळे फुटले. पण, नेहमी हाता तोंडाशी आलेला घास जाणार्‍यांच्या पदरी त्या वर्षी देखील तेच नशिबी आले. तर, डॉक्टरांना त्यांचे पुण्य कामी आले. मात्र, त्यांचे यश आणि स्वप्नात नसताना देखील भलताच माणूस आमदार झाला.! हे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना पहावेल कसे? त्यामुळे, त्यांना बदनाम करण्यासाठी राष्ट्रवादी पक्षातच दोन गट निर्माण झाले. सन 2019 ते 21 या दोन वर्षाच्या काळात डॉ. लहामटे यांना तालुका, प्रशासन, नेते आणि कार्यकर्ते यांना समजून घेण्यात वेळ गेला. यात त्यांच्या स्वाभावात काही दोष होते हे नाकारुन चालणार नाही. मात्र, त्यांच्याकडून चुका होतील कशा आणि त्याची प्रसिद्धी होऊन ती माहिती बारामतीपर्यंत पोहचेल कशी.! या पद्धतीने यंत्रणा काम करीत होती. म्हणून तर सन 2021 च्या सुरुवातीपर्यंत डॉक्टरांचे गार्‍हाणे मंत्रालयापर्यंत पोहचत होते. आज मात्र त्यांच्यात प्रचंड राजकीय प्रगल्भता आली आहे.

खरंतर, नव्याने आमदार झालेल्या डॉक्टांना त्यांच्याच नेत्यांनी बदनाम करण्याचा डाव रचला. कोरोनाच्या काळात स्वत: पॉझिटीव्ह झाले तरी पायाला भिंगरी बांधुन फिरणार्‍या आमदारांनी काय केले? असे प्रश्न उपस्थित करणारे घरात बसून उंटाहून शेळ्या वळीत होते. आज कोरोना गेल्यानंतर त्यांना जनतेची आठवण आली आणि आमदारांच्या व पक्षाच्या नेत्यांना सोडून पुन्हा आमदारांच्या विरोधात गरळ ओकण्याचे काम सुरू केले आहे. हे नेते कोण? आता हे नव्याने सांगायची गरज नाही. त्यामुळे, 1 कोटीचा टर्नओव्हर करणारे कोरोनाच्या काळात तालुक्यातील जनतेसाठी का धावून आले नाहीत? कारखान्याचे 11 कर्मचारी मयत झाले, अनेक उस उत्पादक मयत झाले. तेव्हा हे परिवर्तनवादी काय करीत होते? त्यामुळे, वारे पाहून राजकारण उपननार्‍यांच्या धुर्त पणाचे मुल्यमापन आता जनतेनेच केले पाहिजे. की ज्यांना निवडणुका आल्यानंतर जनतेचा आणि सभासदांच्या हिताचा पुळका यायला लागला आहे.! जोवर आमदार साहेब यांच्या सोबत होते. तोवर यांना फार गोड-गोड वाटत होते. आता त्यांनी धुर्त बाजुला केले असता त्यांच्या नावाची गरळ ओकणे सुरू केले आहे. कारण, डॉक्टर जितके मोठे होतील आणि त्यांचा गोतावळा वाढेल, तितका त्रास 2024 च्या विधानसभा तिकीटासाठी व निवडणुकीत होणार आहे. हे अनेकांचे मनसुबे डॉक्टर ओळखु शकले नाही.! तर त्यांनी 02 वर्षात काय जिंकले? त्याचेच हे द्योतक आहे.

खरंतर अजित दादांना शिकवावं इतके पवार साहेब वगळता राज्यात मोठे कोणी नाही. परंतु, अकोल्यातील सहकाराबाबत त्यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली पाहिजे. एकीकडे देशमुख यांना लक्ष घाला म्हणायचे आणि दुसरीकडे गायकर साहेबांना पिचड साहेबांच्या पराभवासाठी पुढे करायचे.! या संदिग्ध भुमीकेमुळे पिचड साहेब राहिले बाजुला आणि राष्ट्रवादीचे नेतेच एकमेकांना भिडले आहेत. त्यामुळे, पक्ष उभा राहतोय की पडतोय हेच कळायला तयार नाही. त्यामुळे, आमदार साहेब देखील प्रचंड संदिग्ध स्थितीत असून त्यांना जी बाजु योग्य वाटली ते त्या दिशेने मार्गस्त झाले. तर, खरंतर त्यांनी अनेकदा मध्यस्ती करुन पाहिली. बैठका झाल्या, त्यात नेत्यांनी सांगितले आमचे मतभेद दुर झाले, आता आम्ही काही बोलणार नाही. मात्र, वळवाचा पाऊस कधी शांत बसतोय का? त्यामुळे, सगळ्या मध्यस्ती, फायफळ बैठका, वाजविलेले तोंड, हे सगर्ळ निरर्थक ठरलं. कारण, ज्यांनी झोपेचं सोंग आणले, त्यांना जागे करता येते का? अशी एक म्हण आहे. तसेच अकोल्याच्या राजकारणात पहायला मिळाले आहे. त्यामुळे, आता तरी अजित दादांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे.

खरंतर, विरोधक म्हणून काही नेते नुकतेच शिव्या शाप देत सुटले आहेत. समोरच्यांचे उणेधुणे करण्यापेक्षा आम्ही कारखाना निल कसा करु, एफआरपी बाबत निर्णय, कामगारांचे पगार, इथेनॉल प्रकल्प, तोडई कामगार, घसारा, साखर उत्पादन व विक्रीसह अन्य उत्पादने कशा पद्धतीने चालविली जातील, शेतकर्‍यांचा उस कसा आणला जाईल, गेटकेन बाबत भुमीका असे अनेक प्रश्न मांडण्यापेक्षा कारखाना बदनाम करुन सभासद कसे आहेत आणि ते काय करतात हे सांगण्यात आपला वेळ वाया घालवत आहेत. संदिग्ध आकडेवारी सांगुन दिशाभुल करणे आणि रेटून बोलत पेटून देण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या या बोलण्याने सभासद त्यांनाच नावे ठेवतं आहे. हे त्यांना सांगणारं कोणी नसले तरी किमान त्यांच्यातील शाहण्या सुरत्यांनी तरी ते समजून घेतले पाहिजे. आता, अपशब्दांच्या या व्यासपिठावर तत्वाने वागणारे डॉ. अजित नवले, विजय वाकचौरे यांच्यासह अन्य संवेदनशिल व तात्वनिष्ठ लोक खरोखर जातील का? ज्यांनी हे मेळावे घेण्यासाठी उद्युक्त केले. ते दोन दगडांवर हात ठेवणारे नाईकावाडी महोदय त्यांच्यात का दिसत नाही. आमदार साहेब त्यांच्या बैठकांना का नाही? मेळाव्यांत पाच पंन्नास लोकं, त्यात चार-आठ सभासद त्यात मालुंजकरांसारख्या काहींची हतबलता.! त्यामुळे, यांनी खरोखर आत्मचिंतन करण्याची गरज आहे. कारण, कोणाला शिव्याशाप देऊन आणि इज्जती चव्हाट्यावर मांडून कधी सत्ता मिळत नाही. हे आजवर पराभूत झालेल्यांना सांगणार तरी कोण? 

खरंतर, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. मात्र, त्यांना चंद रुपयांची जाहिरात दिली की, लाखभरात त्यांना विकत घेता येते अशा प्रकारची अनेकांची समज आहे. तर जाहिरात दिल्यानंतर आपण एखाद्यावर उपकार करतो आहे. असे देखील अनेकांना वाटते. मात्र, त्या जाहिरात आणि पैशांच्या मोबदल्यात पत्रकार देखील त्यांना प्रचंड मोठी प्रसिद्धी देतो. हे काही लोक विसरून जातात. अशा प्रकारचे अकोले तालुक्यात काही लोक आहेत. मात्र, या धनदांडग्यांच्या गुर्मीला सन 2019 मध्ये जनतेने चांगलाच धडा शिकविला. म्हणजे, आपला 1 कोटीचा टर्नओव्हर आहे असे म्हणणार्‍यांना देखील जनतेने चपराख दिली आणि डॉक्टरांच्या पाठीशी जनात उभी राहिली. त्यामुळे, आरडाओरड आणि पैशाच्या जोरावर काही होत नाही. हे समजण्याइतपत शहणपण तालुक्याच्या काही राजकारण्यांना येवोत हीच इच्छा.! 

क्रमश: भाग 3