पिचडांना पुन्हा एकटे पाडण्यासाठी डॉ. लहमटेंचा राष्ट्रवादी पॅटर्न.! सावंत व बी.जे. देशमुखांवर आरोप.!
सार्वभौम (अकोले):-
राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून ज्यांनी ज्यांनी वेगळे बस्तान बांधले. त्यांचे-त्यांचे राजकारण संपविण्याचा विडा अजित दादांनी उचलला आहे. म्हणून तर श्रीगोंद्याच्या आमदारांना त्यांनी कधी नव्हे. पण तेव्हा पराभवाची धुळ चारली होती. त्यानंतर दादांचा मोर्चा अकोल्याकडे वळाला आणि पिचडांचे देखील तेच केले. आता दादांच्या पाऊलावर आ. डॉ. किरण लहामटे यांनी पाऊल टाकले आहे. कारण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा पिचड कुटुंबाला एकटे पाडून सत्ताहीन करण्याचा विडा आमदारांनी उचलल्याचे दिसते आहे. म्हणून तर पिचडांचे सर्वच समर्थक विरोधी झेंड्याखाली आणून त्यांना एकटे पाडायचे. अशी व्युव्हरचना आखण्याचे काम सध्या सुरू आहे. जिल्हाबँकेनंतर आता कारखाना आणि नंतर झेडपी व नगरपंचायत असा सत्तासंघर्ष येणार्या काळात उभा राहणार आहे. बी.जे. देशमुख आणि दशरथ सावंत यांच्या रुपाने ही व्युव्हरचना अधिक बळकट झाल्याचे पहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे या सर्वांचा फायदा येणार्या काळात डॉ. लहामटे यांना पुन्हा आमदार होण्यासाठी होणार आहे. कारण, त्यांच्या अशा रणनितीने ते यशस्वी होणार आहेत. व आमदारकीचे स्वप्न पहाणार्यांची झोप मोडल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, डॉक्टरांनी पायाला भिंगरी बांधून नक्की पळावं. पण, त्या पळण्याला नियोजन, रणनिती व गणिमी काव्यांची जोड देखील द्यावी. असे त्यांच्या समर्थकांना वाटते.
खरंतर, 2019 ची विधानसभा झाली आणि तालुक्याचे राजकीय चित्रच बदलुन गेले. डॉ. लहामटे यांना गेली काही दिवस जनतेने नावे ठेवली. मात्र, त्याच्या सरळ स्वभावाचे रुपांतर राजकीय प्रगल्भतेत येण्यासाठी काही काळ अपेक्षित होता. तो आता येऊ लागला आहे. कारण, कोणाला जवळ करावे आणि कोणाला नाही, कोणाचे एकावे आणि कोणाचे नाही याचे भान त्यांना येऊ लागले आहे. तर राजकारणात प्रबळ विरोधकांचे राजकारण संपवायचे असेल तर त्याच्या समर्थकांना जवळ करुन विश्वास दिला पाहिजे. जर ते पुन्हा आपल्या पक्षात येऊन आपल्या चुका सुधारत असतील तर त्यांना अभय दिला पाहिजे. कारण, त्यांच्या येण्याने विरोधकांचे बाहु निखळून कमजोर होणार आहेत. हिच शरदचंद्र पवार साहेब व अजित दादा यांची रणनिती आहे. त्यामुळे, भाजपमधून बाहेर पडलेल्या डॉ. लहामटे यांनी त्यांच्या तालमित प्रवेश केल्यानंतर किमान हे डावपेच तरी शिकले पाहिजे. हीच डॉक्टर प्रेमींची अपेक्षा आहे.
आता, गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात अगस्ति सहकारी साखर कारखान्याचा राजकीय बॉयलर पेटला आहे. त्यात उत्तम प्रशासक बी.जे.देशमुख आणि ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी विरोधकाची भूमिका बजावली होती. त्यामुळे, कारखान्याच्या बॉयरलमधून वेगवेगळ्या चर्चेचे लोळ बाहेर पडत होते. विशेष म्हणजे, बी.जे.देशमुख हे माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या देखील संपर्कात होते. तर त्यांच्या सुगाव नर्सरीच्या ठिकाणी बैठका देखील होत होत्या. त्या पलिकडे ते डॉ. किरण लहामटे यांच्या देखील संपर्कात होते. त्यांच्यासोबत डॉयलॉग देखील होत होते. तर सिताराम पाटील गायकर हे त्यांना मनविण्यात आणि कारखाना वाचला पाहिजे, बाहेर चुकीचा मेसेज गेला नाही पाहिजे. यासाठी प्रयत्न करीत होते. मात्र, बी.जे. देशमुख यांचे शहानपण (अनुभव) त्यांना शांत बसून देत नव्हते. त्यामुळे, त्यांनी शेतकरी ते थेट दादा अशा प्रकारे प्रचार यात्रा सुरू केली. त्यांनी स्वत:चे अस्थित्व दाखवून दिले आणि आता अॅक्शन प्लॅनवर त्यांनी शांतता स्विकारली. त्यामुळे, तुर्तास त्यांनी बोलताना हाताची घडी आणि तोंडावर बोट.! अशीच भूमिका स्विकारली आहे. मात्र, तरी देखील ते कारखान्यात राहुन सर्व यंत्रणा जाणुन घेतील आणि येणार्या काळात बंड पुकारणार नाही. असे म्हणणे धाडसाचे ठरले. तरी, त्यांच्या या भूमिकेबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.
आता राज्यातील ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी नेहमी शेतकर्यांच्या हितासाठी निर्णय घेतले आहेत. तुम्ही काहीही करा, पण एफआरपीपेक्षा जास्त रक्कम शेतकर्यांना द्या.! ही त्यांचीच भुमिका होती. ती कारखान्याने मान्य देखील केली. अर्थात कारखान्यावर काही अंशी कर्ज झाले तरी चालेल. परंतु, अशक्य असताना तत्कालिन संचालक मंडळाने त्यांचा आदर करुन ती मागणी मान्य केली होती. आज, सावंत साहेबांनी जर विद्यमान संचालकांच्या कार्यपद्धतीवर अविश्वास व्यक्त केली तरी तो येणार्या राजकारणावर परिणाम करणारा ठरेल. त्यांना अपेक्षित असे काही घडले नाही. तर उद्या येणार्या निवडणुकीत ते पिचडांना मदत करण्यास मागेपुढे पाहणार नाही. कारण, पिचड 1995 साली अडचणीत असताना गायकर साहेबांसह अनेकजण त्यांना सोडून गेले होते. मात्र, सावंत साहेब त्यांच्या पाठीशी भक्कम उभे असल्याचा इतिहास सांगतो. त्यानंतर त्यांनी कायम विरोधात राजकारण केल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे, उद्याच्या निवडणुकीत पिचड अडचणीत असणार आहे. तेव्हा, अचानक त्यांना पाठबळ देण्यासाठी कोण-कोण धावून जाईल. याची शाश्वती नाही.
आता एकंतर अकोल्यात पिचडांना अधिक एकटे पाडायचे असेल तर दादा काय सुचना देतात, हे सर्वात महत्वाचे ठरणार आहे. जर वाटाघाटी न करता एक हाती सत्ता राष्ट्रवादीला हवी असेल, जिल्हा बँकेप्रमाणे पिचड साहेब माघार घेणार नाहीत. जर सगळीकडे अस्तित्व नष्ट करण्याची इच्छा राष्ट्रवादीची असेल तर कारखान्यात समोरासमोर लढाई होईल. या सगळ्यात डॉ. किरण लहामटे व सिताराम पाटील गायकर साहेब यांची भूमिका महत्वाची असणार आहे. त्यामुळे, येणार्या काळात निवडणुका लागल्याच तर तिरट जुगारात जशी आर.आर गेम करुन ठेवली जाते आणि एक पत्ता आला की डाव जिंकला जातो. तशा प्रकारची रचना लहमटे व गायकर पाटील करुन ठेवत आहे. हेच संघटन येणार्या काळात त्यांना लाभदायक ठरेल असे अनेकांना वाटते आहे.
आता, देशमुख आणि सावंत साहेब यांनी जी भूमिका घेतली. त्यावर दिपक वैद्य यांनी अक्षेप घेतला आहे. ही दोघे म्हणजे सुकाणू समिती आहे का? यांनी काय तडजोडी केल्या? यांची स्थाने निच्छीत केली की काय? काल शेतकर्यांना कारखाना समजून सांगत असणारे आज काहीच कसे बोलत नाही? कर्ज कर्ज म्हणून ओरडत असताना आता म्हणतात आमचे गौरसमज दुर झाले आहेत. त्यामुळे, एकीकडे दिलजमाई झाली तरी. दुसरीकडे त्यांना ठिकेला देखील सामोरे जावे लागत आहे. आता येणार्या काळात सुकाणू समिती निवडकांमध्ये देखील समायोजनाची भूमिका घेईल अशी अपेक्षा करुयात. तर, आज सत्तेत नसणारे देशमुख हे उद्या सत्तेत आले तर त्यांनी संचालक मंडळाला व प्रशासनाला पळता भुई थोडी केली नाही म्हणजे बरे.! कारण, ज्ञान कधी शांत बसत नाही. त्याचा परिणाम चालु गाडीची कानखीळ काढल्यासारखे होऊ नये.! असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.