जीचं दुध घेता, तिचच मुत पिता.! पण लक्षात ठेवा, बाबरीवर चढू शकतो तर कत्तलखान्यावर देखील हल्ले करु शकतो.! डिवायएसपी व पीआयचे निलंबित करा.!

 

- सुशांत पावसे

सार्वभौम (संगमनेर) :- 

                       संगमनेर शहरातील पोलीस उपाधिक्षक राहुल मदने हे सुट्टीवर जाताच काल (दि.3) श्रीरामपुरचे पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांनी कत्तलखान्यावर छापा टाकून १ कोटी ५० लाख ५० हजार ५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता. त्यात जिवंत 71 तर नुकतीच मुंडके कापून मारुन टाकलेली 30 पेक्षा जास्त जनावरे असे ह्रदयद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि हिंदुत्ववादी संघटनांसह संगमनेरकरांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. त्यानंतर आज (दि.4) सर्व संघटना एकवटल्या आणि त्यांनी पोलीस व नगरपालिकेच्या विरोधात बंड पुुकारला. पोलीस निरिक्षक मुकुंद देशमुख व पोलीस उपाधिक्षक राहुल मदने यांचे तत्काळ  निलंबन करुन त्यांना बडतर्फ करावे अशी मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांच्या भावना इतक्या तिव्र होत्या. की, आक्रोशापोटी त्यांच्या तोंडातून शिविगाळ आणि अपशब्दांचा  वापर होत होता. वेळ आली तेव्हा आम्ही बाबरीवर चढून हल्ला केला होता. आता गोरक्षणासाठी आम्ही कत्तलखान्यांवर हल्ले करु. असे म्हणत त्यांनी पोलिस व नगरपालिकेला धमकी वजा सुचना केली. दहा तास चाललेल्या आंदोलनात अनेकांना प्रक्षोभित भाषणे करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, पोलीस निरीक्षक देशमुख यांच्याकडे निवेदन देण्यास आंदोलकांना नकार दिला. ज्यांच्यावर कारवाई हवी, त्यांनाच आम्ही निवेदन का द्यायचे? असे म्हणत जमावाने आपला रोष व्यक्त केला. जे कोणी अधिकारी किंवा कर्मचारी या कत्तलखान्यांचे मलिदे खात असतील, अशांना संबोधून आंदोलक म्हणाले की, जीचं दुध पिता, तिचच मुत पिता.! त्यानंतर एकच जयघोष करुन मलिदा खाणाऱ्यांचा निषेध करण्यात आला.

         काय निघाला तोडगा.!

अखेर 10 तास भर उन्हात व भर पावसात बसल्याच्या प्रतिक्षेनंतर संगमनेरकांच्या आंदोलनाला यश आले आहे. आता म्हणजे आज रात्री (दि. 4) रोजी संबंधित पाच कत्तलखाने सिल करण्यात येणार असून दोन दिवसानंतर त्यावर हथोडा (उध्वस्त) मारण्याचे लेखी आश्वासन नगरपलिका प्रशासनाने दिले आहे. तर संगमनेर पोलीस ठाण्याचे इन्चार्ज मुकुंद देशमुख व डिवायएसपी राहुल मदने यांच्यावर येणाऱ्या सात दिवसात उचित कारवाई करण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे यांनी लेखी दिले आहे.  त्यामुळे, श्रीराम गणपुले वकील यांच्यासह सर्व संगमनेरकर व गो प्रेमींच्या आंदोलनास मोठे यश आले आहे. तर, प्रशासनाने या अश्वासनास मुकू नये अन्यथा तिव्र आंदोलन करु असे आदोलकांनी सुनावले आहे. आता सात दिवसात काय घडामोडी होतात आणि कोण कोणाला आभय देते. याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. या आंदोलनात प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी मध्यस्ती केली.

                  संगमनेरमध्ये गोहत्याबंदीबाबत आज सोमवार दि. 4 ऑक्टोबर रोजी सर्व हिंदुत्ववादी संघटना एकत्र येत सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरवात केली. विविध मागण्या घेऊन आंदोलन कर्त्यांनी प्रांत कार्यल्यापुढे ठिय्या आंदोलन केले. यावेळी आंदोलन करते म्हणाले की, 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी गोमातेच्या ज्या कत्तली केल्या व अवैधरित्या कत्तल खाणे चालुच राहिले ते स्थानिक प्रशासनाने व नगरपालिकेने जाणूनबुजून आजपर्यंत चालूच ठेवले. मात्र, लॉकडाऊनच्या काळात जे गोरगरीब जनतेवर व छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांवर याच नगरपालिकेने कारवाई केली. पाच-पाच हजार रुपये दंड केले. पण, येवढी मोठी कारवाई झाली तेव्हा हेच कत्तलखाणे, लॉकडाऊनमध्ये रात्र दिवस चालु होते. आता हे अवैध धंदे बंद करा आणि भोंगे देखील बंद करा असे आंदोलन करते भाषणात बोले. ते पुढे म्हणाले की, हे अवैध कत्तलखाणे चालतात यांना आशीर्वाद कुणाचा आहे. त्यामुळे, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यावर देखील निलंबनाच्या कारवाईची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

      संगमनेरमध्ये मटका, गुटखा, गांजा यांचा मलिदा खाणारे अधिकारी पाहिले. परंतु गोमांसात देखील मलिदा  खात असतील तर संगमनेरकर गप्प बसणार नाही. येथे अधिकारी बाहेरून येतात, दोन वर्षे थांबतात बुद्धी भेद करतात आपल्या-आपल्यात भांडणे लावतात आणि पाकिटे घेऊन निघुन जातात. अशी टीका आंदोलनं कर्त्यांनी स्थानिक प्रशासनावर केली आहे. संगमनेर शहरात आता अनुचित प्रकार वाढत चालले आहे. लव जिहाद सारखे प्रकरणे देखील वाढताना दिसत आहे. दिल्लीनाक्या सारख्या परिसरात पोलिसांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे संगमनेर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न वारंवार ऐरणीवर येताना दिसत आहे. यावेळी, संगमनेरची गो हत्या बंद झालीच पाहिजे, "आजच तोडा आजच तोडा, कत्तलखाने आजच तोडा. अश्या घोषणा देत हिंदुत्ववादी संघटनांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी उपस्थित श्रीराम गणपुले, अप्पा केसेकर, अविनाश थोरात, अमोल खताळ, ज्ञानेश्वर कर्पे, श्रोगोपाल पडतानी, भगवान गीते, कुलदीप ठाकुर, राजाभाऊ देशमुख, शिरीष मुळे, योगराजसिंग परदेशी, ज्ञानेश्वर थोरात, रोहित चौधरी, राहुल भोईर, वरद बागुल, शाम कोळपकर, साहेबराव वलवे, सचिन कानकाटे,किशोर गुप्ता आदी. उपस्थित होते.

नेमकी काय झालं.!

अवैध कत्तलखाने आणि वाडे हे पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश आहेत. ते पाडून पुन्हा उभारणी झाली. त्यावर प्रशासन काहीच बोलत नाही. त्यामुळे, ते पाडण्याचे आदेश आता काढून त्याची प्रत आम्हाला द्यावी. दोन दिवसात ही कारवाई केली पाहिजे. अशा प्रकारचे लेखी आदेश मिळाल्यास आंदोलन थांबविले जाईल. मात्र, प्रशासन काही तृट्या ठेऊन पळवाटा काढत लेखी आश्वासने देत होते. त्यामुळे, आम्हाला गुळगुळीत उत्तरे देऊ नका. आम्ही काही मुर्ख नाहीत. त्यानंतर अधिकारी निघुन गेले. त्यानंतर सीओ आल्यानंतर त्यांना कारवाईसाठी पहिल्यांदा पाच, दुसर्यांदा तीन तर चौथ्यांदा दोन दिवसांचा आवधी मागितला होता. मात्र, उद्या (दि.5) रोजी सकाळी 7 वाजता कत्तलखाण्यांवर हाथोडा पडलाच पाहिजे. या मागणीवर आंदोलक कायम राहिले. शेतकऱ्यांचा भाजीपाला उचलायला तुम्हाला पाच मिनिट लागतात मग कत्तलखाने जमिनदोस्त करायला कशाला हवेत चार-पाच दिवस? असे म्हणताच प्रशासनाने आदोलकांपुढे नि:शब्द होऊन निघुन गेले. त्यामुळे, प्रशासनाचा घो करीत घोषणाबाजी करण्यात आली. तर, पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत आंदोलकांनी विचारणा केली असता प्रशासन म्हणाले की, त्यांचा अहवाल अप्पर पोलीस अधिक्षक यांच्याकडून आल्यानंतर अधिकारी व अन्य व्यक्तींवर कारवाई होणार आहे. दरम्यान, संगमनेरात होणारी कत्तल पाहिली तर राज्यातून आम्हाला फोन येत आहे. आम्हाला सांगायला लाज वाटत आहे की, होय.! हे आमच्याच तालुक्यातील आहे. मग तुम्हाला तुमच्याच कार्यस्थळी असे हत्याकांड पाहून लाज वाटत नाही का? असा संतप्त सवाल एका आंदोलकाने केला. त्यावर मात्र अधिकारी निरुत्तर झाले..!

दरम्यान संगमनेरमध्ये निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे, हा विषय केवळ कत्तलखाण्याच्या विरोधातच राहिला नसून त्याआडून येथील प्रस्तापित यंत्रणेला वेठीस धरत त्यांच्या कारभारवर बोट ठेवण्याचे काम देखील या माध्यमातून होत असल्याचे बोलले जात आहे. कत्तलखाने कोण चालवितात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्यामुळे, हा सबंध समाज एकगठ्ठा मतदार म्हणून केद्रातील विरोधी पक्षाने नेहमीच जोपासला आहे. त्याचेच प्रतिबिंब संगमनेरात दिसून येत आहे. त्यामुळे, येथे कत्तलखाने चालणे हे प्रशासनाच्या माथी मरण्यात काय अर्थ आहे? एकीकडून राजकारण आणि दुसरीकडून धार्मिक व सामाजिक दबाव यात प्रशासन चेंबले आहे. अन्यथा वरिष्ठांनी आदेश दिले तर पोलीस काय करु शकतात हे संदिप मिटके यांनी दाखवून दिले आहेत. कत्तलखान्यांना राजकीय पाठबळ असल्यामुळे प्रशासन त्यांना काय सुखासुखी खाऊन देणार आहे काय? छे.! त्यामुळेच तर कोणा-कोणाला किती मलिदा दिला जातो. हे एका डायरीत मिळून आले आहे. 

आता, जमजम कॉलनीत पोलिसांनी तसे अनेक छापे टाकलेले आहेत. तरी देखील हे कत्तलखाने सुरुतच होते. या सर्व प्रकाराला केवळ पोलीस जबाबदार आहे.! असे म्हणणे चुकीचे आहे. कारण, नगरपालिकेची देखील तितकीच जबाबदारी आहे. हे जे भलेभले वाडे उभे आहेत. ते खरोखर वैध आहेत का? नसेल तर यांना परवानगी कोणी दिली? आणि अवैध असेल तर त्यावर हथोडा का टाकत नाही? याचे उत्तर कोण देणार आहे? यापलिकडे या अवैध कत्तलखाण्यांना परवानगी नाहीच, तर मग यांना विज पुरवठा होतो तरी कसा? यांना पाणी पुरवठा कोणाच्या सांगण्याहून होतो? यांची घरपट्टी, पाणीपट्टी घेऊन प्रशासन अशा धंद्यांना पाठीशी घालतय का? असा ही प्रश्न सुज्ञ व्यक्तींनी उपस्थित केला आहे. आता, सर्वात मोठी जबाबदारी ही नगरपालिकेची आहे. मात्र, दुर्दैवाने येथे स्वच्छता पुरस्कार मिळतात आणि त्याच संगमनेरच्या प्रवरामाईत खुलेआम मांस टाकले जाते. रक्तमिश्रीत टाकाऊ पदार्थ टाकले जातात.  त्याचे पर्कुलेशन होऊन ते सार्वजानिक विहिरींमध्ये जाते आणि तेच पाणी लोक पीत असल्याचे समोर आले होते. मात्र, तेव्हा प्रवरामाई रक्ताळला या मथळ्याखाली रोखठोक सार्वभौमने वृत्तांकन केले आणि पोलिस व नगरपालिकेने त्याची दखल घेत ते मांस उचलुन त्याची विल्हेवाट लावली होती. म्हणजे, इतका निर्लज्ज व बेजबाबदार लोक देखील संगमनेरात आहेत. हे फार दुर्दैव आहे.