ऑम्लेटवाल्या बाईंवर बार चालकाचा डोळा.! म्हणे हवे तितके पैसे देतो फक्त प्रेम कर.! मिठी मारल्याने ठोकल्या बेड्या.!
तु मला फार आवडतेस असे म्हणून एका बार चालकाने आम्लेटपाव विकणार्या महिलेच्या घरात जाऊन तिला मिठी मारली. ही घृणास्पद घटना अहिंसेचा संदेश देणार्या महात्मा गांधी जयंतीदिनी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. पीडित महिलेपेक्षा लहान असलेल्या या आरोपीने तिला पैशांचे आमिष देत प्रेम करण्यास उद्युक्त केले. मात्र, गरिब असली तरी आपले चारित्र्य जपणार्या पीडितेने त्यास विरोध करीत थेट पोलीस ठाणे गाठले आणि अवदुत काशिनाथ घोडके (रा. गुजरी मार्केट, ता. अकोले) याच्यावर छेडछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी घोडके यास अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाहुनगर परिसरात एका 31 वर्षीय महिलेचा आम्लेटपाव विक्रीचा व्यवसाय आहे. पीडितेचे पती अडिच वर्षापुर्वी मयत झाल्यामुळे कुटूंब उघड्यावर पडण्याच्या परिस्थितीत असताना या महिलेने स्वत: उभे राहण्याचा प्रयत्न केला. पतीच्या पश्चात दोन मुलांची जबाबदारी खंद्यावर पेलण्यासाठी एक उपजिविका म्हणून हा सर्व उपद्याप सुरू होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोपी अवदूत हा त्यांच्याकडे कारणा निमित्त ये-जा करीत होता. त्यामुळे, त्याच्या मनात असे काही असेल, अशी पडित महिलेला वाटले देखील नव्हाते. मात्र, त्या दिवशी अचानक त्याच्याकडून हल्ला झाला.
शनिवार दि. 2 ऑगस्ट 2021 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास पीडित महिला तिच्या घरात टिव्ही पाहत बसली होती. तर, दुसर्या घरात एक मुलगा अभ्यास करत होता. तेव्हा अवदुत घोडके हा अचानक घरात आला. पीडित महिलेने विचारले की, तु येथे काय करतो आहे? तेव्हा तो म्हणाला की, तु मला फार आवडतेस असे म्हणून त्याने महिलेस मिठी मारून कवेत घेत अश्लिल चाळे सुरू केले. तेव्हा पीडित महिलेने त्यास तत्काळ प्रतिकार करीत त्याच्या हाताची मिठी सोडविली आणि आरडाओरड सुरु केला. या झटापडीत त्याच्या हाताची नखे तिला लागली तर हाताला मार देखील लागला आहे.
दरम्यान, त्याचा असला अश्लिलपणा पाहून पीडित महिला घाबरुन गेली. तिच्या आरडण्याने दुसर्या खोलीत अभ्यास करणारा मुलगा बाहेर आला असता घोडनेने त्यास बाहेर काढून देण्यास सांगितले. यावेळी घरात एकच गोंधळ उडाल्याने घोडकेने तेथून काढता पाय घेतला. जाता-जाता त्याने दम दिला की, जर घडलेला प्रकार कोणाला सांगशील तर तुझ्याकडे बघुन घेईल. त्यानंतर पीडित महिलेने त्यांच्या जवळच राहणार्या एका महिलेस जवळ करीत त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. त्या महिलेने काही सामाजिक कार्यकत्यांना फोन करून घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर काही कार्यकर्ते पोलीस ठाण्यात आले असता सहायक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे यांची भेट घेतली. जे काही असेल ते कायदेशीर करीत त्यांनी गुन्हा दाखल केला. तर आरोपीस अटक देखील करण्यात आली आहे.
दरम्यान, धनदांडग्या व्यक्तींकडून सामान्य गोरगरिब व्यक्तींना नेमहीच टारगेट केल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहायला मिळते. कोठे ऑफिसमध्ये महिलांचे सोशन होते तर कोठे उद्योगधंद्यांच्या ठिकाणी. मात्र, त्यावर आवाज उठविता येत नाही. त्यामुळे, होणारा अन्याय निमुटपणे सहन करावा लागतो. या अपरोक्त अनेकांचे सोशन होते. मात्र, पैसा फेकून त्यावर पडदा टाकण्याचे काम केले जाते. त्यामुळे, जर अशा प्रकारे काही महिला निर्भिडपणे पुढे आल्या तर त्यांच्यावर होणार्या अन्यायला न्याय मिळण्यास मदत होईल. तर अशा प्रकारचे गुन्हे वारंवार होणार नाहीत.