बाप रे.! 32 टन मटन, अबबब.! 71 जणावरांना जिवदान.! चौघांवर गुन्हे.! राज्यात भारी, संगमनेरची दस नंबरी.!
सार्वभौम (संगमनेर):-
नगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील जमजम कॉलनी येथे चालणार्या कत्तलखान्यावर पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके (श्रीरामपूर विभाग) यांच्या पथकाने छापा टाकला आहे. यात तब्बल 71 जणावरे व 32 हजार टन कापलेले मांस आणि अन्य साहित्य असा एकूण 1 कोटी 4 लाख 50 हजार 50 रुपयांचा मुद्देमाला हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार दि. 2 रोजी रात्री 9 वाजेपासून ते रविवार दि. 3 रोजी दुपारी 1 वाजपर्यंत चालु होती. तब्बल 16 तास चाललेल्या कारवाईत पोलिसांनी अथक परिश्रम घेत कत्तलखाने चालविण्यार्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. विशेष म्हणजे संगमनेर विभागाचे पोलीस उपाधिक्षक राहुल मदने सुट्टीवर गेल्यानंतर ही कारवाई झाली असून त्यामुळे, काही दिवसांपुर्वी गुटखा प्रकरणात चर्चेत असलेले मदने पुन्हा गोमांस प्रकरणात चर्चेत आले आहेत. तर, रोज कोट्यावधी रुपयांची उलाढाल कत्तलखान्यांतून चालते तरी देखील येथे तत्कालिन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्यानंतर कारवाई झाली नाही. याची देखील गोरक्षकांनी खंत व्यक्त केली आहे. आता याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई येथील गोरक्षक यतींद्र जैन यांना संगमनेरातील या कत्तलखान्याबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी स्थानिक पोलिसांवर अविश्वास दाखवून थेट जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्याशी संपर्क साधला होता. पाटील यांनी श्रीरामपुरचे पोलीस उपाधिक्षक संदिप मिटके यांना संदर ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले होते. संदिप मिटके आणि कारवाई हटके अशा प्रकारचे एक समिकरणच होऊन गेले आहे. त्यामुळे, मिटके यांनी आरसीबी प्लाटून, नगरहून दोन पोलीस निरीक्षक आणि स्थानिक पोलीस असा 30 ते 40 जणांचा फोजफाटा घेतला आणि अचानक जमजम कॉलनीतील कत्तलखान्यावर छापा टाकला. त्यानंतर पहिल्यांदाच इतका मोठा फौजफाटा तेथे पाहून एकच पळापळ झाली. काही व्यक्तींनी तेथील पथदिव्यांवर दगडफेक करुन अंधार करण्याचा प्रयत्न केला. तर 100 पेक्षा जास्त जनावरे ही अगदी अस्तव्यस्त आणि सैरभैर पळू लागली होती.
दरम्यान, मिटके यांनी वहीद कुरेशी व मुद्दसर हाजी यांचे वाड्यात प्रवेश केला असता त्यांनी वाट दिसेल तेथून पळ काढत धुम ठोकली. त्यामुळे, त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अपयश आले तरी तेथे धारधार हत्यारे, चाकु, सुर्या, कोयते व रक्ताने भरलेले कपडे मिळून आले. तर बुजूलाच कत्तल करण्याच्या उद्देशाने आणलेली जणावरे देखील होती. तेथून पोलिसांनी 12 मांस, एक छोटा हत्ती (गाडी), 30 जणावरे, मिठाच्या गोण्या, चाकु, सुर्या, कोयते, लाखंडी वजनकाटा असा 31 लाख 13 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
दरम्यान, त्याच परिसरात नवाज कुरेशी याच्या कत्तलखान्यात पोलिसांनी छापा टाकला. तेथे मांस, एक आयशर गाडी, 41 जिवंत जनावरे, लोखंडी वजनकाटा, चाकु, सुर्या मिठाची पोती असा 32 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाला हस्तगत केला आहे. तर त्याच्या कार्यालयातून 4 लाख 28 हजार 300 रूपयांची रोख रक्कम, त्याचे बँक पुस्तक, एटीएम, आधारकार्ड, एक मोबाईल, डायर्या, एक रजिस्टर, एक मशिन, लोखंडी वजनकाटा असा एकूण 4 लाख 39 हजार 50 रुपयांचे मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच याच शेजारी जहिर कुरेशी याच्या वाड्यात देखील पोलिसांनी धाड टाकली. त्यात 11 लाख रुपयांचे मांस मिळून आले. पुढे परवेझ कुरेशी याच्या वाड्यात पोलिस घुसले असता त्याच्याकडून 7 लाख रुपयांचे मांस हस्तगत केले आहे.
दरम्यान, ही कारवाई करण्यासाठी पोलीस आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांना मोठी कसरत करावी लागली आहे. विशेष म्हणजे, संगमनेर नगपालिकेच्या हाद्दीत इतक्या मोठ्या कारवाया होतात. संगमनेरातील मांस केवळ पुणे-मुंबईतच नव्हे.! तर संपुर्ण राज्यात सप्लाय केले जाते. म्हणजे, राज्यात भारी संगमनेरची दस नंबरी अशी म्हण आता रुजू पडली आहे. दुर्दैवाने नगरपालिका आणि स्थानिक पोलीस देखील यावर काही करावाई करीत नाही. त्यासाठी बजरंगदल आणि अन्य सामाजिक संघटनांना पुढाकार घ्यावा लागतो. हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे, एकीकडे राज्याच्या महसुलमंत्र्यांची ख्याती देशात वाखाणली जाते आणि त्याच्या तालुक्यात मात्र, असे धंदे चालतात. ते ही तालुक्यात एक हाती सत्ता असताना.! त्यामुळे, राजकीय क्षेत्रात आता उलटसुलट चर्चा होऊ लागल्या आहेत.
दरम्यान, या कारवाईत वाहब कुरेशी, मुद्दतसर हजी याच्याकडून 26 लाख 63 हजार 500 रुपयांचा मुद्देमाला, नवाब कुरेशी याच्याकडून 29 लाख 97 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल तर कार्यालयातून 4 लाख 39 हजार 40 रुपये, परवेझ कुरेशी याच्याकडून 10 लाख रूपयांचा मुद्देमाल, जहिर कुरेशी याच्याकडून 7 लाख रूपयांचा मुद्देमाल, आरोपी कलीम सलिम खान, अबिदुरहक आब्दुलजबर असा एकूण 1 कोटी 4 लाख 50 हजार 50 रुपयांचा मुद्देमाल व 71 जणावरे पोलिसांनी हस्तगत केले आहेत. त्यामुळे, राज्यात कत्तलखान्यांच्या बाबत अग्रेसर असणार्या संगमनेरात कत्तलखाने चालविणार्यांचे धाबे दणाणले आहेत. तर, सलग 16 तास कारवाई करणार्या पोलिसांनी संगमनेरकरांनी आभार मानले असून त्यांच्या कारवाईचे कौतूक केले आहे.
आता, कोपरगाव तालुक्यात जेव्हा अशाच प्रकारची कारवाई झाली होती. तेव्हा त्यावेळी पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासह चार कर्मचार्यांवर कारवाई करण्यात आली होती. तरी नगर शहरात जेव्हा अशा प्रकारची मोठी कारवाई झाली तेव्हा देखील स्थानिक पोलीस ठाण्याच्या अधिकार्यास जबाबदार धरण्यात आले होते. तेव्हा तर पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकारी यांनी कत्तलखान्यांच्या बाहेर थेट पोलिसांच्या राहुट्या उभ्या केल्या होत्या. आता संगमनेरात कारवाई करताना पोलीस अधिक्षक काय भुमीका घेतात हे पाहणे महत्वाचे आहे. थेट बीट हवालदार कारवाईच्या अजेंड्यावर येतात की, तेथील इन्जार्च अधिकारी. कारण, येथे कोणाला थेट मलिदा पोहचतो हे सर्व संगमनेला माहित आहे. त्यामुळे, साहेब.! चोर सोडून सन्याशाला फाशी देऊ नका. अशा प्रकारचे मेसेज सोशल मीडियावर फिरत होते. तर पोलीस प्रशासनासह नगरपालिकेच्या अधिकार्यांवर देखील कारवाई झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी होताना दिसते आहे.