थु असल्या बापावर.! ११ वर्षाच्या मुलीवर पित्याने केले तीन वेळा अत्याचार, पत्नीने दिली फिर्याद, बापास ठोकल्या बेड्या.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                         संगमनेर शहरालगत ढोलेवाडी वस्ती येथे बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.  चक्क जन्मदात्या पित्यानेच आपल्या 11 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. ही घटना दि. 22 ते 28  सप्टेंबर 2021 या दरम्यान तीन वेळा घडल्याचे वैद्यकीय अहवाल आणि पीडितेच्या सांगण्याहून लक्षात आले आहे. याप्रकरणी खुद्द पत्नीने आपल्या पतीच्या निरोधात गुन्हा दाखल केला असून नराधम बापास संगमनेर शहर पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरंतर, गेल्या आठ दिवसात संगमनेरात महिला अत्याचाराचे चार गुन्हे दाखल झाले असून चेन स्नेचिंग आणि छेडछाड असे प्रकार वारंवार घडत आहे. त्यामुळे, संगमनेर शहर जितके विकसित होत चालले आहे. तितकी येथे असुरक्षितता वाढते आहे का ? असा प्रश्न अपस्थित केला जात आहे.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील ढोलेमळा परिसरात एक कुटुंब राहत होते. त्यांचे  १२ वर्षापुर्वी लग्न झाल्यानंतर जेेमतेम संसार सुरु होता. या दरम्यान त्यांना ११ वर्षे ५ महिन्यांची आज मितीस मुलगी होती. आता बाहेर निर्भया, कोपर्डी, खैरलांजी अशा धक्कादायक घटना घडत असल्यामुळे, मुलीच्या आईला त्याबाबत नेहमी चिंता होती. त्यामुळे, ती माय माऊली मुलीची फार कळजी घेत होती. दुर्दैवाने तिच्याच घरात हा विषारी नराधम आहे. हे तिच्याही लक्षात आले नाही. मात्र, दि. 22 रोजी पीडित व्यक्तीच्या आईला (फिर्यादीस) बाहेरगावी जायचे होते. त्यामुळे, तिने आपल्या मुलीला तिच्या वडिलांच्या स्वाधिन केले. कारण, आई नंतर मुलांसाठी सर्वात सुरक्षित कुस कोणती असेल, तर ती बापाची असते. त्यामुळे, आपल्या पोटच्या गोळ्याला पतीच्या ताब्यात सोडताना त्या माऊलीच्या मनात यत्किंचिही किंतू परंतू आला नाही. तर, नुकतच आयुष्य कळू लागलेल्या त्या मुलीला तरी काय शंका होती की, ज्याच्या प्रयत्नाने आपण जन्म घेतला आहे. तो एक माणूस नसून हैवान आहे आणि काही वेळानंतर या हिंस्र प्राण्याचे भक्ष आपण होणार आहोत.!

         

त्या दिवशी आई कामानिमित्त बाहेरगावी निघून गेली होती. त्यामुळे, कशी आणि का कोण जाणे.! या नराधमाची नियत फिरली आणि घरातील एकांत पाहून याच्यातील वासनांध राक्षस जागा झाला. जेव्हा पीडित मुलगी घरात झोपलेली असताना त्याने आपल्या मुलीवर अनन्वीत अत्याचार केले. मुलीने बापास फार विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच्या दबावाला आणि धमक्यांना ती बळी पडली. त्या असहाय्य वेदना तिने आपल्या उराशी ठेऊन आई येण्याची वाट पाहिली. दरम्यान, आई येत नाही तोवर या नराधमाने तिच्या असाह्यतेचा फायदा घेतला. आपण बाप आहोत हे देखील त्याच्या मनात डोकावले नाही. इतका तो वासनेच्या आहारी केला होता. मात्र, नुकतीच समजती झालेली मुलगी प्रचंड बुचकळ्यात पडली होती.  कारण, हा घडला प्रकार आता सांगावा तरी कोणाला ? आपल्या बापाचे काय होईल? माझ्या भविष्याचे काय होईल, यावर कोणी विश्वास ठेवेल? समाज काय म्हणेल? हे आईला कसे सांगायचे? अशा अनेक प्रश्नांचे तिच्या भेदरलेल्या मनात दडून बसले होते.

        दरम्यान, जेव्हा पीडित मुलीची आई घरी आली. तेव्हा मुलीच्या चेहऱ्यावर यक्ष प्रश्न होेते. तिने मुलीस विचारणा केली. मात्र, निव्वळ उडवा-उडविची उत्तरे मिळाली. तरी देखील इतका मोठा प्रसंग मुलगी थोडीच पचविणार आहे.! त्यानंतर काही तास गेल्यावर हा घडलेला प्रकार उघड झाला. मुलीला विश्वासात घेतल्यानंतर तिने तिच्या वेदना व्यक्त केल्या. त्यानंतर, त्या माऊलीच्या तळपायाची आग मस्तकापर्यंत गेली. त्यानंतर हा सर्व रोष बरोबर निघाला. मात्र, खरोखर पीडित व्यक्तीच्या आईचे कौतूक केले पाहिजे. त्यांनी आपल्या नराधम आवताराच्या पतील पाठीशी न घालता थेट पोलीस ठाण्यात जाईन तक्रार केली. त्यानंतर पोलीस उपाधिक्षक राहुल मदने, पोलीस निरिक्षक मुकुंद देशमुख यांनी तत्काळ या घटनेची दखल घेतली. पतीच्या विरुद्ध पत्नीची फिर्याद आणि मुलगी पीडित. अशा प्रकारे यात गुन्हा दाखल झाला असून संगमनेर शहर पोलिसांनी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक निकिता महाले करीत आहेत.

खरंतर, संगमनेरात अशा पद्धतीने एखादा अत्याचार होणे ही फार खेदाची बाब आहे. म्हणजे, मुलींच्या सुरक्षेच्या बाबतीत घरातील व्यक्तींवर देखील विश्वास ठेवावा की नाही.! असा प्रश्न उपस्थित होतो. इतकेच काय.! तर, अशा घटना म्हणजे आपल्या  सुसंस्कृतीला आणि नात्यांना काळीमा फासणारी आहे. या घटनांमुळे, नात्यांवरचे विश्वास उडत जातील तर चांगल्या मानसांच्या प्रतिमा देखील मलिन होत जातील. त्यामुळे, आता अशा करुयात की, पोलिसांनी यात सबळ पुराव्यासह दोषारोपपत्र तयार करावे. हा खटला अंडरट्रायल चलवून, याच चांगल्या वकिलाची नेमणूक झाली पाहिजे. कारण, अशा व्यक्तींना कठोर शिक्षा होणे फार गरजेचे आहे. हाच संदेश येणार्या व्यक्तींसाठी महत्वाचा ठरेल. अशा प्रतिक्रिया सुज्ञ लोक देत आहेत.