पाच गुन्हे दाखल असलेला अकोल्याचा दरोडेखोर पोलिसांच्या ताब्यात.! संगमनेरच्या चोऱ्यांचा उलगडा.! दरोडेखोरी तपासावरच.! सिनेस्टाईलने त्याच्यावर झडप.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील झोळे येथील गणेशवाडी परीसरातील गणपती मंदिराचा दरवाजा तोडून मंदिरातील दानपेटी, एम्प्लिफायर, इको मिक्सर असा 65 हजार रुपयांचा ऐवज व रोख रक्कम घेऊन पसार होणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी बेड्या ठोकल्या आहे. यात सतीश उर्फ संतोष मेंगाळ (रा.धामणगाव आवारी, ता. अकोले) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले असून त्याची चौकशी केली असता या पुर्वीही त्याने संगमनेर परिसरात असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. दरोडा, घरफोडी आशा विविध पाच गुन्ह्यांमधील फरार आरोपी आजअखेरीस जेरबंद झाला असून त्याची पुढील चौकशी तालुका पोलीस संगमनेर करत आहे. या कामगिरीनंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे कौतूक केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिनांक 11 जानेवारी 2021 रोजी नाशिक-पुणे हायवे लगत असलेल्या झोळे गावातील गणेशवाडी भागात असलेल्या गणपती मंदिराचा रात्रीच्या सुमारास दरवाजा तोडून अज्ञात इसमाने मंदिरातील दानपेटी, एम्प्लिफायर व इकोमिक्सर मशिन असा 65 हजार रुपयांचा ऐवज व रोख रक्कम चोरली होती. त्याबाबत झोळे गावचे ग्रामस्थ सतीश तुकाराम येवले यांना ही घटना समजताच त्यांनी लगेच संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे जाऊन अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याचा तपास संगमनेर पोलीस ठाणे करत होते. मात्र, त्यांना आरोपीचा शोध लागला नाही. सदरचा आरोपी हा गुन्हा घडल्यापासुन फरार राहुन घरफोडी, दरोडे असे सर्रास गुन्हे करत होता. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मदतीने तपास करत असताना अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरच्या गुन्ह्याबाबत अकोले येथील एका सराईत व्यक्तीचा हात असु शकतो. अशी गोपनीय माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, पोलीस नाईक शंकर चौधरी, संदिप दरंदले, दिपक शिंदे, रणजीत जाधव, उमाकांत गावरे या सर्वांनी मिळवुन अकोल्यात सापळा रचला व मोठ्या शिताफीने आरोपी ताब्यात घेतला आहे. जेव्हा या आरोपीचे लोकेशन लागले होते. तेव्हा तो एका डोंगराला होता. मात्र, त्याला पोलिसांची चाहुल लागताच त्याने पळ काढला. मात्र, पोलिसांनी मोठ्या शिताफीन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, याच परिसरातील हिवरगाव पावसा येथे कृषीसेवाकेंद्राचे कुलुप तोडुन 73 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. तर गेली दोन-तीन दिवसांपासून याच भागातील चांदनापुरी घाट ते हिवरगाव पावसा टोलनाक्यावर चोरीचे प्रमाण वाढले आहे. इतकेच काय! आठ ते दहा जणांनी मिळवुन हिवरगाव पावसा टोलनाक्यावर अक्षय नालकर या तरुणास बेदम मारहाण देखील केली आहे. त्यामुळे, इथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न देखील वारंवार निर्माण होतो. तर अनेक घटनांचा छडा देखील लागत नाही. जे काम संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला जमले नाही तेच काम स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी करून दाखवले आहे. दोन मोठ्या कामगिरी करून काही चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहे.
दरम्यान, नाशिक-पुणे हायवे लगत असलेल्या गावांमध्ये सद्या चोरीचे सत्र सुरू आहे. हिवरगाव फाट्यावरच रोडलगत असलेल्या कृषिसेवा केंद्र आहे. त्यांनी शनिवारी 9 वाजता नियमीत आपले दुकान बंद केले होते. मात्र, नाशिक पुणे हायवे लगत असलेल्या गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा गस्त नाही, कोठे पेट्रोलिंग नाही. त्यामुळे, चोरट्यांना दुकानेच काय! पोलीस ठाणे फोडले तरी या कानाची खबर त्या कानाला लागणार नाही. त्यामुळे, या चोरट्यांनी बरोबर या दुकानावर पुर्वीपासून लक्ष ठेवले आणि सुस्तावलेल्या पोलिसांचा फायदा घेत रात्रीचा वेळ साधुन बरोबर चोरीचा डाव साधला. खरंतर, तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत नाईट पेट्रोलिंग, सेक्टर पेट्रोलिंग, बंदोबस्त याची नितांत गरज आहे. संगमनेर शहरात अवघ्या तीन दिवसात तब्बल ७ दुचाकी चोरीला गेल्याचे समोर येऊ लागले आहे.
प्रिय मित्रांना.!
सर्वांना माहित आहे. कोरोनाने भल्याभल्यांचा जीव घेतला आहे. तर, अर्थिक गोष्टीला अनेकांना सामोरे जावे लागले आहे. आज, अशाच एका *हातावरील कुटुंबासाठी* मी आपल्याला हात जोडूून *विनंती* करणार आहे. अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथील *दत्तात्रय खरात* या तरुणास कोरोना झाला होता. राजूर, लोणी, सुगाव कोविड सेंटर अशा अनेक ठिकाणी उपचार करुनही त्याचा *स्कोअर १२ वर गेला आणि अॅक्सिजन लेवर ७० वर* आली होती. परिणामी अंतीम पर्याय म्हणून त्यास *डॉ. भांडकोळी* हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यातून तो आता निट झाला आहे. डॉक्टरांनी त्यांचे बील माफ केले. परंतू मेडिकल आणि अन्य तपासण्या यात *७० ते ८० हजार* रुपये बाकी आहे. हा मुलगा होतकरु असून रोज लोकांच्या बांधावर जेव्हा *कष्ट करेल तेव्हा रोजीरोटीचा प्रश्न मिटतो.* त्याने कोविडशी मात करुन जगण्याचे धैर्य सोडले नाही. त्यामुळे, आपण त्याला उभे राहण्यास मदत करणे आवश्यक आहे. फार काही मांडत नाही. परंतु, ज्यांना शक्य आहे. त्यांनी १० रुपये पासून तर *तुम्हाला हवी ती १००, २००, ५००० हजार अशी मदत करुन सहकार्य करावे.*
सदिप खरात
- 9604669585
- 8888782010
शक्य ती मदत करा