त्यासाठी वैभव पिचडांना भाजप सोडून हाच पर्याय निवडावा लागणार.! लोकभरोशे डॉ. लहामटेंनी शर्मिलाचा इतिहास अभ्यासावा.! राजकीय भाकीत.!
- सागर शिंदे
सार्वभौम विशेष :-
सन 2019 साली अकोल्याच्या राजकीय वर्तुळाचा परिघ पुर्णत: बदलुन गेला. 40 वर्षे सत्तेत असणार्या पिचड कुटुंबाला ना विजयात ना विरोधात तर थेट बाहेर बसावे लागले. अर्थात, त्यांचा भाजप प्रवेश आणि त्यांच्या भोवती जमा झालेली पिलावळ.! अशा अनेक कारणांपैकी ही दोन कारणे केंद्रबिंदू ठरली. त्याचा परिणाम असा झाला की, ज्या भांगरे कुटुंबाने गेल्या 30 वर्षात पिचड कुटुंबास टक्कर देण्याचे काम केले. त्यांचा पत्ता कट झाला आणि डॉ.किरण लहामटे यांची नकळत लॉटरी लागून गेली. हरकत नाही.! मात्र, तेव्हाचे डॉक्टर म्हणजे जनतेच्या गळ्यातील ताईत होते. आता ते भलतेच सराईत झाल्याने त्यांच्याबाबत फार म्हणजे फारच नकारात्मक वातावरण अवघ्या दोन वर्षात निर्माण झाले. म्हणजे, एकेकाळी असे वाटत होते की, डॉ.लहामटे हे येणारी 40 वर्षे आमदार राहतील की काय.! परंतु, आज वास्तवत: असे आहे की, त्यांच्याच पक्षात त्यांचीच कुरघोडी करणारी मंडळी अगदी बारामतीपर्यंत कागदी घोडे नाचविताना दिसतात. त्यामुळे, ज्या भांगरेंनी स्वत:ला थांबून घेत परिवर्तनाची मशाल हाती घेतली. त्यांच्यावर देखील प्रचंड त्रागा करण्याची वेळ त्यांच्यावर निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. कारण, यांच्यात देखील प्रचंड मदभेद दिसून येत आहे. मी, जनतेचा आमदार आहे असे म्हणणार्या डॉक्टरांना कोणीतरी सांगितले पाहिजे की, एका मणिपुर येथील समाजसेविका इरोम शर्मिला यांनी जनतेसाठी आफस्फा विरोधात 16 वर्षे भुख हरताल केली होती. त्यानंतर जेव्हा 2017 साली निवडणुकीला उभी राहिली तेव्हा तिला अवघ्ये 90 मते मिळाली होती. म्हणजे जितके दिवस ती उपाशी होती. तितकी मते देखील तिला मिळाली नव्हती. त्यामुळे, जनतेच्या बरोबरीने संघटन देखील गरजेचे असते. कारण, प्रत्येक वेळी नशिब साथ देतच असे नाही. हे सांगण्यासाठी त्यांना कधी जालीम ज्योतिष मिळायचा. देव जाणे.! अर्थात या सगळ्या मतभेदाचा आणि मनभेदाचा फायदा आता वैभव पिचड यांना होत असल्याचे दिसते आहे.
एकंदर हे जय पराजयाचे राजकीय रहाट सुरूच राहणार आहे. मात्र, जर खरोखर त्यांच्या हितचिंतकांना वाटते आहे की, वैभव पिचड आमदार झाले पाहिजे. तर त्यांनी पहिल्यांदा भाजपं सोडली पाहिजे, जर ते त्यांच्या मतावर तेथेच राहण्यास ठाम असतील. तर त्यांनी आणखी पाच वर्षे विरोधात राहण्याची देखील तयारी ठेवली असेल. यात तिळमात्र शंका नाही. मात्र, जनतेचे आजही व्यक्तीप्रेम म्हणून पिचड कुटूंबाचा आदर आहे. त्यामुळे, त्यांच्यासाठी नव्हे तर जनतेसाठी त्यांनी एक वेगळा मार्ग अवलंबविला पाहिजे. अर्थात एक आजही स्पष्ट आहे की, पिचड यांनी आता पक्ष बदलताना थोडा विचार केला पाहिजे. कारण, राज्यातील सरकार फारच स्थिर आहे. असे म्हणता येणार नाही. एकीकडे इडीच्या चौकशी, तीन पक्षांमधील अंतर्गत घुसमट आणि केंद्रीय पातळीवरील बैठका. त्यामुळे, 17 जुलै 1977 प्रमाणे येथे कधी राजकीय भूकंप होईल हे सांगता येत नाही. आज राष्ट्रवादी जरी पिचड यांच्याकडे पाहून मुरका मारत असली तरी कधी हे दोन व्यक्ती एकाच सत्तेत बसू शकतात याचा काही नेम नाही. त्यामुळे, कोणती काळरात्र कशी उजडेल हे सध्यातरी सांगणे कठीण आहे. त्यामुळे, सन 2014 प्रमाणे उताविळ होऊन गुढग्याला बाशिंग बांधणे त्यांच्यासाठी धोक्याचे ठरू शकते.
एकंतर जर त्यांना भाजप सोडायची ठरली तरी त्यांना फार संयम ठेवावा लागणार आहे. कारण, जर हे सरकार पाच वर्षे टिकले तर येणार्या काळात देखील काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना अशा प्रकारचे राजकारण असेल. यात आणखी एक गोष्ट अशी की, शरद पवार यांना देशात राजकारण करायचे असल्यामुळे, ते राज्यात सत्ता स्थापन करताना काँग्रेसला वगळतील याची शक्यता फार म्हणजे फारच कमी आहे. कारण, शिवसेना हा प्रदेशिक पक्ष आहे. तर देशात राजकारण आणि सत्तेत सहभागी व्हायचे असेल एव्हाना मुलीला केंद्रात स्थिर करायचे असेल तर राज्यात काँग्रेसला सोडून चालणार नाही. त्यामुळे, एकंदर पिचड यांना शिवसेना परवडेल की, काँग्रेस याचे उत्तरे जरी मिळत असले तरी येणारा काळ त्याचे उत्तर अधिक स्पष्टपणे देऊ शकेल. मात्र, तरी देखील पठारावरील 36 गावे आणि 42 हजार मतदान हे काँग्रेस अगदी निर्विद त्यांच्या पदरात पडेल. येथील मधुकर नवले यांच्यासह सुधिर तांबे यांचे वाढते प्रस्त आणि पिचड यांचे हक्काचे 56 हजार मतदान हे त्यांना सहज विजयी करुन जाऊ शकते.
आता ही जरी राजकीय पक्षाची गोळाबेरीज झाली तरी पिचडांसाठी अपक्ष आणि स्वतंत्र्य पक्षाचे ब्रम्हास्त्र असणार आहे. जसे नेवाशाचे आमदार तथा मंत्री महोदय शंकरराव गडाख यांनी शेतकरी क्रांतीकारी पक्ष स्थापन करून विजय मिळविला आणि कोणाच्या कुबड्या न घेता स्वबळावर मंत्री झाले. प्रहार संघटनेचे बच्चू कडू हे देखील मंत्री झाले. अगदी तसेच आमरावतीचे आमदार राणा कौर आणि खा. नवनित कौर यांनी देखील स्वत:च्या स्वाभिमानी पक्षातून निवडणुक लढवून विजय मिळविला. नारायण राणे यांचे देखील काही वेगळे नाही. अशा पक्षांना राजकीय वातावरण पाहून कोणी ना कोणी पाठींबा देते आणि सत्तेत स्थान देखील दिले जाते. त्यामुळे, येथे पिचडांसाठी पराभवानंतर अवघ्या दोन वर्षात पुन्हा राजकीय वातावरण जैसे थे झाले आहे. त्यामुळे, त्यांनी ठणवायचे आहे. येणार्या काळात नेमकी आपल्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे. काही झाले तरी सुज्ञ जनता पुन्हा परिवर्तनाची वाट पाहात आहे. हे मात्र नक्का.!
प्रिय मित्रांना.!
सर्वांना माहित आहे. कोरोनाने भल्याभल्यांचा जीव घेतला आहे. तर, अर्थिक गोष्टीला अनेकांना सामोरे जावे लागले आहे. आज, अशाच एका हातावरील कुटुंबासाठी मी आपल्याला हात जोडूून विनंती करणार आहे. अकोले तालुक्यातील उंचखडक बु येथील दत्तात्रय खरात या तरुणास कोरोना झाला होता. राजूर, लोणी, सुगाव कोविड सेंटर अशा अनेक ठिकाणी उपचार करुनही त्याचा *स्कोअर १२ वर गेला आणि अॅक्सिजन लेवर ७० वर* आली होती. परिणामी अंतीम पर्याय म्हणून त्यास *डॉ. भांडकोळी* हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यातून तो आता निट झाला आहे. डॉक्टरांनी त्यांचे बील माफ केले. परंतू मेडिकल आणि अन्य तपासण्या यात *७० ते ८० हजार* रुपये बाकी आहे. हा मुलगा होतकरु असून रोज लोकांच्या बांधावर जेव्हा *कष्ट करेल तेव्हा रोजीरोटीचा प्रश्न मिटतो.* त्याने कोविडशी मात करुन जगण्याचे धैर्य सोडले नाही. त्यामुळे, आपण त्याला उभे राहण्यास मदत करणे आवश्यक आहे. फार काही मांडत नाही. परंतु, ज्यांना शक्य आहे. त्यांनी १० रुपये पासून तर *तुम्हाला हवी ती १००, २००, ५००० हजार अशी मदत करुन सहकार्य करावे.*
सदिप खरात
- 9604669585 फोन पे
- 8888782010 फोन पे