डॉ. पुनम यांची आत्महत्या ही डॉ. योगेश निघुते यांनी चारित्र्यावर संशय घेतल्यानेच.! संगमनेरात गुन्हा दाखल, चिरायु पोलिसांच्या रडारवर.!

 


सार्वभौम (संगमनेर) :- 

                         संगमनेर शहरात डॉक्टरी पेशात एक खळबळ उडविणारी धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील बालरोग तज्ञ योगेश यशवंत निघुते (रा. चिरायु हॉस्पिटल ताजणे मळा, संगमनेर) यांच्या पत्नी पुनम निघुते यांनी यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. योगेश निघुते हे त्यांच्या लग्नानंतर पाच ते सहा महिन्यापासून ते २९ आँगस्ट २०१९ पर्यंत पुनम यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होते. तर, त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करीत होते. या दाम्पत्यास आठ वर्षाचा मुलगा असताना देखील योगेश निघुते यांनी त्यांच्या पत्नीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, जेव्हा पुनम यांनी आत्महत्या केली. तेव्हा, हा घातपात असल्याची शंका त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली होती. या अक्षेपामुळे पुनम यांचा मृतदेह औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात सीसीटीव्हीच्या निगरानीखाली नेण्यात आला होता. मात्र, हा घातपात नसून आत्महत्याच असल्याचे वैद्यकीय अहवालात समोर आले आहे. मात्र, त्यानंतर, पुनम यांचे बंधू शरद कमलाकर कोलते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार  योगेश निघुते यांच्यावर कलम ३०६, ३०४ (ब), ४९८ व ३२३ प्रमाणे गुन्हा नोंदविला आहे.

          याबाबत फिर्यादीत दिलेली सविस्तर माहिती अशी की, रविवार दि. २९ आँगस्ट २०२१ रोजी डॉ. निघुते यांनी डॉ. पुनम यांचा कुटुंबियांना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास माहिती दिली की, तिने राहत्या घरात आत्महत्या केली आहे. त्यावेळी, फिर्यादी शरद कोलते यांनी त्यांच्या आईवडिलांना या घटनेची माहिती दिली. परंतु, हे कुटुंब वृंदावन, मथुरा येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यांना माहिती कळताच ते तेथून मार्गस्त झाले. तर, फिर्यादी शरद कोलते व त्यांचे काका आणि अन्य नातेवाईल हे तत्काळ जालना येथून संगमनेरला निघाले होते. ते मंगळवार दि. ३० रोजी पहाटे ३ वाजता येथे पोहचले असता डॉ. पुनम यांची डेथ बॉडी कॉटेज हॉस्पिटल येथे असल्याने ते तेथील शवविच्छेदन गृहात गेले. तेव्हा शरद यांनी पाहिले की, डॉ. पुनम यांच्या डोक्याला मार लागलेला होता. तर, पायाला हाताला खरचटलेले होते. तेव्हा त्यांना या मृत्यूबाबत शंका वाटली. ही आत्महत्या आहे की, घतपात हे निच्छित होण्यासाठी शरद यांनी अर्ज दिला की, डॉ.  निघुते हे संगमनेरातील एक नामांकीत डॉक्टर आहे. ते स्थानिक असल्याने पीएम मध्ये संदिग्धता येऊ शकते. त्यामुळे, त्यांचे शवविच्छेदन हे औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात व्हावे असा अर्ज देण्यात आला होता. तेथील प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर डॉ. पुनम यांच्यावर जालना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

         दरम्यान, फिर्यादीत म्हटले आहे की, दि. ८ जुलै २०११ रोजी डॉ. योगेश व पुनम यांचा विवाह झाला होता. तेव्हा लग्नाचा सर्व खर्च कमलाकर कोलते (वडिल) यांनी केला होता. लग्नानंतर थोडे दिवस यांचा संसार चांगला चालला, मात्र कालांतराने योगेश यांनी आमच्या बहिनीकडे हॉस्पिटल बांधनीसाठी वारंवार पैशाची मागणी केली होती. ती पुर्ण न झाल्याने ते तिला नेहमी मारहाण करीत होते. त्यांच्या या तगाद्यामुळे पुनम ही फार त्रस्त झाली होती. तीने हा सर्व प्रकार तिच्या माहेरी सांगितला होता. त्यामुळे, तिला त्रास नको म्हणून तिच्या कुुंटुबाने दि. २४ डिसेंबर २०१३ ते दि. ४ सप्टेंबर २०१९ पर्यंत वेळोवेळी २ लाख ५४ हजार इतकी रक्कम तिच्या खात्यावर टाकली होती. ही रक्कम योगेश यांच्या सागण्याहुन टाकल्याचे शरद यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

            त्यात पुढे म्हटले आहे की, डॉ. योगेश यांनी दारु पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे ते नशेत तिला मारहाण करत असे. ती आम्हास नेहमी फोन करुन सांगत होती. ते तिला आमच्याकडे माहेरी देखील येऊ देत नव्हते. तर, व्यसन आणि वारंवार पैशाच्या मागणिने पुनम वैतागली होती. त्यांचे व्यसन इतके वाढले होते की, त्यांचे आई वडिल देखील त्यास कंटाळुन त्यांच्या मुळ गावी निघून गेले होते. त्यामुळे, तो पुनम यांनी जबरी मारहाण करीत असे. हा त्रास अनावर झाल्याने तिच्या माहेरचे लोक तिला जलण्यास येण्यास सांगत होते. परंतु, योगेश हे माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन मला बदनाम करतील त्यामुळे मी येत नाही असे त्या म्हणत होत्या. त्यामुळे, त्या डॉक्टरांच्या प्रचंड दशहतीखाली होत्या असे कोलते यांनी म्हटले आहे. 

       दरम्यान, नोव्हेंबर २०१९ मध्ये डॉ. योगेश यांनी पुनमच्या वडिलांकडे ५ लाख रुपयांची मागणी केली होती. त्यासाठी निघुते हे पत्नीस प्रचंड शरिरीक व मानसिक त्रास देत होते. हा प्रकार पुनम यांच्या वडिलांना समजताच त्यांनी दि. ११ नोव्हेंबर २०१९ रोजी पुन्हा ५ लाख रुपयांचा चेक त्यांना दिला होता. ही रक्कम योगेश हे वापरत होते. तिला मारहाण होत असल्याचे तिचे वडिलांना सांगितले होते. डॉ. पुनम ह्या मेडिकल आँफिसर असल्याने त्या नगर परिषदेच्या दवाखाण्यात होत्या. त्यावेळी, डॉक्टर योगेश हे त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना वारंवार मारहाण करत होते. त्यामुळे, ती नोकरी सोडण्यास देखील योगेश यांनी भाग पाडले होते. त्यानंतर स्वत:च्या चिरायु हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टीस करण्यास सांगितले. मात्र, तेथे देखील यांनी पुनमच्या चारित्र्यावर संशय घेतला. डॉ. पुनम ह्या एमबीबीएस होत्या, त्यांनी एमडी होण्याची इच्छा होती. मात्र, मुंबईला त्यांचा नंबर लागूनही योगेशने त्यांना पाठविले नाही. तर, जेव्हा रविवार दि. २२ रोजी  डॉ. पुनम ह्या रक्षबंधनला जालण्याला गेल्या असता त्यांच्या घुसमटलेल्या आयुष्याचा उलगडा झाला. त्यानंतर, त्यांनी आपल्या आयुष्याला कायमचा पुर्णविराम दिला. त्यामुळे, डॉ. योगेश निघुते हेच डॉ.  पुनम यांच्या मृत्यूस जबाबदार आहेत. असे शरद कोलते यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक शिंदे करीत आहेत.