अगस्ति कारखाना पुन्हा बिनविरोध.! बी. जे देशमुखांना टोमणे देत 3 वर्षात कर्जमुक्त करण्याचे आश्वासन.!

- सागर शिंदे

सार्वभौम (अकोले) :- 

             अगस्ति कारखाना उभा करण्यासाठी आम्ही किती यातना सहन केले आहेत. हे आम्हाला माहित आहे. त्यामुळे, कोणीही येईल आणि काहीही गप्पा मारले व मनाला येईल ती कर्जाची आकडेवारी संगत बसेल. त्यांच्यावर विश्वास ठेऊ नका. कारखाना आता बंद पडला तर पुन्हा तो उभा करता येणार नाही. रत्यामुळे, येणार्‍या काळात ज्या काही निवडणुका होतील. त्यात देखील सर्व पक्षीय आणि सलोख्याने बिनविरोध पद्धतीने सर्वांना घेऊन संचालक मंडळ स्थापन करु अशा प्रकारचे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केले. तर येणार्‍या तीन ते चार वर्षात कारखाना कर्जमुक्त करु अशा पद्धतीचे त्यांनी आश्वासन ते हा मुद्दा प्रोसेडींगवर घ्या असे म्हणत बी. जे. देशमुख यांचा नाव न घेता टाला लगावला. कारण, देशमुख यांनी हा कर्जमुक्त कारखाना हा मुद्दा प्रोसेडींगवर घ्या अशी मागणी करुन अ‍ॅनलाईन बैठकीला हजेरी दर्शविली होती. पिचडांच्या प्रोसेडींगवर घ्या या वाक्यानंतर सभागृहात एक हस्या उडाला होता.

दरम्यान, आज बुधवार दि. 29 सप्टेंबर 2021 रोजी दुपारी 1 वाजता अकोले तालुक्यातील अगस्ति सहकारी साखर कारखान्याची 27 वी वार्षिक सभा ऑनलाईन पद्धतीने आयोजीत करण्यात आली होती. त्यात कोण काय प्रश्न उपस्थित करते, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. विशेषत: बी.जे. देशमुख आणि ज्येष्ठ नेते दशरथ सावंत हे काय भूमिका घेतात याबाबत अनेकांना उत्सुकता लागली होती. मात्र, त्यांना आदल्या दिवशीच मुंबईची सफर करुन आणल्यामुळे, त्यांच्या आरोपांची धार आज बोठलेली दिली. तर त्यांनी तीन वेळा स्वत:चे अस्थित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अन्य सभासदांकडून सडेतोड प्रतिउत्तर मिळाले. जेव्हा काही ठराव मंजुर होत होते. तेव्हा एमडी हे अन्य सभासदांना विचारणा करुन विषयाला मंजुरी घेत होते. मात्र, बी. जे देशमुख यांनी त्यांच्यावर खार खात काहीशी स्टंण्टबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मात्र काही सदस्यांनी एक टोमनेबाजी करीत विषय वाचण्यापुर्वीच मंजूर-मंजूर असे म्हणत त्यांना प्रतिउत्तर केले.

दरम्यान, अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी काल फार मोलाची कामगिरी केल्याचे पहायला मिळाले. ते असे की, कारखान्याचे उपाध्यक्ष गायकर पाटील, बी.जे. देशमुख आणि ज्येष्ठ नेते दशरथ सावंत, अशोक देशमुख, महेश नवले, भानुदास तिकांडे अशा एका शिष्ठमंडळाला घेऊन त्यांनी थेट मंत्रालय गाठले. तब्बल दिड तास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बैठक घडवून आणली. आपण सर्व एकाच बाजुचे असून आपापल्यात लढून विरोधकांची बाहु मजबुत करू नका. असे काहीसे सुचवत गायकर पाटील आणि बी.जे. देशमुख व ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांच्यात सलोखा घडवून आणण्याचे काम केले. त्यामुळे, आजच्या बैठकीत त्याचा परिणाम पहायला मिळाला. डॉ. लहामटे यांच्या अशा या सलोख्याने येणार्‍या काळात पिचड कुटूंब हे आपोआप एकटे पडणार आहे. अशा पद्धतीची खेळी त्यांनी कायम वापरली. तर येणार्‍या काळात तेच पुन्हा आमदार राहतील. यात तिळमात्र शंका नाही.

बैठकीत काय झाले.!

दिड तास झालेल्या बैठकीत दोन्ही गटांनी शांतता बाळगली होती. जे काही होईल ते शेतकर्‍यांच्या हिताच्या दृष्ठीने विचार व्हावा, त्यांना घामाचे दाम मिळावे. शेतकर्‍यांना डोळ्यासमोर ठेऊन निर्णय झाले पाहिजे. तालुक्याचे अर्थकारण टिकविण्यासाठी कारखाना फार गरजेचा आहे. आता मतभेद असेल तरी मनभेद होणार नाही याची काळजी घ्या. आज कारखान्यात सत्ता कोणाची आहे. हे महत्वाचे नाही. परंतु सगळ्यांनी एकत्र यावे. कारखाना चालविण्यासाठी काय उपायोजना आखता येतील हे नियोजन करावे, कोणी बाहेरुन लक्ष घालण्यापेक्षा आत येऊन प्रक्रियेत लक्ष घालुन सहकार्य करावे, एकमेकांना मार्गदर्शन करावे, आपापल्या जबाबदार्‍या निच्छीत कराव्यात. अशा पद्धतीने सारांशरुपी दादांनी सगळ्यांना समजून सांगितले. ते दोन्ही गटांनी मान्य केले आहे.

पुढे काय.!

खरंतर वाघ हा डरकाळी फोडल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे, सहकारातील ज्ञान असणारे बी.जे. देशमुख यांचा स्वभाव पाहता ते सहकार्यापेक्षा विरोधक म्हणून काम करण्यास जास्तच इच्छिूक असतील. कारण, त्या-त्या क्षेत्रात ज्ञान असणारा माणूस  कधीच शांत बसू शकत नाही. जरी ते यंत्रणेत आले तरी त्यांची बडाची भूमिका कायम राहिल. यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे, त्यांची भूमिका आज प्रमाणे नेमही उभी अडवीच असण्याची शक्यता आहे. असे मत विश्लेषकांनी व्यक्त केले आहे. तर, ज्येष्ठ नेते दशरथ सावंत यांनी त्यांच्या धडाडीचा उभा कार्यकाळ हा विरोध आणि संघर्षात घालविला आहे. त्यामुळे, एफआरपीपेक्षा जास्त भाव द्यावा ही त्यांचीच मागणी तर कारखान्यावर कर्ज वाढले कसे? हा देखील त्यांचाच प्रश्न.! त्यामुळे, ते शेतकर्‍यांच्या बाजून अगदी दिपस्तभासारखे उभे राहतील. त्यामुळे, तुर्तास मिळलेला प्रश्न हा येणार्‍या काळात पुन्हा ज्वालाभुखी होऊन उभा राहणार नाही. असे ठामपणे सांगणे  अशक्य आहे. तर, डॉ. किरण लहामटे यांच्या शिष्टाईला यश आले असेल तरी येणार्‍या काळात देखील त्यांचीच भूमीका महत्वाची असणार आहे. मात्र, त्यांची मुडवरील गंमत आज कोणी सांगू शकत नाही. तेव्हा उद्याचा अंदाज लावणे. हा निव्वळ मुर्खपणा ठरेल.