मुलाने लफडं केलं.! अन गुन्हा दाखल होताच आई बापाने आत्महत्या केली.! बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यासाठी मागितले दोन लाख रुपये.!

 


  
संग्रही फोटो

         
सार्वभौम (राजूर) :-


                   बलात्काराच्या गुन्ह्यात मुलास अडकविले आणि त्यातून त्याला बाहेर काढण्यासाठी एका महिलेने दोन लाख रुपयांची मागणी केली. या गुन्ह्यात सहआरोपी केलेल्या मुलीच्या आई वडिलांनी बदनामी झाली म्हणून एकाच वेळी राहते घरात आपली जिवणयात्रा संपविली. ही घटना अकोले तालुक्यातील चिंचावणे येथे मंगळवार दि. 17 ऑगस्ट 2021 रोजी 1 वाजण्याच्या सुमारास घडला. यात सोमनाथ नामदेव कुलाळ व जिजाबाई सोमनाथ कुलाळ (रा. चिंचावणे) ही दोघे मयत झाले असून याप्रकरणी शितल रामा काठे (रा. खडकी, अकोले) आणि तीचा बाप मारुती नाना मुठे (रा. सातेवाडी, ता. अकोले) अशा दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा राजूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. काही एक रोल नसताना मुलाच्या आई वडिलांना आरोपी करणे आणि त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी मागणी यात त्या निष्पाप दाम्पत्याचा जीव जाणे ही फार खेदजनक आणि ह्रदय हेलावणारी घटना आहे. त्यामुळे, पोलिसांनी मुख्य व्यक्तीस आरोपी केल्याची काही खेद नाही. मात्र, हकनाक त्याच्या कुटुंबास आरोपी करणे यावर विचार केला पाहिजे. आज प्रत्येक व्यक्ती या दोघांच्या जाण्याचे पाकत कोणाच्या माथी? हा प्रश्न विचारत आहे.


याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमनाथ कुलाळ हे अगदी साधारण कुटुंब, कोणाच्या अध्यात नाही ना मध्यात.! त्यांनी एका मुलीचा संभाळ केला आणि कालांतराने त्यांनी त्यात मुलीसोबत आपल्या समीर कुलाळ या मुलाचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. मात्र, हे संबंधित मुलीच्या एका नातेवाईकास मान्य नव्हते. अर्थात या मुलीचा सांभाळ कुलाळ यांनी केल्यामुळे ते लग्नास बांधिल होते. मात्र, अचानक यांचे प्रेम ऊफाळून आले. कारण, समीर आणि पीडित मुलीचे प्रेम असल्यामुळे, त्यांच्यात अनेकदा शरिर संबंध आले होते. यात पीडित मुलगी गरोदर राहिली होती. लग्नास अवघे काही वय कमी असल्यामुळे, कुलाळ कुटुंब अडचणी होते. त्यामुळे, गुतली गाय आणि फटके खाय.!

दरम्यान, पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या मुलीचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला. मात्र, गर्भपात करु नका. आम्ही यांचे लग्न लावून देतो अशी विनंती मयत सोमनाथ आणि जिजाबाई यांनी केली होती. मात्र, दोन लाख रुपये उकळण्यासाठी ऐकतील ते नातेवाईक कसले.! त्यांनी पीडितेस लोणी रुग्णालयात दाखल करुन पुढील प्रक्रिया पार पाडली आणि तेथे जबाब नोंदविल्यामुळे अल्पवयीन मुलगी असल्यामुळे समीर सोमनाथ कुलाळ याच्यासह त्याच्या आई वडिलांनी मदत केली असे म्हणत त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेत पोलिसांनी समीर कुलाळ यास अटक केल्यानंतर त्याच्या आई वडिलांनी फार मोठा धसका घेतला होता. ज्या मुलीचा संभाळ केला त्याच मुलीमुळे आज अशी वेळ आली. इतकेच काय! तर आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहण्याची वेळ आली या भावनेतून हे कुटुंब पुर्णत: खचून गेले होते.

घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला होता. त्यामुळे, पोस्को आणि अत्याचाराच्या गुन्ह्यात आपल्यासारख्या व्यक्तींची चुक नसताना नाव आले. मुलगा देखील जेलमध्ये गेला. नातेवाईक, गावातील लोक आणि आप्तेष्ट यांच्यात बदनामी झाली. त्यामुळे, सोमनाथ आणि जिजाबाई यांना फार मोठा सदमा बसला होता. आता मुलास बाहेर कसे काढायचे? असा विचार करीत असताना शितल काठे व मारुती मुठे यांनी यांच्या हतबलतेचा फायदा घेतला. हा गुन्हा मिटवायचा असेल तर दोन लाख रुपये आणि दवाखाण्यात झालेला खर्च द्या. तेव्हा आम्ही केस मागे घेतो असा तगादा लावला. जर पैसे दिले नाही तर तुम्हाला केसमध्ये अडकवितो असे म्हणत कुलाळ कुटुंबास तगादा लावला.

दरम्यान, या घटनेत काही एक संबंध नसताना गुन्ह्यात नाव अडकविले गेले. ज्या मुलीचा संभाळ केला तिच्यामुळे कुटुंब अस्थिर झाले, पोटचा मुलगा जेलमध्ये जाऊन बसला, गावात इज्जत चव्हाट्यावर निघाली, नातेवाईकांना तोंड दाखवायला जागा राहिली नाही, आता मुलास सोडवायचे तर दोन लाख रुपये द्यायला पैसे नाहीत. त्यामुळे, प्रचंड तनावाखाली असणार्‍या सोमनाथ कुलाळ आणि जिजाबाई कुलाळ या दोघांनी मंगळवारी आपल्या राहत्या घरात आपले जीवण संपवून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर घरातील लोखंडी पाईपाला दोरी बाधून हे पती-पत्नी देवाघरी निघून गेले. हा प्रकार ऐकल्यानंतर अनेकांच्या काळजाचे पाणी-पाणी झाले. या मायबापाची काय चुक होती? उभं आयुष्य चारित्र्यसंपन्न जगणार्‍या दोघांचा जीव काही क्षणात निघून गेला. याची किंम्मत चारित्र्यहिन व्यक्तीला काय कळणार? त्यामुळे, या दोघाच्या जाण्याने संपुर्ण तालुक्याने फार खेद व्यक्त केला आहे. या प्रकारानंतर दीपक कुलाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शितल कोठे व मारुती मुठे याच्यावर राजूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.