पोलीस निरीक्षकाच्या देशमुख यांना आरोपी करा.! त्यांच्या नेतृत्वाखालीच हा हल्ला.!
सार्वभौम (अहमदनगर) :-
नगर जिल्हा हा गुन्हेगारी विश्वात राज्यात आव्वल स्थानी आला आहे. येथे कोपडी, जवखेडा, लोणी मावळा, सोनई, खर्डा, लांडे, केडगाव, भाटीया, कोठेवाडी अशी अनेक प्रकरणे राज्याला हदरवून गेली. इतकेच काय.! येथे पोलिसांनी देखील काही कमी कारणाने केले नाहीत. कोणी पोलीस ठाण्यात महिलांवर अत्याचार केले तर कोणाची वर्दी चोरी गेली. कोणावर अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले तर कोणी पोलीस अधिक्षक कार्यालयात तोडफोडी झाल्या. कोणी कोट्यावधींचा गांजा गायब केला तर कोणी अवैध धंद्यांमध्ये भागिदारी केली. ही सर्व प्रकरणे इतिहासात कागदावर आलेली आहेत. त्यामुळे, नगर जिल्ह्यात एखादा एसपी आलाय आणि तो शांततेत येथून गेलाय असे गेल्या काही वर्षांपासून येथे पहायला मिळालेले नाही. तोच पायंडा पाटील साहेबांच्या काळात देखील कायम असल्याचे दिसते आहे. मात्र, साहेबांच्या काळात बोठेंसारख्या व्यक्तीबाबत प्रचंड पारदर्शकता दिसून आली. तितकी खात्यावर कारवाई करताना भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हाद्दीत जो काही प्रकार दिसला. त्यात मात्र, दिसनू आली नाही. त्यामुळेे, खात्यात आणि जिल्ह्यात उलट-सुलट चर्चा सुरू आहे.
खरंतर जेव्हा येथे पोलीस तत्कालीन पोलीस अधिक्षक लखमी गौतम होते. त्यांनी सोनईचे सहायक पोलीस निरीक्षक यांनी एक चुक लक्षात येताच त्यांना तत्काळ निलंबीत केले होते. त्यांच्या नंतर डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात 40 पेक्षा जास्त कर्मचारी निलंबित केले होते. इतकेच काय.! अधिकार्यांची देखील त्यांनी कधी खैर केली नाही. जर येथे त्रिपाठी किंवा लखमी साहेब असते तर त्यांनी तत्काळ चौकशी करुन तडक निर्णय घेतला असता. मात्र, इतका मोठा आरोप होऊन देखील चार दिवस उजाले तरी साधा एक कर्मचारी देखील निलंबीत करण्यात आलेला नाही. त्यामुळे, जनतेमध्ये उद्रेख वाढू लागला आहे. तर आज ज्या व्यक्तीला मारहाण झाली, तो अखेरच्या घटका मोजत असताना जिल्ह्यात अनेक संदिग्ध प्रश्न उभे राहु लागले आहेत. कारण, पोलीस एक सांगतात, डॉक्टर एक तर चर्चा भलतीच सुरू आहे. त्यामुळे, यात पोलीस अधिक्षक साहेबांनी तडक भूमिका घेणे अपेक्षित आहे.
आता सादिक यांच्या पत्नीने नव्याने एक निवेदन दिले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, माझा पती आरोपी असला तरी तो पोलिसांच्या ताब्यात होता. तो पोलीस संरक्षणात असताना त्याला पोलिसांच्या देखत मारहाण झाली आहे. पोलीस कर्मचारी शेख आणि पालवे यांनी त्यांना सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अटक केली होती. तर देशमुख यांच्या नेतृत्वाखालीच सादीक यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचे निवेदनात म्हटले आहे. म्हणजे, जेव्हा गुन्हा दाखल करायचा होता तेव्हा देखील तो दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करण्यात आली. वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत थांबून घेत वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या पलिकडे, पोलिसांच्या ताब्यात असणार्या आरोपीला मारहाण होऊन देखील एका अपघाताचा बनाव करण्यात आला, खोटे साक्षिदार तयार करण्यात आले, खोटी फिर्याद घेण्यात आली, घटनास्थळी पुरावे नष्ट करण्यात आले. म्हणजे, यापेक्षा कामात आणखी किती कसुरी हवी आहे? हे देखील अनेकांना कळेनासे झाले आहे. यात एक असे लक्षात येते की, एकतर अंतीम चौकशीअंती एसपी साहेब दोषींना खात्यातून डिसमीस करु शकतात किंवा....
आता, जर हा गुन्हा कलम 307 वर कायम राहिला तर त्याचा तपास पोलीस करतील. यात शंकाच नाही. मात्र, तो कसा करतील यात मात्र अनेकांना शंका आहे. जरी हा गुन्हा 307 कामय राहिला तर त्यात पोलीस आणि सहायक पोलीस निरीक्षक देशमुख यांना देखील आरोपी करावे अशा प्रकारची मागणी सादीक यांच्या पत्नीने केली आहे. आता येणार्या काळात जर हा तपास सीआयडीकडे वर्ग होण्याची शक्यता आहेच. त्यात मात्र अनेकांना चौकशीच्या भोवर्यात आणि आरोपीच्या पिंजर्यात उभे रहावे लागणार आहे. गेल्या कित्तेक दिवसांपासून डॉक्टर शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्यांनी हवे तितके यश अद्याप आले नाही. त्यांनी पोलिसांना आपली भूमिका सांगितली आहे. तर पोलिसांनी देखील आता आपली भूमिका समजून घेतली आहे. फक्त त्यासाठी अवघे काही तास आता वेट करावे लागणार आहे. सुदैवाने सादिक बरे व्हावेत हीच इच्छा.!
खरंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग झाला तर याचा सखोल तपास होईल. कारण, यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणात सर्व गंभिर कलमे असून सर्व हकीकतमध्ये संदिग्धता आहे. जर पोलीस खरोखर दोषी नसतील तर त्यांना हकनाक आरोपी करून आरोपाच्या पिंजर्यात उभे करणे योग्य नाही आणि जर दोषी असतील तर त्यांना नक्कीच शिक्षा झाली पाहिजे. कारण, संविधानाच्या अंमलबजावणीची आणि नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्यावर दिलेली आहे. जर रक्षकच भक्षक होत असतील तर ही लोकशाही अपंग झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, एक त्रयस्त म्हणून हा तपास सीआयडी करू शकते. असे नातेवाईकांचे मत आहे. त्यामुळे, आता जसे केडगाव शिवसैनिकांच्या हत्येवेळी पोलिसांनी तो तपास सीआयडीकडे वर्ग करण्याची विनंती केली होती. तशी हे प्रकरण देकील सीआयडीकडे वर्ग करण्यासाठी विनंती करणे अनेकांना अपेक्षित आहे. तेव्हा खर्या अर्थाने दुध का दुध आणि पाणी का पाणी होईल.!