पोलिसांच्या ताब्यात असणाऱ्या आरोपीचा पाच जणांनी केला खून.! भिंगार पोलिसांचा भंगार कारभार.! एसपी साहेब, तर वर्दीवरचा विश्वास उडेल.!

 


सार्वभौम (अहमदनगर) :- 

                                   गुन्ह्यातील आरोपीला ताब्यात घेतल्या नंतर पोलिसांच्या रखवालीत असताना आरोपी सादीक बिराजदार यांचा अखेर मृत्यू झाला आहे. तर, नौटंकी करणाऱ्या भिंगार पोलिसांनी हा हमला नसून तो अपघात दाखवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. त्याची सीआयडी चौकशी लागणार आहे. आता ज्या व्यक्तीवर हल्ला करण्यात आला, त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने भिंगार पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आता,० पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या जवळचा अधिकारी म्हणून भिंगारच्या पोलीस अधिकार्यांचे नाव चर्चेत असते. त्यामुळे, साहेब, यावर कोणती कारवाई करतात की, इतक्या मोठ्या गुन्ह्याला पाठीशी घालतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता, पोलिसांच्या ताब्यात असताना जर मानसे मरु लागत असतील तर, ही यंत्रणा काय करते ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर, एसपी साहेब दोषींवर कारवाई करत नसतील तर हे प्रकरण थेट गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या दरबारात जाणार असल्याची माहिती संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांनी दिली आहे. जखमी व्यक्तीच्या मृत्यू बाबत पोलिसांना विचारणा केली असता त्यांनी या माहितीला दुजोरा दिला.

           याबाबत सविस्तर माहिती अशी की, अ. नगर शहरातील भिंगार कॅम्प हद्दीतील आरोपी सादीक बिराजदार याच्यावर आत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  आता हा गुन्हा दाखल करताना पोलिसांनी पीडित मुलीचे जबाब घेतले असे गृहित धरु. मात्र, पोस्को कलम लावताना नेमकी कोणती कागदपत्रे तपासली ? त्याला सरकारी आधार होता का ? असा प्रश्न संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकांनी उपस्थित केला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी असे मत संबंधित व्यक्तींच्या नातेवाईकांनी व्यक्त केले आहे. तर, बलात्काराच्या गुन्ह्याला निराधर सांगून त्यांनी पोलिसांवर आरोप प्रत्यारोप करीत अर्थपुर्ण तडजोडीतून सादिकवर अन्याय केल्याची खंत व्यक्त करण्यात आली आहे. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी या सर्व घटनेची चौकशी करावी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करुन त्यांना बळीचा बकरा न करता अधिकाऱ्यांच्या या कट कारस्थनाला उघडे करावे अन्यथा न्याय मागण्यासाठी आम्ही थेट मंत्रालय गाठू अशा प्रकारच्या भावना सादिक बिराजदार यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केल्या आहेत. 

            यात विशेष बाब म्हणजे, भिंगार पोलिस आरोपीला ताब्यात घेण्यासाठी ते त्याच्या घरी गेली होते. त्याला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात येत असताना फिर्यादिच्या नातेवाईकांनी सादीकला जबर मारहान केली. म्हणजे, पोलिसांनी देखील एखाद्या चित्रपटात कुख्यात गुन्हेगार वागतात असा लाजिरवाणा प्रकार केल्याचे बोलले जाते. का ? तर केवळ, स्वत:वर कोणतीही कारवाई व्हायला नको, या कानाची खबर, त्या कानला जायला नको.! पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला नको, भिंगार पोलिसाची आब्रु चव्हाट्यावर यायला नको. म्हणजे, एककडे आपल्या डोळ्यादेखत ते ही आपल्या ताब्यात आरोपी असताना त्याच्यावर खुनी हल्ला होतो आणि स्वत:चे पाप झाकण्यासाठी एखाद्या गंभीर गुन्ह्याला अपघात दाखवायचे. इतकचे काय.! तर, या बहाद्दर पोलिसांनी चक्क या बनावट अपघाताची एम.एल.सी (MLC) मध्ये नोंद देखील घेतली. म्हणजे, गुन्हा दडपण्यासाठी कागदी घोडे नाचून पोलीस तयार झाले होेते. मात्र, म्हणतात ना.! कानुन के हाथ लंबे होते हैं.! त्याची प्रचिती येथे पहायला मिळाली. यात एक गोष्ट अधोरेखित करण्यात येते की, ही जी घटना घडली आहे. तेथून अगदी एक किमीच्या अंतरावर पोलीस अधिक्षक कार्यालय, अप्पर पोलीस अधिक्षक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाणे आहे. तरी देखील अशा धक्कादायक प्रकारे खुनी हल्ल्याच्या घटना घडतात. एव्हाना खून होतो, हे किती लाजिरवाणे आहे. त्यामुळे, याचे तरी गांभिर्य अधिक्षकांनी घेतले पाहिजे.

तेव्हा पोलिसांचे बिंग फुटले.!

रुक्सार सादीक बिराजदार सांगतात की, मी माझे पती व अन्य कुटुंब घरी असताना पोलिसांनी आमच्या घराचा दरवाजा वाजवून सादीक असा आवाज दिला. तेव्हा माझे पती सादीक यांनी दरवाजा उघडला असता भिंगार कँम्प पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कर्मचारी बाहेर उभे होते. त्यांनी माझ्या पतीस पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले. त्यांच्यात काही चर्चा झाल्यानंतर ते पतीस गाडीत बसवून घेवुन गेले. मी हा सर्व प्रकार पाहत होते. याच वेळी, पोलिसांच्या जवळच असलेला आजीम उर्फ मुनीया सय्यद याने कुणालातरी फोन लावला आणि म्हणाला की, रशीद भाई...., सादीक को पोलीस लेके जा रही हैं.! तुम आवो पिछेसे दंडे लेके असे मी स्पष्ट ऐकले. त्यानंतर तो तेथून  एका दुचाकीवर निघून गेला. त्यानंतर मी व माझे नातेवाईक लगेच रिक्षाने त्यांचे मागे पोलीस स्टेशनला जाण्यासाठी निघालो. आम्ही भिंगार नाल्याजवळ असताना पोलीसांची गाडी आम्हाला थांबलेली दिसली. तर तिच्या बाजुला एक रिक्षा देखील उभी होती. त्यात,  मुनीया उर्फ अजीम रसुल सय्यद, रशीद रसुल सय्यद, कुददुस रशीद सय्यद, मोईन मुनीया उर्फ अजीम सय्यद, अर्शद मुनीया उर्फ अजीम सय्यद (सर्व रा. दर्गादायरा, मुकुंदनगर, जि. अ.नगर) हे सादीकला पोलीसांच्या समोर त्यांच्या गाडीतून बाहेर काढून लोखंडी रॉडने डोक्यात व इतर ठिकाणी मारहाण करत होते हे आम्हाला रोडचे लाईटीच्या उजेडात दिसले. मारहाण झाल्यानंतर पोलीस सादिकला त्यांच्या गाडीत घेवुन गेले. हा प्रकार झाल्यानंतर मी माझे पती सादीक यांना फोन लावला. तर तो मैनुद्दीन या पोलीस कर्मचाऱ्याने उचलला आणि मला सांगितले की, तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला असून त्याला सिव्हील हस्पिटल येथे नेत आहोत. जेव्हा मी रुग्णालयात गेले तेव्हा माझे पती पुर्णत: बेशुद्ध अवस्थेत होते. मात्र, त्यानंतर वरिष्ठांना हा प्रकार सांगितल्यानंतर हा गुन्हा दाखल केला आहे.

           दरम्यान, सादिक यांच्या पत्नीने जो गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार सादिक यांचा खून करण्यात प्रशासनाचा काही हात आहे का? जर खरोखर मारहाण झाली होती तर पोलिसांनी अपघाताचा बनाव का केला? तेथील सपोनी यांनी याबाबत कंट्रोलला किंवा पोलीस अधिक्षकांना माहिती का दिली नाही? याबाबत स्टेशन डायरीला ऐन्ट्री का केली नाही?  जे कर्मचारी आरोपीला आणण्यासाठी गेले होते ते इतके जबाबदार कसे असू शकतात. म्हणजे, भिंगार पोलीस अधिकाऱ्यांचा पोलीस ठाण्यावर कंट्रोल नाही का? त्याचे कर्मचारी इतकी मोठी धाडस कसे करु शकता? त्यांनी इतकी मोठा कट कोणाच्या भरोशावर आणि कोणाच्या आशिर्वादाने केला? असे अनेक प्रश्न नागरिक उपस्थित करु लागले आहेत. त्यामुळे, हा तपास आता सीआयडी करेलच. मात्र, ज्यांनी कोणी पोलिसांच्या प्रतिमेला असा बेजबाबदारपणाचा डाग लावला आहे, वर्दीचा जर गैरवापर केला आहे. त्यांचे निलंबन नव्हे तर, त्यांना खात्यातून डिसमिस केले पाहिजे. अशी मागणी जोर धरत आहे.

          एकीकडे, भिंगार पोलीस ठाण्यात चांगल्या-चांगल्या अधिकाऱ्यांनी स्वत:ची छाप पाडली आहे. तेथील दुय्यम दर्जाचे अधिकारी देखील अतिशय हुशार होते. जातिय आणि सामाजिक सलोखा राखण्यात यांनी फार मोठी कसरत केली होती. मात्र, तडजोडीतून येणाऱ्या अधिकाऱ्यांनी मात्र भिंगार पोलीस ठाण्याची अस्मिता आता चव्हाट्यावर आणली आहे. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देऊ लागले आहेत. आता महत्वाचे म्हणजे, नगरच्या पोलीस खात्यात कृष्णप्रकाश साहेब, लखमी गौतम, सौरभ त्रिपाठी यांसारख्या अनेक तत्कालिन अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या बाजुने अनेकदा भुमिका मांडली. पण, पोलीस अधिकारी असो वा कर्मचारी. त्यांच्या चुकांना कधी अभय दिले नाही. चुकीला माफी नाही, या वाक्याप्रमाणे त्यांनी वर्दीचा गैरवापर आणि कामात कुचराई करणाऱ्यांवर अगदी कठोर कारवाई केली. त्यामुळे, आता मनोज पाटील हे देखील काय भुमिका घेतात. याकडे सर्व जिल्ह्याचे व पोलीस दलाचे लक्ष लागले आहे. यात काही झाले तरी, गुन्हा कितीही मोठा असो, गुन्हेगार पोलिसांचा आसरा घेऊन स्वत:ला सुरक्षित महसुस करतात. येथे मात्र पोलिसांच्या ताब्यात असताना खून होतो. हे किती लज्जास्पद आहे. त्यामुळे, भिगार पोलिसांवर तथा दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली नाही. तर, जनतेचा वर्दीवर विश्वास राहणार नाही. एकंदर, संगमनेर शहराचे पोलीस उपनिरिक्षक माळी हे किरकोळ कारणात सापडले होते. तरी देखील त्यांचे तत्काळ निलंबन करण्यात आले होते. आता, हा इतका मोठा प्रकार होऊन येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होते. हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

     

दरम्यान, सादिकला आज वैद्यकीय अधिकार्यांनी मयत घोषित केले आहे. त्यामुळे, हा प्रकार म्हणजे "डेथ इन" कस्टडीचा झाला आहे. आता कायदेशिर दृष्ट्या जर एखादा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असताना मयत झाला तर त्याची चौकशी सीआयडी मार्फतच होते. त्यामुळे, या प्रकरणात कलम ३०२ प्रमाणे गुन्हा नोंद होणार यात तिळमात्र शंका नाही. त्यामुळे, यात कोणाकोणाचा फास आवळला जातो हे पाहणे महत्वाचे आहे.