खासदार विखे माजी आमदार वैभव पिचड यांच्या पाया पडले आणि चर्चेला उधान आले.! राजकीय संस्काराचे दर्शन.! तर विखे केंद्रात मंत्री होतील.!

   

- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :- 
                         राज्यात आ. गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यानंतर राजकीय संस्काराची भाषा सुरू झाली आणि ती पवार कुटुंबापासून ते ना. थोरात यांच्या मुलीच्या ट्वीटवर येऊन ठेपली. त्यानंतर सोलापुरात पडळकर यांच्या गाडीवर अज्ञात व्यक्तीने भलामोठा दगड फेकला आणि पुन्हा संस्कार वर्ग सुरू झाला. अर्थात पडळकर यांच्या तोंळापणामुळे असे काही घडणे सहाजिक आहे. मात्र, खरा संस्कार आज खा. सुजय विखे यांच्या वर्तनातून दिसून आला. कारण, आज ते संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे एक हजार वृक्षारोपन करण्यासाठी आले होते, त्यावेळी माजी आ. वैभव पिचड देखील तेथे उपस्थित होते. एका उच्च कुटुंबातील खासदार व्यक्ती आणि दुसरीकडे एक पराभूत झालेला आमदार ते ही समवयस्क तरी देखील शेकडो गावकर्‍यांच्या समोर कोणताही अविर्भाव ठेवता गाडीतून खाली पाऊल पडते ना पडतेय तोच वैभव पिचड यांच्या पायाकडे झुकवितो. हे चित्र पाहताक्षणी अनेकांच्या मनात घर करुन गेलेला खासदार म्हणजे सुजय विखे होय.! आपण 9 वर्षे 5 महिने आणि 5 दिवसाने मोठे असलो तरी सुजयजी खासदार आहेत आणि आपण समवयस्क आहोत असे समजून पिचड यांनी तत्काळ विखे यांचे खांदे पकडले आणि हात जोडून नमस्कार केला. यातून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे आमदार-खासदार, मंत्री झाले म्हणजे आपण काही तीर मारत नाही. कितीही मोठं झालं तरी मतदार, समवयस्क, सहकारी यांचा आदर राखला पाहिजे. अन्यथा काही आमदार किती हवेत आहेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही.
                राज्यात सद्या महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात किती चिखलफेक सुरू आहे. हे नव्याने सांगण्याची काही एक गरज नाही. ना मोठा छोट्यांना समजून घेतो ना छोटा मोठ्यांचा आदर करीत आहे. त्यामुळे, या पुरोगामी महाराष्ट्राला खरोखर राजकीय वारसा राहिला आहे का? हा प्रश्न मनाला भेडसावत आहे. भारतीय चळवळीचा इतिहास पाहता येथे थोरांचा कधी अनादर झाल्याचे पहायला मिळत नाही. मात्र, या मध्य चळवळीत मद्याने अनेक इतिहास घडविले तर अधुनिक राजकारणात गुर्मी सोडून मार्मिक राजकारण फार त्रोटक झाले आहे. अशात जर नव्या दमाचे तरुण जे समोरच्याचा मान सन्मान ठेवतात असे चित्र दिसले तर खरोखर भारतीय संस्कृती आणि संस्काराकडे पाहुन नकळत छाती रुंदावते. अर्थात विखे आणि पिचड यांच्याशी कधी आमचे लागते जुकते नाही. मात्र, आज हा नकळत घडलेला क्षण इतिहासात संस्काराची साक्ष देत राहिला.
                     खरंतर पिचड कुटुंबाने 40 वर्षे काय केले? हा प्रश्न अकोले तालुक्यातील जनतेने आजवर उपस्थित केला. त्याचे उत्तर शोधण्यात आणि देण्यात मला स्वारस्य नाही. मात्र, या कुटुंबाने कधी कोणाचा अनादर केला नाही, कधी कोणाचे वाईट चिंतले नाही, कोणाची राजकीय द्वेेषाने नुकसान केले नाही, ना 40 वर्षे घरात सत्ता आणि राज्याची पदी होती म्हणून जनतेवर आगरा उगरीची भाषा केली. हे शब्द आमच्या पदरचे नाहीत. तर आज विद्यमान आमदारांनी ज्या काही नवनाथ काळे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आणि पोलिसांनी त्यास उचलुन नेवून बेदम मारहाण केली. हे काळे यांच्या तोंडून ऐकल्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया आहेत. त्यातला हा परिपाक आहे. त्यामुळे, राजकारण म्हणजे काय, कार्यकर्ते संभाळणे म्हणजे काय, त्यांना बळ देणे म्हणजे काय आणि राजकीय संस्कार म्हणजे काय? हे पवार, पिचड, थोरात, विखे, जगताप या अशा काही कुटुंबांकडून शिकले पाहिजे.
               खरंतर खा. सुजय विखे म्हणजे स्वर्गिय बाळासाहेब विखेे यांचे नातू तर आ. राधाकृष्ण विखे यांचे सुपूत्र या कुटुंबाने एक राजकीय तप पुर्ण केले आहे. असे असताना स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाने आणि राज्यातील राजकीय गोतावळा पाहता त्यांच्यात जो काही नम्रपणा आहे. त्याला खरोखर दाद दिली पाहिजे. म्हणजे, एकीकडे शरदचंद्र पवार आणि दुसरीकडे एक 36 वर्षाचा एकटा युवक अशा प्रकारची लढत दक्षिण लोकसभेत झाली. तरी देखील वडिल आणि आईच्या विरोधात जाऊन ते भाजपत दाखल झाले आणि संबंध जनतेचा विश्वास आपलासा केला. हा एकटा निघालेला गडी बोलबोल करता जिंकून आला एक खासदार म्हणून त्यांनी नगर शहरासह दक्षिण भागात कोविडच्या काळात स्वत:चा जीव धोक्यात घालुन जनतेचा रक्षक होण्याचे काम केले. इतकेच काय.! तर थेट दिल्लीहून स्व-खर्चाने औषधे आणण्याची जीगर या तरुणाने केली. त्यामुळे, नेतृत्व नवे असले तरी चालेल ते मानसिक दृष्ट्या विकलांग नसावे हे निलेश लंके यांनी सिद्ध करुन दाखविले. तर, आत्मविश्वास आणि मानसिक व आर्थिक दृष्ट्या सक्षम असेला नेता जनतेसाठी काय करु शकतो हे खा. विखे यांनी दाखवून दिले. इतरांनी मात्र 25/15 च्या शासकीय निधीवर विकासाच्या टिमक्या वाजविण्याचे काम केले.
                 खरंतर, भाजपने काही व्यक्तींना बळ देणे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. विशेषत: पवार साहेब ज्या नेत्यांच्या मागे लागले होते. त्यांना जर भाजपकडून बळ मिळाले असते तर त्यांच्याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोण असता. जसे की, गेल्या लोकसभेत डॉ. सुजय विखे यांनी पवार कुटुंबाच्या रिसवर येथे भाजपचे कमळ फुलविले होते. 1991 साली जो काही वाद झाला होता त्याची सल काढण्याचा मानस डॉक्टरांनी धुळीस मिळविला होता. यातील आणखी एक अधोरेखीत मुद्दा म्हणजे पवार हे भाजपच्या विरोधात देशातील सर्व विरोधक एक करत आहे. म्हणजे देशात भाजपला धारेवर धरणार्‍या पवारांना एकट्या विखें यांनी पराभव चारला होता. असे असताना देखील भाजपने सुजय विखे यांना केंद्रात मंत्रीपद दिले नाही. किमान आता माजी खा. गांधी यांनी निधन झाले आहे. त्यामुळे, येथील भाजप कमजोर होत चालली आहे. तसेच नगर शहरात देखील महानगरपालिकेत भाजपला सत्तेतून बाहेर बसावे लागले आहे. त्याच प्रमाणे, झेडपी, जिल्हाबँक ह्या देखील हातातून गेल्या आहेत. त्यामुळे, नगर जिल्ह्यातून भाजपचे वलय कमी होत चालेले आहे. हे लक्षात घेता येणार्‍या काळात केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारात डॉ. विखे यांना नरेंद्र मोदी यांनी स्थान दिले पाहिजे. अशा प्रकारची मागणी होऊ लागली आहे.
                       

तर ज्या पिचडांनी भाजप गाठली त्यांना पाडण्यासाठी पवारांनी सगळे विरोधक एक केले. त्यानंतर पिचड यांच्याकडे भाजपने काय लक्ष दिले? याचे देखील आत्मचिंतन झाले पाहिजे. एकंदर विखे आणि पिचड हे दोघे तरुण राजकारणी आहेत. त्यांच्याकडे प्रचंड संयम आहे. मात्र, यांची बंडखोरी फार नियमितची नाही. कारण, सुजय विखे हे काँग्रेस ते भाजप आणि वैभव पिचड हे राष्ट्रवादी ते भाजप असा प्रवास आहे. मात्र, आता जे काही लोक किंवा लोक पक्षनिष्ठेच्या बाता ठोकतात, त्यांनी आजवर किती वेळा पक्षबदल केले! हे व्यक्तीप्रेम करणार्‍यांनी अभ्यासले पाहिजे. त्यामुळे, ज्याचा फारसा अभ्यास नाही असे उताविळ लोक सोशल मीडियावर स्वत:ला पुढारी समजतात आणि व्यक्तीप्रेम म्हणून इतरांवर टिका करतात, त्यांनी देखील आत्मचिंतन केले पाहिजे. 
सध्या तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जे दक्षिनायन घोडे असतात ते फार काही उड्या मारत नाहीत, ते फार शांत आणि संयमी असता. कारण, त्यांची खासियत अशी असते की, ते कधी बसत नाहीत आणि रेस लावली की ते थकत नाहीत. त्यांचे पळणे फार संयमी असले तरी ते वेगाणे पळतात म्हणून ते लांब पल्ला गाठतात. म्हणून पिचड हे 35 वर्षे आमदार होऊ शकले. तर लोकल उताविळ घोड्यांच्या कथा सांगण्यात तत्थ्यच नाही. त्यामुळे, राजकारण दिर्घकाळ करायचे असेल तर नक्कीच त्या दक्षिणी घोड्यांसारखे संयमी केले पाहिजे. डॉ. सुजय विखे यांची नम्रता, शालीनता आणि संस्कार आज त्यांना खूप काही देऊन गेली. हाच या लेखाचा मर्म होय.!