पवार साहेबांनी तालुक्याचे भाग्य केले तर सुप्रिया ताईंनी वाटोळे.! राष्ट्रवादीचे पदाधिकारी म्हणजे मनमोहन साहेब.!


 सार्वभौम (अकोले) :-

                             कधी न मिळं अन् गटकन गिळं.! या म्हणीप्रमाणे अकोल्यात राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्त्यांना अचानक भली-भली पदे मिळाली आणि मला-मला म्हणत त्यांनी त्यावर कब्जा मिळविला. पदाधिकारी होण्यासाठी कोणी कोणाचे तळवे चाटले हे आता जगजाहिर आहे. परंतु, पदावर विराजमान झाल्यानंतर किमान त्यांनी पडत्य काळात जनतेसाठी काम करणे अपेक्षित होते. या नेत्यांनी नेमकं केलं काय ? असा प्रश्न आता राष्ट्रवादीचे निष्ठावान लोकं उपस्थित करु लागले आहेत. एकतर कामं करा नाहीतर पदं खाली करा. अन्यथा भर सभांमध्ये तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची तंबी कार्यकर्ते देऊ लागले आहेत. इतकेच काय.! आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व अजित दादांनी अकोले तालुक्याचे भाग्य केले आणि सुप्रिया ताईंनी वाटोळे केले अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून येऊ लागल्या आहेत. कारण, अकोल्याचा लोकप्रतिनिधी देताना आदरणीय पवार साहेब आणि अजित दादा यांनी निर्णय घेतला. मग, तालुकाध्यक्ष देताना सुप्रिया ताईंना एक आंगी निर्णय का घेतला? त्यांच्या या पाठबळामुळे, तालुक्यात कार्यकर्त्यांना बळ मिळत नाही, कामे मार्गी लागत नाही त्यामुळे, तालुक्याचे वाटोळे होत असल्याची टिका होत आहे. ऐकीकडे तालुक्यात पदे निवडताना आमदारांचे काही चालत नाही, दुसरीकडे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके (तात्या) हे निर्भिड मानले जाते, परंतु त्यांना ताईंच्या पुढे जाता येईना तर कार्याध्यक्ष संदिप वर्पे हे अकोले तालुक्याबाबत प्रचंड गोंधळात असून त्यांना फार दडपशाही आणि कुरघोडीचे राजकारण जमत नाही. त्यामुळे, हाताची घडी आणि तोंडावर बोट. या सर्वांची गोळाबेरीज पाहता येथे बरीचशी पदे मनमोहन साहेबांसारखी असल्याची टिका सुज्ञ व्यक्तींकडून होत आहे.

                 खरंतर आज कोरोनाच्या काळात जितकी कामे करण्यास, जनतेच्या मनात घर करण्यास संधी आहे. तितकी येणाऱ्या काळात देखील निर्माण होणार नाही. ज्या जनतेने राष्ट्रवादील भरभरुन यश दिले, आज तिच जनता मदतीसाठी नेत्याकडे याचनांची भिक मागत आहे. मात्र, हे नेते कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी खुद्द नॅशनल डिस्कव्हरी चॅनलला विनंती करावी लागेल. एकीकडे वैभव पिचड यांचे समर्थक हे कोठे रुग्णवाहीका पुरवत आहेत तर कोठे बेड उपलब्ध करुन देत आहेत. कोणी किराणा वाटत आहेत तर कोणी औषधे आणि २४ तास मदतीचा हात देताना दिसत आहे. रावसाहेब वाकचौरे याच्यासारखे व्यक्तीमत्व स्वत: कोविड सेंटर चालवत आहे तर अरुण शेळके यांच्यासारखे लोक किराणा वाटप करत फिरत आहेत. चेतनशेठ व सोनालीताई नाईकवाडी यांचे योगदान फार मोठे आहे. या सगळ्यात राष्ट्रवादीचे पदाधिकारी नेमकी काय करतात? याचा शोध घेणे गरजेचे आहे. यांच्याकडून लोकांना मारहाण होणे, शिव्या, दमबाजी आणि तोंडाचे भांडवल या पलिकडे अपवाद वगळता यांचे योगदान काय? राष्ट्रवादीचे १७ शे ६० पदाधिकारी नेमले आहेत. त्यापैकी अगदी बोटावर मोजण्याईतके लोक काम करीत आहेत. बाकीच्यांनी आजवर काय काम केले ? याची यादी केली तर अकोल्यात आपण राष्ट्रवादीचा आमदार देऊन फार मोठी चुक केली  असे वाटल्याशिवाय राहणार नाही.

          खरंतर, राजा तशी प्रजा आणि सेनापती तशी सेना. राजे छत्रपती होऊन गेले ज्यांच्या काळात प्रजा अगदी सुखी नादत होती. आज राजे असे झाले जे नाना कारणांनी घरात दडून बसले आहेत. तर सेनापती म्हणजे टांगा पलटी घोडे फरार असे दिसत आहेत. वास्तव: आज आमदार साहेब आणि सिताराम पाटील गायकर साहेब यांच्यासह अगदी काही लोक सोडले तर पक्ष काय करतोय? असा सहज प्रश्न उभा राहतो. जेव्हा मधुकर पिचड साहेब राष्ट्रवादीत होते तेव्हा गायकर साहेबांकडे एक हाती सत्ता होती. त्यामुळे, त्यांनी तालुक्याला कधी कठीण काळात एकटे सोडले नाही. कारखाना, दुधसंघ, मार्केट कमिटी, पतसंस्था यांच्या माध्यमातून जी काही मदत करता येईल ती केली. परिणामी तेव्हा असला भोंगळा कारभार नसल्यामुळे जनता वाऱ्यावर सोडली जात नव्हती. आज गायकर साहेब पक्षात जास्त हस्तक्षेप न करता स्वत: जनतेच्या भावना जाणून घेत आहेत. स्व-खर्चाने मदत करीत आहेत, मात्र त्यांची जागा कोणी आज पक्षात भरुन काढायला तयार नाही. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे हे कोविडच्या काळात नेमकी काय सेवा करतात आणि काय योगदान देतात हे त्यांनाच माहित. खरंतर त्यांनी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची मोट बांधणे अपेक्षित होते, जनतेला काय हेव पाहण़े, कोविड काळात एखादा राष्ट्रवादी मदत कक्ष उभा करणे, शरदचंद्र पवार साहेब कोविड सेंटर ऊभे करणे, अन्नछत्र उभे करणे, प्राशासनाला व्हॉलेंटीअर्स देणे किती-किती कामे करता आली असती. मात्र, दुर्दैवाने आमदार राजुरहून खाली आले. की मग तिकांडे साहेबांचे दर्शन होते. ते ही साहेबांच्या मागेपुढे.! त्यांचे दर्शन त्यांच्या नेतत्व व संघटन कौशल्यातून झाले असते तर नक्कीच त्यांचे कौतूक करणे अनिवार्य वाटले असते. मात्र, एक तालुक्याचा पालक म्हणून ते अनुत्तीर्ण ठरल्याचे बोलले जात आहे. आता त्यांच्या कार्यक्षमतेवर एकच व्यक्ती नव्हे! तर  अनेकांनी प्रश्नचिन्ह उभे केले आहे. परंतु, तालुक्याचे वाटोळे झाले तरी चालेल. मात्र, ताईंना आडवे जायचे नाही अशी भुमिका जिल्ह्याचे नेते व आमदार महोदय यांनी घेतली असेल तर यावर काही पर्याय नाही. मात्र हीच यंत्रणा गायकर साहेबांच्या ताब्यात असती तर आज तालुक्यात राष्ट्रवादीची वट आणि पदाधिकाऱ्यांचा मिजास काही औरच असता. त्यातून जनता सुखी असती व समाजभिमुख काम झाले असते. यात तिळमात्र शंका नाही.

           आज राष्ट्रवादी सत्तेत आहे. त्यामुळे, जनतेची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. ही अपेक्षा आमदार व पदाधिकारी यांनी पुर्ण करणे हे त्यांचे उत्तरदायित्व आहे. मात्र, अध्यक्ष कार्यक्षम नसल्याने इतर पदाधिकारी करतील तरी काय ? मात्र अशात महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई शेणकर या त्यांच्या परिने धडपड करण्याचा प्रयत्न करतात. इतकेच काय.! संदिप शेणकर यांचे योगदान अगदी नगण्य आहे. प्रभात चौधरी सारखा तरुण रोज पायाला भिंगरी बांधून पळतो आहे. कोविड सेंटरची स्वच्छता असो व महाविकास आघाडीचे बडे पुरविण्याची धडपड वाट्टेल ती कामे हे करत असतात. या पलिकडे युवक अध्यक्ष रविंद्र मालुंजकर यांची गोष्टच जगावेगळी आहे. ते त्यांच्याच धुंदीत गुंग असतात.  मात्र तरी ते प्रांजळ मनाचे आहेत यात शंका नाही. त्यांनी मधल्या काळात थेट नामदार साहेबांना धारेवर धरले होते. त्याची चर्चा राज्यभर झाली. मात्र, दुर्दैवाने त्यांच्याकडे युवक अध्यक्ष पद असूनही त्यांनी असे एकही काम केले नाही. ज्याची राज्यात सकारात्मक चर्चा झाली. त्यांना गावात सरपंचपद मिळाले खरे. त्यामुळे त्यांना तालुक्यात फारसे लक्षा घालता येत नाही. त्यामुळे, त्यांच्याकडून पदावर अन्याय होण्यापेक्षा त्यांनी राजिनामा दिलेले काय वाईट.?  असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मालुंजकर हे धडाडीचे नेतृत्व असले तरी त्यांच्याकडून आजवर उल्लेखनिय काम एकही झालेले नाही. इतकेच काय.! त्यांने नेमलेल्या एकाही व्यक्तेने अधोरेखित काम केल्याचे पुरावे मिळून येत नाहीच. त्यामुळे, पदाला चिकटून बसण्यापेक्षा खरोखर राष्ट्रवादी पक्ष मोठा झाला पाहिजे असे वाटत असेल तर काही व्यक्तींनी स्वयंप्रेरणे़ने आपला राजिनामा देऊन पक्षाच्या वाढिसाठी मदत केली पाहिजे.

अकोले तालुक्यात डॉ. भांडकोळी यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर सर्व अकोले तालुक्याने त्यांच्यासाठी दुवा केली. डॉ. भांडकोळी हे आता एकदम ठणठणीत झाले असून त्यांचे हॉस्पिटल पुन्हा सुरु झाले आहे. डॉक्टर स्वत: कार्यरत झाले आहेत. याची तालुक्यातील जनतेने याची नोंद घ्यावी.