लाखो शेतकर्यांचे कोट्यावधींचे कर्ज माफ होतय.! अकोले-संगमनेरसह राज्यात शेतकरी खुश.! पहा तुम्ही बसताय का.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-
चिनच्या पोटातून जन्म घेतलेल्या कोरोनाने संबंध जगावर अधिराज्य गाजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर को-व्हॉक्सिन शोधून भारताने कोरोनाला मातीत गाडले. परंतु, या दरम्यानच्या काळात अनेकांची घरे उध्वस्त झाली, कर्जामुळे अनेकांनी आत्महत्या केली. घरातील कर्ता पुरूष गेल्याने लाखो संसार उघड्यावर आले. ही सर्व वेदनादायी स्थिती अतिशय संवेदनशिल अभ्यासू व्यक्तीमत्व तथा महाराष्ट्राचे सहकार आयुक्त अनिल कवडे साहेब यांनी अभ्यासली. त्यानंतर त्यांनी एक ऐतिहसिक निर्णय घेतला आणि कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळात ज्या घरातील कर्ता व्यक्ती मयत झाला आहे. त्यांचे सोसायटीत असणारे कर्ज मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, संपुर्ण राज्यात लाखो शेतकर्यांचे कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ होणार आहेत. तर, अकोले तालुक्यात ४७ शेतकर्यांना ५० लाखांपेक्षा जास्त कर्जमाफी मिळणार आहे.
कोरोनासारख्या कडू काळात जे कुटुंब उध्वस्त झाले आहे. त्यांना पुन्हा नव्याने उभे करण्यासाठी ज्याला शक्य आहे. त्याने ते करुन शेतकरी, मजूर आणि व्यापारी यांना सहकार्य करणे अपेक्षित होते. मात्र, काही ठिकाणी हजारो हाथ मदतीला धावले. तर, काही ठिकाणी रक्ताची नाती देखील जवळ आली नाही. अशात सहकार खात्याने या पडत्या काळात शक्यती मदत महाराष्ट्राला केली. इतकेच काय.! त्या दोन वर्षाच्या काळात जिवंत राहण्यासाठी माणूस संघर्ष करत होता आणि त्यानंतर आता जगण्यासाठी संघर्ष सुरू आहे. मात्र, कोरोनाच्या काळातील दवाखान्यांची बिलं, सावकारी कर्ज, डोक्यावर बँक, पतसंस्था आणि सोसायट्यांचा बोजा. त्यामुळे, कोरोनातून जगलेला शेतकरी जिवंत असून मेल्यासारखे जीवन जगतो आहे. त्यामुळे, अनिलजी कवडे साहेब यांनी नगर जिल्ह्यासह अनेक ठिकाणी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांना अगदी ग्राऊंड लेवलच्या शेतकर्यांचे दु:ख माहित आहे. त्यामुळे, त्यांनी अगदी महत्वपुर्ण ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
सहकार आयुक्त अनिलजी कवडे साहेब यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. की, कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात उद्भवलेल्या भीषण परिस्थितीमुळे सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे. कोरोना काळात कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने अनेकांना मोठी झळ बसली आहे. मयत कर्जदाराचे राहते घर, इतर मालमत्ता तारण असल्यामुळे कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे, अशी जी काही कुटुंब आहेत. त्यांचा तपशील सहकार आयुक्त अनिलजी कवडे साहेब यांना तत्काळ मागविला आहे. त्यामुळे, राज्यात लाखो शेतकर्यांना फार मोठा दिलासा मिळणार असून हे कुटुंब बेघर होण्यापासून वाचणार आहेत. या निर्णयाचे महाराष्ट्रातून स्वागत होत असून कवडे साहेब यांचा तो आदेश सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. तर अनेक शेतकर्यांच्या व त्यांच्या मुलांच्या स्टेटसला दिसतो आहे.
आता हा निर्णय एकट्या नगर जिल्ह्यासाठी नव्हे.! तर, संपुर्ण राज्यासाठी लागू करण्यात आला आहे. त्यामुळे, कोरोना काळातील दोन वर्षात ज्या सोसायटी कर्जदार शेतकर्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांची माहिती, कर्ज, मुळ रक्कम, व्याज व अन्य माहिती जिल्हा बँक ही त्यांच्या प्रत्येक तालुक्यातील शाखांकडून गोळा करत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून १४६ सोसायट्यांपैकी ४७ सोसायट्यांचे कर्जदार यात पात्र होण्याची शक्यता आहे. तर, ५० हजार पेक्षा जास्त कर्ज यांचे माफ होणार आहे. अशी राज्यात लाखो शेतकरी असून कोट्यावधी रुपयांचे कर्ज माफ होणार आहेत. त्यामुळे, सरकारसह सहकार आयुक्त अनिल कवडे साहेब यांचे अनेक शेतकर्यांच्या मुलांनी आभार मानले आहे.