कॉलेज सोडून इन्स्टाग्राम खेळणारी विद्यार्थीनी अडकली प्रेमात, अत्याचार करणारा घातला जेलात.! त्याने तिचे लग्न मोडले.!


सह्याद्री सार्वभौम (संगमनेर) :- 

                             संगमनेर शहरातील नामांकीत कॉलेज मध्ये बी.सी.ए चे शिक्षण घेणाऱ्या तरुणीची ओळख इंस्टाग्रामवर एका तरुणासोबत झाली. मंग काय! हाय, बाय, हॅलो फोनवर बोलणे सुरू झाले. दोघांमध्ये मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघे ही एकमेकांना भेटण्यासाठी घुलेवाडी परिसरात आले. तिथे एकमेकांसोबत फोटो काढले तेच फोटोवरून तरुणाने पिडीत २१ वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करून वेळोवेळी अत्याचार केला. ही सर्व धक्कादायक घटना सप्टेंबर २०२५ ते डिसेंबर २०२५ पर्यंत वेळोवेळी घडली. जेव्हा पिडीत २१ मुलीचे लग्न जुळले तेव्हा याने आमचे प्रेम संबंध आहे. रजिस्टर लग्न झाले आहे असे सांगून लग्न मोडले. हा तरुण पिडीत मुलीची बदनामी करत असल्याचे जेव्हा लक्षात आले तेव्हा पिडीत मुलीसह नातेवाईकांनी थेट पोलीस ठाणे गाठले व घडलेला सर्व प्रकार पोलिसांपुढे कथन केला त्यानंतर २१ वर्षीय पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारी वरून आरोपी मकरंद संजय गोडगे (रा. चिंचोलीगुरव, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच आरोपी मकरंद गोडगे याला तात्काळ अटक केली. त्याला न्यायालयापुढे हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.

          याबाबत सविस्तर माहिती अशी की, सिन्नर तालुक्यातील एक तरुणी संगमनेर शहरात शिक्षण घेण्यासाठी येते. येथे नामांकीत कॉलेज मध्ये बी. सी. ए चे शिक्षण घेत असताना तिची ओळख  वी इंन्स्टाग्रामवर आरोपी मकरंद गोडगे याच्यासोबत होते. ओळखीचे रूपांतर हळूहळू मैत्रीत होऊ लागले. मंग काय! हाय, हॅलो,बाय फोनवर बोलणे सुरू झाले. त्यांची घट्ट मैत्री झाल्याने जवळीकता वाढू लागली. त्यानंतर आरोपी मकरंद गोडगे याची घुलेवाडी येथे एक रूम आहे तिथे भेटण्यासाठी बोलवले. तिथे २१ वर्षीय पिडीत मुलगी ही भेटण्यासाठी गेली. तेथे रूमवरती आरोपी मकरंद गोडगे यांच्यासोबत पिडीत मुलीने फोन मध्ये फोटो काढले. सप्टेंबर २०२५ मध्ये घुलेवाडी परिसरातील रूमवर भेटले त्यावेळी आरोपी मकरंद याने पिडीत मुलीला ब्लॅकमेल केले. तुझे फोटो काढलेले व्हायरल करील अशी धमकी देऊन तिच्यावर अत्याचार केला. आरोपी मकरंद हा पिडीत २१ वर्षीय मुलीला फोनद्वारे वारंवार त्रास देऊ लागला. ऑक्टोबर २०२५  मध्ये पिडीत मुलीच्या कॉलेजला सुट्टी लागल्याने ती सिन्नर तालुक्यातील आपल्या गावी घरी जाते. 

           दरम्यान, आरोपी मकरंद हा फोन करून पिडीत मुलीला नेहमी भेटण्यासाठी बोलवत होता. परंतु, पिडीत मुलगी ही घरी असल्याने ती नकार देत होती. त्यानंतर कॉलेजची सुट्टी संपली. पिडीत मुलगी ही शिक्षणासाठी पुन्हा संगमनेरात येते. तेव्हा आरोपी मकरंद याचा पुन्हा फोन येतो. त्यावेळी तो म्हणतो की, माझे आई वडील बाहेर गावी गेले आहे. तू भेटण्यासाठी माझ्या घरी ये. पिडीत मुलगी ही आरोपी मकरंद याला भेटण्यासाठी बसने चिंचोली गुरव येथे जाते. तेथे घरी गेल्यानंतर पुन्हा आरोपी मकरंद हा ब्लॅकमेल करतो आणि तिच्यावर जबरी संभोग करतो. त्यानंतर २१ वर्षीय पिडीत मुलगी ही रूमवर येते तिथे तिचा मामा देखील आलेला असतो. तेव्हा आरोपी मकरंद याचा फोन येतो. तो फोन मामा उचलतो तेव्हा आरोपी मकरंद याला समजावून सांगतो की, तु हिला फोन करू नको, तिच्या सोबत काही संबंध ठेऊ नको. असे म्हणुन मामा पिडीत २१ वर्षीय मुलीचे कॉलेज बंद करून सिन्नर तालुक्यातील गावी नेतात. त्यानंतर पुन्हा आरोपी मकरंद हा पिडीत मुलीच्या मामाला फोन करून दमबाजी करतो.

          दरम्यान, १० मार्च २०२६ रोजी पिडीत २१ वर्षीय मुलीचे कोपरगाव तालुक्यातील मुलासोबत लग्न जमते. त्यावेळी आरोपी मकरंद हा पिडीत मुलीच्या नातेवाईकांना सांगतो की, हिचे आणि माझे प्रेमसंबंध आहे. आम्ही रजिस्टर लग्न केले आहे. त्यानंतर कोपरगाव तालुक्यातील मुलासोबत लग्न जमले तिथे देखील आरोपी मकरंद हा त्याच्या मित्रांना फोनवर रजिस्टर लग्न झाल्याचे बनावट कागदपत्र टाकून पिडीत मुलीचे लग्न मोडतो. जेव्हा हा सर्व प्रकार पिडीत मुलीच्या नातेवाईकांना समजतो तेव्हा त्यांची तळपायाची आग मस्तकात जाते. आरोपी मकरंद हा पिडीत मुलीची बदनामी करत असल्याचे लक्षात येताच पिडीत २१ वर्षीय मुलगी व नातेवाईक थेट संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठतात. तिथे आरोपी  मकरंद याला पाठीशी न घालता घडलेला सर्व प्रकार कथन करतात. त्यानंतर आरोपी  मकरंद संजय गोडगे (रा. चिंचोलीगुरव, ता. संगमनेर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात बलात्कारसह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहे.