आमदार व तहसिलदारांना अभिामान नव्हे.! लाज वाटायला पाहिजे.! दराडेंचा घनाघाती आरोप.!
- सागर शिंदे
सार्वभौम (अकोले) :-देशातील कोरोना अकोले तालुक्यातील वाडी वस्तीवर येऊन पोहचला असताना येथील जनता रोज मृत्युला सामोरे जात आहेत. असे असताना अकोले तालुक्याचे आमदार डॉ.किरण लहामटे हे पत्रकार परिषद घेऊन तालुक्यात सर्व काही अलबेले आहे अशी वल्गना करीत आहेत. मात्र, वास्तवत: समशेरपूर येथे जे कोविड सेंटर उभारले आहे. तेथे 427 रुग्ण उपचार घेऊन गेले. अशा परिस्थितीत साधी एक भेट देखील त्यांना देऊ वाटली नाही. इतकेच काय! तससिलदार आणि आरोग्य यंत्रणेचा एकही अधिकारी किंवा डॉक्टर येथे फिरकला नाही. त्यामुळे, केवळ पिचड नावाची अॅलर्जी मनात धरुन जनतेला आमदारांनी निव्वळ वार्यावर सोडल्याचे पहायला मिळाले आहे. साहेब! आढळा परिसरातील लोकांनी देखील तुम्हाला मतदान केले होते. बिताका ते गणोरे अशा 55 हजार मतदारांना तुम्ही द्वेषापोटी भेटले नाहीत, तर मुकेश कांबळे यांनी देखील तालुक्याचे कमांडर ऑफिसर म्हणून आपली जबाबदारी पार पाडली नाही. उलट पत्रकार परिषदा घेऊन तालुक्याचा आम्हाला अभिमान वाटतो असे बोलताना यांना काहीच कसे वाटत नाही. उलट यांना असे बोलताना लाज वाटली पाहिजे अशा प्रकारची टिका संदिप दराडेे आणि रावसाहेब वाकचौरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
अकोले तालुक्यात 11 हजार 471 रुग्ण कोरोना पॉझिटीव्हचे आहेत. त्यापैकी आज 493 रुग्ण अॅडमिट आहेत. 165 जणांनी कोरोनापुढे माथा टेकून आपला प्राण सोडला आहे. तर, 70 हजार 304 संशयितांची कोरोना चाचणी झाली आहे. हे आकडे पाहता तालुक्यात कोरोनाचा हाहाकार माजला आहे असे म्हटल्यास वावघे काय आहे? असे असताना तहसिलदार मुकेश कांबळे हे समशेरपूर येथील कोविड सेंटरला गेेल्या दोन महिन्यात एकदा देखील भेट देत नाहीत. की, ज्या ठिकाणी 427 रुग्ण म्हणजे 110 बेड असलेले कोविड सेंटर आहे. मग, यांना तालुक्याचे कमांडर ऑफिसर म्हणावे तरी कसे? भलेही यांना राजकीय दबाव असेल, मात्र तरी देखील तालुक्याचे प्रशासकीय पालक म्हणून यांनी कोविड सेंटरला येणे अनिवार्य होते. औषधे, सेवा सुविधा, डॉक्टर, उपचार यांवर लक्ष ठेऊन मदत करणे किंवा त्यांनी नियंत्रण ठेवणे अपेक्षित होते. परंतु, कोणी जगल्या मोल्याचा निरोप देखील यांनी घेतला नाही. त्यामुळे, एखादा अधिकारी इतक्या मोठ्या दबावाला बळी पडू शकतो.! ही फार मोठी आश्चर्याची बाब आहे. इतकेच काय.! आरोग्य विभागाचे एकही डॉक्टर इकडे फिरकले नाहीत. डॉ. गंभीरे यांची गेल्या महिन्यातील एक भेट वगळता नोडल अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे यांना देखील इकडे भटकावे वाटले नाही. त्यामुळे, तालुका प्रचंड धोक्यातून जात असताना या अधिकार्यांनी अशा प्रकारे आपल्या कामात कसूर करणे हे कितपत योग्य आहे? त्यामुळे, यांच्या तक्रारी आम्ही शासन दरबारी मांडणार आहोत.
खरंतर समशेरपुरच्या कोविड सेंटरबाबत फार राजकारण झाले आहे. कारण, केळी येथे अवघे 10 रुग्ण असताना त्याची नोंद कलेक्टर कार्यालयात झाली. मात्र, समशेरपूर येथील नोंद होऊ दिली नाही. तनपुरे साहेबांनी समशेरपूर कोविड सेंटरला पाच सिलेंडर दिले होते. ते आमच्यापर्यंत येऊ दिले नाहीत. ना कुठली दवा ना कोठली दुवा, ना कोणाच्या भेटी ना कोणाची मदत. का? तर म्हणे त्या कोविड सेंटरला नाव पिचड साहेबांचे आहे म्हणून. या पुरोगामी तालुक्यात अशा प्रकारचा द्वेष कधी कोणी केला नाही. मात्र, दुर्दैवाने लोकप्रतिनिधी यांनी तर केलाच केला. त्यानंतर प्रशासनाने देखील केल्याने फार वेदना झाल्या आहेत. यापेक्षा दु:ख असे की, तालुक्याचे आमदार डॉक्टर असून देखील येथील आरोग्य त्यांना आबाधीत ठेवता आले नाही. यापेक्षा वाईट काय असू शकते असे दराडे म्हणाले. काही झालं तरी, आम्ही तालुक्यातील जनतेला वार्यावर सोडणार नाही. ऐनवेळी रावसाहेब वाकचौरे यांच्यासारखा दानशूर व्यक्ती आढळा विभागात धावून आला नसता तर आज 55 हजार लोक भयभित होऊन भेदरली असती. या कोविड सेंटरला 10 लाख रुपयांपर्यंत खर्च लागला आहे. तो सरकारी यंत्रणेच्या एका गोळीशिवाय उभा केला आहे. अर्थात चोच दिली त्याने चारा देखील निर्माण केला आहे. त्यामुळे, आम्हाला आमेरीका आणि अन्य राज्यांतून मदत झाली. दुर्दैव इतकेच की, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने इकडे दुर्लक्ष केले, याचे फार वाईट वाटले.
या पत्रकार परिषदेत संदिप दराडे यांनी बाजीराव दराडे यांचे नाव न घेत तोंडभरुन टिका केली. ते म्हणाले की, समशेरपूर गटाचे लोकप्रतिनिधी हे केवळ धमक्या देण्यात आणि शिवागाळ करण्यात माहिर आहेत. त्यांच्याकडून कोरोना काळात कोणत्याही प्रकारची मदत झाली नाही. त्यामुळे, प्रशासन, आमदार आणि झेडपीचे लोकप्रतिनिधी यांच्यावर तोंडसुख घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. खरंतर संदिप दराडे यांनी गेल्या दोन महिन्यांपासून समशेरपूर येथे तळ ठोकला आहे. लोक घराच्या बाहेर पडत नसताना त्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता शेकडो लोकांची सेवा केली आहे. त्यामुळे, आज कोरोनाची लाट वसरते आहे. हे दोन महिन्यांचे दु:ख मनात साठवून त्यांनी पत्रकरांजवळ आपल्या भावनांची वाट मोकळी करुन दिली. तर आमदार साहेबांनी काल (दि.3 जून)पत्रकार परिषद घेऊन तालुक्यात कोरोनाची परिस्थिती आणि सर्व काही अलबेले सुरू आहे. असे सांगितले, त्यावर संताप व्यक्त करीत त्यास प्रतिउत्तर म्हणून आज पत्रकार परिषद घेऊन प्रशासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
यात राजकारण होतय.!
आमदार डॉ. लहामटे यांच्याकडून समशेरपूर येथे दुर्लक्ष केले नाही. त्यांनी एकदा भेट दिली आहे. असे काही झाले असेल तरी त्यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता 24 तासातले 18 तास जनतेत घालविले आहे. उगच राजकारण नको, आणि श्रेय्यवादाचा लढा उभा राहायला नको. यासाठी त्यांनी नंतर काना डाळा केला असेल. मात्र, जनता त्यांच्यावर प्रेम करते आणि करत राहील. कोणी कितीही आरोप केले तरी जनता त्यांच्या कामाचे मुल्यमापन करते आहे. ते स्वत: पॉझिटीव्ह झाले तरी ते जनतेचे प्रश्न सोडवत होते. त्यांनी कोणाचा द्वेष केला नाही. ज्यांना राजकारण करायचे आहे. तेच त्यांच्यावर आरोप करीत आहेत.
- भाविक खरात (आमदार समर्थक)
हे जनतेला पटलं नाही.!
प्रशासन आणि आमदार यांना सर्व जनता सारखीच असायला हवी. मात्र, त्यांच्याकडून खरोखर दुजाभाव झाला आहे. आज गेल्या कित्तेक दिवसांपासून आम्ही समशेरपूर येथे कोविड सेंटर चालवत आहोत. यांनी साधी विचारणा देखील केली नाही कोणी भेटायला देखील आले नाही. कोविड सेंटरचे नाव सोडा, जनता तर तुमची आहे ना? मग त्यांना केवळ आधार जरी दिला असता तरी पुरे होते. मला राजकार करायचे नाही. परंतु तालुक्यात एका सीसीसीमध्ये 427 रुग्ण उपचार घेतात त्यांच्याकडे कोणी डोकावून देखील पाहु नये, इतका द्वेष चांगला नव्हे. हेच मला स्पष्ट करायचे आहे.
- रावसाहेब वाकचौरे (व्हा.चेअरमन, दुधसंघ अकोले)