पैसे दे अन पेशन्ट घेऊन चालता हो.! लाखोंचे बिल घेऊन डॉक्टरने पेशन्ट हाकलुन दिले.! तो घरीच अखेरच्या घटका मोजतोय.! निर्दयी दुनियेत गरिबांच्या किंकाळ्या.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेरमध्ये कोरोनाने थैमान घातलेले असताना काही दिवसांपुर्वी साधा बेड मिळणे कठीण झाले होते तर व्हेंटिलेटरचा बेड मिळवणे म्हणजे जिकरीचे काम होते. त्यामुळे, पेशंटला जो बेड उपलब्ध होईल त्यावर पेंशट उपचार घेत होते आणि बेड मिळाला म्हणुन आपली धन्यता मानत होते. पण, याचाच गैरफायदा एका हॉस्पिटलने चांगलाच उठवला आहे. पैसे उकळण्यामध्ये तो अतिशय "प्रवीण" झाल्याचे देखील बोलले जात आहे. या हॉस्पिटलमध्ये आय.सी.यु व्हेंटिलेटरशिवाय विलगिकरण कक्षेत ठेवलेल्या पेशंटकडून अवाजवी पैश्याची मागणी केली जाते. तसेच व्हेंटिलेटर बेडशिल्लक नसताना देखील व्हेंटिलेटर बेडचे बिल लावले जाते. पण, जेव्हा पेशंट ऍडमिट केले तेव्हा व्हेंटिलेटरचे बेडच शिल्लक नव्हते तर व्हेंटिलेटरचे बिल कसे? असा प्रश्न प्रशासनाला केल्यानंतर रुग्णाच्या नातेवाईकांकडे सुधारित दुसरे बिल देण्यात आले. पण, त्यामध्ये आश्चर्याची बाब म्हणजे 30 हजार रुपये डिपॉझीट घेऊन देखील (पवती आहे) ती अंतिम बिलात वजा न करता बिल रुग्णांच्या नातेवाईकांकडे दिले गेले. हे लक्षात आणुन देण्याचा प्रयत्न रुग्णाच्या नातेवाईकांनी केला परंतु असे कुठलेही डिपॉझिट आम्ही स्विकारलेलीच नाही म्हणत पैसे भरण्यास तगादा लावला. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणुन देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे प्रशासनाने देखील डॉक्टरला पाठीशी घालुन गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला. यावरून संतप्त पीडिताच्या नातेवाईकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह डॉक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस अधीक्षकांसह अन्य ठिकाणी केली आहे. एका सामन्य रुग्णाने धारिष्ट दाखवून तसेच सर्व सरकारी व्यवस्थेच्या दबावाला बळी न पडता संगमनेर तालुक्यातील एका सामान्य घरातील रुग्णाने पुढे येऊन दाखल केलेली ही तक्रार संगमनेरातील पहिलीच तक्रार ठरली आहे. आज लाखो रुपये बिल भरुन देखील रुग्ण घरीच अॅक्सिजन घेत अखेरच्या घटका मोजत आहे. होते नव्हते सगळे लुटले, माणुसही निश:ब्द करुन ताब्यात दिला. पैसे भरा आणि चालते व्हा.! या शब्दांनी त्या व्यक्तीच्या भावना हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या विरोधात प्रचंड तिव्र असल्याचे जाणविले आहे. देव जाणे.! हा भयान कोविड संघर्ष किती अंत पाहणार आहे, किती जीव घेणार आहे आणि कोठे स्थिर होणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील मालदड येथील एका व्यक्तीला शारीरिक त्रास होऊ लागल्याने त्यांनी चंदनापुरी येथे कोरोनाची चाचणी केली. कोरोनाचे लक्षणे दिसत असल्याने त्यांनी त्याच दिवशी एच.आर.सी.टी. स्कॅन केला. यामध्ये रुग्णाचा स्कोअर 19 इतका आला. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये बेड शोधण्यास सुरवात केली. शहरातील नवीन नगर रोड परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये विचारणा केली असता त्यांच्याकडे व्हेंटिलेटर बेड शिल्लक नव्हता. परंतु आय.सी. यु बेड खाली होता. त्यामुळे त्यांना शनिवार दि.1 मे रोजी पाहटेच्या सुमारास आयसोलेशन आय.सी. यु बेडवर उपचार सुरू केले. त्यानंतर त्यांना 9 दिवस ह्याच बेडवर उपचार करण्यात आले. कालांतराने त्यांना बायपॅप सुविधा असणाऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आले. 11 दिवस ह्याच वॉर्डमध्ये उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सांगण्यावरून पेशंटला 20 दिवसांचे डिस्चार्जचे बिल करण्यात आले. ह्या 20 दिवसात रुग्णाचे बिल आभाळाला भिडले होते. प्रतिदिन 9 हजार रुपये दराने 1 लाख 80 हजार इतके बिल रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात देण्यात आले. परंतु 20 दिवस रुग्ण बायपॅप सुविधेवर नसल्याचे रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. परंतु हॉस्पिटलने रुग्णाच्या नातेवाईकांना या बिलामध्ये कुठलीही चुक नाही असे ठणकावून सांगितले. त्यानंतर हे बिल प्रशासनाला कळवले. मग मात्र, हॉस्पिटलने दुसरे सुधारित बिल दिले. त्यामध्ये 9 दिवस आयसोलेशन आय.सी.यु व 12 दिवस बायपॅप दाखवून 1 दिवसाचा घोळ करून बिल रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातात दिले. यामध्ये सुरवातीस दिलेले 30 हजार रुपये डिपॉझिट देखील बिलामध्ये वजा केलेले नसल्याचा घोळ रुग्णाच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. परंतु प्रशासनाने नेमलेले ऑडिटरांनी देखील डोळ्यावर पट्टी बांधुन हॉस्पिटलला पाठीशी घातले. या सर्व प्रकराबाबत रुग्णाच्या नातेवाईकांनी वारंवार प्रशासनाला कळवले मात्र, त्यांनी या सर्व विषयाकडे कानाडोळा करत यावर सोयीस्करपणे पडदा टाखण्याचे काम केले. खरंतर, 1 लाखापेक्षा जास्त हॉस्पिटलचे बिल असेल तर प्री-ऑडिट करणे तहसीलदारांनी बंधनकारक केलेले असताना देखील त्याचा विसर स्वतः तहसीलदारांनाच पडलेला दिसतो. त्यामुळे या सर्व गोंधळलेल्या व्यवस्थेविरुद्ध रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केली आहे. या तक्रारीत तहसीलदार व ऑडिटर यांच्यावर देखील फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
कोविड संकटात शासनाने खाजगी रुग्णालयांना बिलांच्या संदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहे. मात्र, काही रुग्णालयांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले नाही. उलट रुग्णाकडून भरघोस रकमांची बिले धाक दडपशाहीने वसुल केली. वेळ काळ प्रसंग ओळखुन रुग्णांनी कर्ज काढुन, जमिनी विकुन, आया-बहिणींचे सोनं गहाण ठेऊन आपल्या माणसांसाठी या रुग्णलयांच्या माथ्यावर लाखो रुपयांची बिल चुकती केली. परंतु या लाखो रुपयांच्या बिलांमागे दडलेला सावळा गोंधळ आता संगमनेरात पाहायला मिळत आहे. मात्र, सामान्य रुग्णांना न्याय मिळून द्यायला संगमनेरात कोणाचा आधार नाही, हेच यामधून स्पष्ट झाले आहे. दाखल झालेली ही एक तक्रार एक सुरवात आहे परंतु भावनांचा कडेलोट कधी होईल हे रुग्णांच्या टाळुवरील लोणी खाणाऱ्यांना समजणार सुद्धा नाही. हाच इशारा या तक्रारीतून वैद्यकीय क्षेत्राला आणि शासकीय अधिकाऱ्यांना दिला आहे. दरम्यान, जर प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यावर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवायचा असेल तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 197 प्रमाणे सक्षम प्राधिकारी म्हणुन राज्यशासनाची पुर्वपरवानगी असणे आवश्यक असल्याने त्यासंदर्भात राज्यशासनास पत्रव्यवहार लवकरात-लवकर करणार असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हे अधिकारी ज्या कलमात दोषी असतील त्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी तक्रारदार पाठपुरावा करणार आहे. आता आरोग्यमंत्री ते अन्य खात्यांकडे ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या पलिकडे एका तज्ञ वकीलाच्या मार्फत हे प्रकरण न्यायालयात देखील दाखल करणार आहे. आता काही झालं तरी लढणार असे म्हणत आश्रू अनावर करीत तक्रारदाराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या महामारीत एकीकडे काही डॉक्टर हे खरोखर देवदुत म्हणून रुग्णांची सेवा करीत आहेत. तर, काही निव्वळ आर्थिक लोभापोटी रुग्णाचा छळ करीत आहेत. काही डॉक्टरांना कोविड संदर्भात फारसे काही ज्ञाक नाही. तरी देखील त्यांनी आपला व्यवसाय नटविला आहे. खरंतर जे ज्ञानी तथा अभ्यासू डॉक्टर आहेत त्यांचे हेच म्हणणे आहेत की, आम्ही असे फार रुग्ण पाहिले आहेत. जे तुर्तास एखाद्या स्थानिक डॉक्टरांकडे जातात, ते थातूर मातूर उपचार करतात, त्याचा कोणताही परिणाम होत नाही परिणामी कोविड पेशन्टचा स्कोअर वाढतो आणि १५ ते २० स्कोअर होऊन सॅच्युरेशन ७० ते ८० वर येते. अशा परिस्थितीत माणूस खचतो आणि घाबरुन अंतीम स्टेजला जातो. आता असे हजारो आणि लाखो रुग्ण आहेत. ज्यांचे जीव मृत्युच्या उंबऱ्याशी झुंजले आहेत. त्याला जबाबदार कोण ? त्यामुळे, काही डॉक्टर आणि रुग्णालये यांनी नैतिकता जोपासली पाहिजे असा आवाज प्रत्येक जनसामान्य व्यक्तीच्या मुखातून बाहेर पडत आहे. मानवाने निसर्गावर अन्याय केला, त्याच्या अतिरेकाची फळे आज माणूस भोगीत आहे. त्यामुळे, जो आज कोरोनाला धनसंचय म्हणून पाहत आहे, त्या प्रत्येकाला एक दिवस अशा आपत्तीला याची देही याची डोळा सामोरे जावे लागेल. हाच तळतळाट सामान्य माणूस लुटेऱ्या व्यक्तींना देत आहे.
- सुृशांत पावसे
अकोले तालुक्यात डॉ. भांडकोळी यांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर सर्व अकोले तालुक्याने त्यांच्यासाठी दुवा केली. डॉ. भांडकोळी हे आता एकदम ठणठणीत झाले असून त्यांचे हॉस्पिटल पुन्हा सुरु झाले आहे. त्यामुळे, तालुक्यातील जनतेने याची नोंद घ्यावी.