आता रे बुवा.! पीआयच्या जागी सपोनी इन्चार्ज.! अभय परमारांची कट्रोलवर धडक, मिथुन घुगे नवे अधिकारी.!


सार्वभौम (अकोले) :- 

                     अकोले तालुक्याला चळवळीची परंपरा असल्यामुळे येथे भलेभले अधिकारी येण्यासाठी वचकतात. येथे मामलेदार जाळून मारल्याचा देखील इतिहास साक्ष देतो.  इतकेच काय.! गेल्या १० वर्षापुर्वी अकोले पोलीस ठाण्यात थेट पोलीस निरीक्षक यांना भर चौकीत मारहाण करण्यात आली होती. त्या पाठोपाठ तत्कालिन पोलीस निरीक्षक आरविंद जोंधळे यांची बदली करण्यासाठी आजी-माजी आमदारांनी पोलीस अधिक्षकांचे डोके खाल्ले होते. त्यांचे काम सरळ असल्यामुळे त्यांनी कोणाला जुमानले नाही. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांना जनतेच्या फार मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांच्यानंतर संगमनेर शहरात नाविण्यपुर्ण काम करणारे पोलीस निरिक्षक अभय परमार यांची अकोले येथे नियुक्ती करण्यात आली. मात्र, त्यांना समुद्रात पोहायची सवय आणि त्यांना या छोट्याशा तलावात काय इंन्ट्रेस येणार.! त्यांच्या कार्यकाळात कर्मचाऱ्यांना इतका फ्रिडम मिळाला. की, त्यांनी कामधंदे सोडून मालमत्ता उभ्या करण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यांच्या स्वप्नांचा चुराडा करण्याचे काम लाचलुचपत विभागाने केले. परिणामी परमार यांना आपला गाशा गुंडाळावा लागला. साहेबांची बदली होताच काही कलेक्टर मनसे नाराज झाले. त्यांच्या सदम्याचे पडसाद सोशल मीडियातून उमटताना दिसले. आता अकोले पोलीस ठाण्यात सहायक पोलीस निरिक्षक मिथुन घुगे यांची नव्याने नियुक्ती केली आहे. वास्तवत: भल्या-भल्या अनुभवी पोलीस निरीक्षकांना हे पोलीस ठाणे संभाळता आले नाही. तर त्यांच्या हाताखाली काम करणारे सपोनी हे पोलीस ठाणे कसे चालवू शकतील यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत.

          नगर जिल्ह्यात तत्कालिन पोलीस अधिक्षक लखमी गौतम हे असे अधिकारी होते. की, त्यांना पोलीस निरिक्षक यांचे ऐवजी सहायक  पोलीस निरिक्षक यांच्यावर फार विश्वास होता. म्हणजे यंग जनरेशनवर ते प्रभावी होते. मला निधड्या छातीचे शंभर तरुण द्या. मी संपुर्ण भारत देश घडून दाखवितो असे स्वामी विवेकानंद म्हणत असे. त्यामुळे, लखमी यांनी नगरमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी काही तरुण अधिकाऱ्यांची नियुक्ती केली होती. जसे की, नगर तालुक्यात सपोनी विनोद चव्हाण, कोपरगाव तालुका प्रकाश पाटील यांसारख्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली तर शहरात नव्याने कारवाईसाठी ५२ जणांची नियुक्ती केली होती. यात वाळु कारवाईतून सर्वात मोठा महसूल जमा झाला होता. त्याप्रमाणे मनोज पाटील यांनी देखील असाच काहीसा पायंडा उचलला आहे की काय ? असा प्रश्न पडला आहे. मात्र, पाटील यांनी कोणते पथक नेमले नाही, उलट सब-पोलीस ठाण्यात पोलीस निरिक्षक दिले आहेत. त्यामुळे, हा युवकांना संधी देण्याचा मानस म्हणावा तरी कसा ? यावर पोलीस निरिक्षकांमध्ये नाराजी निर्माण झाली असून याबाबत काही अधिकार्यांनी यावर अक्षेप घेत वरिष्ठांकडे दाद मागणार असल्याची माहिती दिली आहे.

         खरंतर जिल्ह्यात आश्वी, राहाता यांसह अनेक ठिकाणी पोलीस निरिक्षकांचा कार्यकाळ संपलेला आहे. तर सध्या नगरच्या नियंत्रण कक्षेत पाच पोलीस निरिक्षक पोलीस ठाण्याच्या नियुक्तीत वेटींगला आहेत. असे असाना देखील अकोले पोलीस ठाण्यासारख्या ठिकाणी साईड ब्रँन्चला असलेले सहायक पोलीस निरिक्षक देणे हे कितपत योग्य आहे.? येथे लॉकडाऊनच्या काळात देखील कोतवाली, तोफखाना, नेवासा, श्रीरामपूर या भल्याभल्या पोलीस ठाण्याइतका क्राईम रेशो आहे. तर गेल्या लॉकडाऊनमध्ये अकोल्यात ३ महिन्यात २६ दंगलीचे गुन्हे दाखल आहेत. इतकेच काय.! १२ ते १४ खून आणि महिला अत्याचार असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. हे जोंधळे साहेब यांच्या काळात जरी घडले असेल तरी त्यांनी एकही गुन्हा पेंडींग ठेवलेला नाही. त्यामुळे, त्यांचा कठोर स्वभाव त्यांच्या बदलीस कारणीभूत ठरला. आता हे असले गंभीर गुन्हे जर येथे घडत असतील तर येथे सक्षम व कर्तव्यदक्ष पोलीस निरिक्षक अधिकारी देणे गरजेचे होते. मात्र, पोलीस निरिक्षकच अपयशी ठरत असल्याने पुन्हा त्याहुन अधिक खालच्या दर्जाचा अधिकारी देणे कितपत योग्य आहे. असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

         जेव्हा आरविंद जोंधळे यांची बदली झाली तेव्हा अभय परमार हे अकोल्याला येणार असे समजताच त्यांचे तालुक्यात जंगी स्वागत करण्यात आले. त्यांचे संगमनेरचे काम पाहता जनतेने त्यांच्याकडून फार अपेक्षा ठेवल्या होत्या. मात्र, ते हजर झाले आणि २० व्या दिवशी पोलीस नाईक वाघ यांनी लाच घेत परमार यांच्या समस्येत वाढ केली आणि परमार थेट कंट्रेल जमा झाल्याचे बोलले जाऊ लागले. जेथे लाचलुचपतचा छापा पडेल, तो अधिकारी कंट्रोल जमा होईल असे सुनावण्यात आले होते. त्यामुळे, यात संगमनेर पीआय मुकुंद देशमुख व अभय परमार यांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. पोलीस अधिक्षकांचे हे नारजी नाट्य तब्बल २०ते २५ दिवस चालले होते. त्यानंतर परमार व देशमुख यांनी राजकीय व्यक्तींच्या भेटीगाठी सुरु केल्या आणि पुन्हा यांची कार्यकिर्द सुरु करण्यावर एसपी साहेबांनी शिक्कामुर्तब केला. यावेळी, आ. डॉ. किरण लहामटे यांनी मनोज पाटील यांना विनंती केली म्हणून परमार यांना पुन्हा अकोले तालुक्यात काम करण्याचे भाग्य लाभले. या दरम्यान परमार यांनी एसपी साहेबांची नाराजी ओढून घेतली होती. त्यामुळे, त्यांच्या कार्याविषयी नेहमी प्रश्नचिन्ह उभे राहत होते. परमार यांना जो काही कार्यकाळ मिळाला त्यात त्यांनी एकही उल्लेखनिय कामगिरी केल्याचे दिसत नाही. उलट राजकीय पदाधिकाऱ्यांना पोलीस ठाण्यात अश्रय देऊन त्यांच्याशी सलगी करण्याने त्यांच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले. खरंतर पोलीस ठाण्याच्या आवारात जो दत्त होता तो त्यांच्यावर पावला की कोपला.! हा आत्मचिंतनाचा भाग ठरला आहे. परमार काही विशिष्ट व्यक्तींसोबत रममान राहिल्यामुळे, त्यांना येसरठाव येथील चेलेंजींग गुन्ह्याची उकल देखील करता आली नाही. हे त्यांच्या कामातील सर्वात मोठे अपयश होते. तर, पोलीस ठाण्याची गाडी त्यांना चांगलीच भावली तरी ती अंतीम काळात भवली देखील आहे. या गाडीचा अपघात होऊन साहेबांना मोठ्या जखमांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे, ऐकीकडे पांडे यांच्यावर पडलेला ट्रॅप, दुसरीकडे अपघात आणि तिसरीकडे त्यांची नियंत्रण कक्षेत झालेली बदली. हे एकामागे एक झालेले प्रसंग त्यांच्यासाठी घातक ठरले आहेत.

दरम्यान, आमदार किरण लहामटे यांचा प्रशासनावर वचक नाही. हा एकीकडे आरोप होत आहे. तर दुसरीकडे अकोल्यात गुन्हेगारी वाढत असताना पीआयच्या जागी एपीआय देणे, ते ही कंट्रोलला पाच पीआय शिल्लक असताना. हे कितपत योग्य आहे. अकोल्यात एखाद्या सिनीअर पीआयची गरज आहे. अनुभव पाठीशी असला की पोलीस ठाणे चालवायचा फारशी अडचण येत नाही. त्यामुळे, हे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक दर्जाचे असताना येथे तात्पुरत्या स्वरुपाच्या नावाखाली एखादा एपीआय अकोले तालुक्यावर लादणे कितपत योग्य आहे.? आमदार साहेब तुम्ही प्रशासकीय यंत्रणेचा थोडाफार अभ्यास केला पाहिजे. कारण, तुमच्या अज्ञानाचा तालुक्याच्या विकासावर परिणाम होऊ नये तसेच तालुक्यात गुन्हेगारी फोफावू नये हीच अपेक्षा.