एकाच दिवशी लाचलुचपतचे दोन बडे छापे.! पोलिसांचा पांडे व महसुलचा मंडलाधिकारी दोन लाखांच्या ट्रॅपमध्ये.!

 


सार्वभौम (अकोले) :- 

                          दोन व्यक्तींवर दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्यात आरोपींच्या विरुद्ध चॅप्टर केस लवकर करुन त्याचा लगेच जामीन करुन देणे तसेच त्यातील एका उर्वरीत आरोपीचे नाव चॅप्टर केस न करता गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी पोलीस नाईक संदिप भाऊसाहेब पांडे याने पाच हजार रुपयांची लाच स्विकारली. ही रक्कम घेताना नगरच्या लाचलुचपत विभागाने त्यास रंगिहात पकडले आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. यात विशेष असे की, गेल्या काही महिन्यांपुर्वी याच पोलीस ठाण्यात वाघ लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला होता. त्याच वेळी संगमनेरात देशमुख याने लाच स्विकारली होती. त्यामुळे, पोलिसांची प्रतिमा पुरती मलीन झाली होती. या कारणास्तव पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी संगमनेरचे मुकुंद देशमुख व अकोल्याचे अभय परमार या दोन्ही पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या केल्या होत्या. मात्र, त्याला राजकीय वळण लागले आणि या दोन्ही बदल्या रद्द करण्यात आल्या. त्यानंतर ट्रॅप झाले मात्र ट्रॅप तेथे कंट्रोल जमा पीआय हा फंडा कायमचा रद्द होऊन गेला. आता मात्र एसपी काय भुमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आजच नाशिकच्या लाचलुचपत पथकाने राहाता येथील जगन्नाथ आसाराम भालेकर (मंडळअधिकारी) याने ७/१२ वर नाव लावायला ३ लाखांची मागणी केली होती. त्यातील २ लाख रक्कम स्विकारताना रंगेहाथ पकडले आहे. त्यामुळे, कोविडच्या भयान काळात भ्रष्टाचार देखील पसरत असल्याचे दिसते आहे. 

       याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या आठ दिवसांपासुन अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे जमिनीचा वाद सुरू होता. या भावबंदकीच्या वादात कोणत्याही प्रकारचा सलोखा न होऊ शकल्याने त्यांचा वाद थेट पोलीस ठाण्यात गेला होता. त्यानंतर अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यावर काही दिवसांनपासुन चौकशी सुरू होती. यात पोलीस नाईक संदिप पांडे यांनी तक्रारदार यांचे साडु व त्यांच्या दोन मुलां विरुद्ध अदखलपात्र गुन्ह्यात आरोपींची  चॅपटर केस लवकर करून त्यांना तातडीने जामीन करून देतो .व त्यातील एक आरोपीचे चॅपटर केस न करता त्याचे नाव गुन्ह्यातुन कमी करतो असे सांगून. पोलीस नाईक संदिप पांडे यांनी 5 हजार रुपयांची मागणी केली होती. ती देण्याचे ठरले असता तक्रारदाराने हा प्रकार  लाचलुचपत विभागाला कळविला होता. त्यावर पोलीस निरीक्षक दिपक करांडे यांनी अकोले गाठले व सापळा रचुन पांडे यास आपल्या जाळ्यात घेतले. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

              खरंतर गेल्या पाच महिन्यापुर्वी याच पोलीस ठाण्यातील संतोष वाघ यांना 10 हजारांची लाच घेताना नाशिक लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले होते. तेव्हा पोलीस निरीक्षक अभय परमार यांना एकच महिना झाला होता. आता सहा महिने पुर्ण होत नाही तेच दुसरी व्हीकेट पडली आहे. त्यामुळे, ते जिथे जातात तिथे कर्मचारी आपले गुण दाखवायला सुरवात करतात. कारण, पोलीस निरीक्षक अभय परमार हे संगमनेरला शहर पोलीस ठाण्यात असताना पोलीस उपनिरीक्षक राणा परदेशी याच्यावर लाख रुपये घेताना लाचलुचपतची कारवाई झाली होती. त्यामुळे पोलीस निरीक्षक अभय परमार जिथे जातात तिथे लाचलुचपत विभागाची करडी नजर असते का? अशी चर्चा आता सर्वत्र होत आहे. खरंतर साहेबांच्या उपरोक्त काही कर्मचारी मोठमोठ्या तडजोडी करू पाहत आहेत. तर चिरेमरी करणारे लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अटकत आहे.

       दरम्यान,ही कारवाई सुनील कडासने सर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक,  निलेश सोनवणे सर अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक, विजय जाधव, वाचक पोलीस उपअधीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधिक्षक हरिष खेडकर, पो. नी दिपक कारंडे यांनी केली. तर कोणी लाच मागत असेल तर तत्काळ लाचलुचपत प्रतिबंध विभागास माहिती द्यावी. असे आवाहन पोलीस अधिक्षक सुनिल कडासणे साहेब यांनी केले आहे.