संगमनेरात पोलिसांचाच गुन्हा कायम तपासावर.! त्या दंग्याला राजकीय ग्रहण.! २१ आरोपी ४ अटक साहेब गेले रजेवर.!

 

सार्वभौम (संगमनेर) :- 

                       संगमनेरमध्ये पोलिसांचा धाक गुन्हेगारांना राहिला की नाही? आता असे प्रश्न नागरिकांकडुन आता उपस्थित होत आहे. कारण, संगमनेर शहराच्या सुसंस्कृतपणाला लाजवेल असा प्रकार शहरातील दिल्ली नाका येथे घडला. दिल्ली नाका येथे बंदोबस्तात असणाऱ्या पोलिसांवर हात उचलण्यात आले, दगडफेक करण्यात आली, धक्काबुक्की केली. राहुटी उखडून फेकली, बेरिकेट्स फेकले. आता हा सर्व प्रकार एका व्हिडीओत कैद झाला. तो संपूर्ण तालुकाभर फिरला. यामध्ये शेकडो लोक पोलिसांच्या समर्थनार्थ पोष्ट करताना दिसताय. परंतु, पोलिसच पोलिसांच्या भल्यावर आहेत का? असा सहज प्रश्न पोलीस खात्यातून पोलीस अधिकाऱ्यांच्या संशयित धोरणामुळे उपस्थित केला जात आहे.  कारण, शंभर ते दोनशे जणांचा जमाव आणि आरोपी करण्यात आले फक्त 21, इतका  गंभिर प्रकार होऊन देेखील पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले कधी ? चार दिवस होऊन देखील चार फक्त चौघांनाच पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे, याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप होतोय का?पोलिसांनवर हात उचलुन देखील तपासी अधिकारी शांत आहे का? वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुन दबाव आहे का? असे नाना प्रश्न संगमनेरच्या सुज्ञ लोकांनी उपस्थित केले आहे. तर यामध्ये मुसेब अल्लाउद्दीन शेख(वय 31,रा. अपणानगर), असिफ मेहबूब पठाण(वय 31, रा. मोगलपुरा),  युनूस मन्सूर सय्यद (वय 24, रा. गवंडीपुरा), मोसीन इमाम शेख (वय 35, रा. जम्मनपुरा) या चौघांना अटक केली असुन न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.,

         


  दरम्यान, मागील वर्षी असाच प्रकार तालुक्यातील कुरण येथे घडला होता. तेव्हाचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन विषय योग्य पद्धतीने हाताळला होता. यापूर्वीही कुरण येथे रमजान महिन्यामध्ये पोलिसांना धक्काबुकी झाली होती. तेव्हाचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी सर्व आरोपींना बेड्या ठोकुन न्यायालयापुढे हजर केले होते. मात्र, दिल्लीनाका येथून हकेच्या अंतरावर शहर पोलीस ठाणे व पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांचे कार्यालय आहे. घटना घडून देखील पोलीस निरीक्षक व पोलीस उपअधीक्षक परिस्थिती हाताळायला किती तप्तपरतेने आले याची चौकशी स्वत: एसपी साहेब किंवा आयजी साहेबांच्या अधिपत्याखाली झाली पाहिजे. आज हे अनेकांना खटकते आहे. की, शेकडोच्या संख्येने लोक पोलिसांच्या मागे पळतात आणि त्यामध्ये फक्त 21 लोकांवरच गुन्हे दाखल होतात तर फक्त चार जनांनाच ताब्यात घेतले जाते. जेथे घटना घडली तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. हा व्हिडीओ संपूर्ण राज्यभर फिरला आहे. ऐवढे सबळ पुरावे असून देखील आरोपी डिटेक्ट होत नाही.! संगमनेरमध्ये विनाकारण घराबाहेर पडता येत नाही. बाहेर लॉकडाऊनमुळे कडक बंदोबस्त सुरू आहे. तरी देखील आरोपी पोलिसांच्या ताब्यात नाही. ही शंकेची बाब आता संगमनेरकरांना खटकत आहे. आता ऐवढे सबळ पुरावे असताना पोलिसांकडुन कारवाई होत नसेल तर  सर्वसामान्य माणसांवर असा प्रकार घडला तर न्याय कोणाकडे मागायचा? असे ही प्रश्न निर्माण झाले आहे. जर एखाद्या गल्ली बोळात वाद झाले तरी पोलीस अनेकांना आरोपी करतात. मग त्यांच्यावरच वेळ आल्यानंतर ही मुगगिळी भुमीका का? हेच कळेनासे झाले आहे.

               दरम्यान, गुरुवारी पोलिसांवर जमावाने हल्ला केला. तालुक्यातील अनेक संघटनांनी त्याविरोधात निवेदने दिली तर काहींनी रस्तारोको देखील केला. एकीकडे सामाजिक संघटना पोलिसांसाठी न्यायाची अपेक्षा करत आहे. पण, शहरातील विद्यमान नगरसेवकांनी हाताची घडी व तोंडावर बोट ठेवले आहे. शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडत आहे. यावर त्यांनी साधा ब्र शब्द देखील काढला नाही. कारण, पुढील वर्षभरात नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आपण कारवाईची मागणी करायचो आणि एक गटाला संपूर्ण नाराजीचे तोंड द्यावा लागायचे या कारणाने नगरसेवकांनी या विषयात यत्किंचितही हस्तक्षेप केला नाही.  

          दरम्यान, कौटुंबिक गुन्हे आणि मारामाऱ्या हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत होणे साहजिकच आहे. मात्र, प्रोफेशनल गुन्हे आणि चोऱ्या, दरोडे यात पोलिसांचे नक्कीच अपयश आहे. जर असे प्रकार घडले तरी किमान त्यातील काही गुन्ह्यांचा शोध लागणे अपेक्षित असते. मात्र, संगमनेरात अनेक गुन्ह्यांची अद्याप निर्गती झालेली नाही. त्यामुळे, पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचा तपास जर स्थानिक अधिकारी आणि राजकारणी यांच्यामुळे कायम तपासावर राहिला तर त्यात नवल वाटण्यासारखे काही नाही. कारण, संगमनेरमध्ये राजकीय वरदहस्ताने बदलून आलेले अधिकारी आणि येथील राजकीय नेते यांची भुमिका फार दिशाभूल करणारी आहे. तू मारल्यासारखे कर आणि मी रडल्यासारखे करतो. हाच येथील फंडा आहे. याचे उत्तम प्रमाण म्हणजे ना. बाळासाहेब थोरात म्हणतात की, आरोपींना कोणी पाठीशी घालणार नाही. तर दुसरीकडे पोलीस आरोपींना अटक करीत नाही. पोलीस अधिकारी देखील कोंबिंग आँपरेशन करायला तयार नाही. त्यामुळे, शहर हद्दीतील जनता फार नाराज असल्याचे दिसून येत आहे तर सोशल मीडियावर अनेक आरोप प्रत्यारोप होत आहे. 

           खरंतर आज देशात सामान्य माणूस लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडणे अशक्य आहे. पण, संगमनेरात अवैध धंदे येथे राजरोज सुरूच आहे. येथे शहर हद्दीतील कसारवाडी ते वाघापुरपर्यंत दिवस रात्र वाळु तस्करी, गोमांस, गांजा, गुटखा, अवैध दारु विक्री असे अनेक गोरखधंदे सुरूच आहेत. पण गुन्ह्याच्या उकलीचा आलेख चिंताजनक आहे. त्यामुळे, या दंग्यातून हेच सिद्ध होते की, येथे कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर लटकलेली आहे. वास्तवत: संगमनेरात तत्कालिन पोलीस उपाधिक्षक रोशन पंडित यांनी कधी राजकारणाचे जोडे डोक्यावर ठेवले नाही, ना त्यांनी अधिकाऱ्यांकडून मलिद्याची अपेक्षा केली. दुर्दैवाने आज डेप्युटी व  पोलीस निरीक्षक यांचा वचक गुन्हेगारांवर नाही तर फक्त आणि फक्त कर्मचाऱ्यांवरच धाक दिसून येत आहे. हाच आरोप त्यांच्यावर वारंवार होत आहे.

        पोलिस देखील माणसं आहे. त्यांना देखील कुटुंब आहे. काही कर्मचारी व कुटुंबातील सदस्य देखील कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे, काही कर्मचाऱ्यांची देखील धावपळ सुरू आहे. पण तरी देखील त्यांना या महामारीमुळे सुट्टी भेटत नाही. पण अशा परिस्थितीत त्यांच्यावर हल्ला झाल्यावर त्यांनी न्यायाची अपेक्षा तरी कोणाकडून ठेवायची. कारण, वरिष्ठ अधिकारी स्थानिक पुढाऱ्यांची उठारेठा करण्यात मशगुल आहेत. त्यामुळे,वरिष्ठांकडून पोलीस कर्मचाऱ्यांनी न्यायाची अपेक्षा ठेवावी की नाही अशी ही खंत व्यक्त केली जात आहे.

भाग २ क्रमश:

- सुशांत पावसे