कोरोनाच्या पडत्या काळात लोकप्रतिनिधी गेले तरी कोठे? अकोल्यात 365 रुग्ण.!
अकोले तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. प्रशासन अक्षरश: हतबल झाले असून त्यांच्याकडे जे आहे त्यावर समाधान मानावे लागत आहे. आजही तालुक्यात रेमडिसीवीर अक्षरश: पहायला देखील मिळत नाही. तर हेच रेमडिसीवीर अकोल्यात 18 ते 20 हजार रुपयांना विकले जात आहे. त्यामुळे, येथे एकीकडे सेवाभावी लोक तन, मन धनाने स्वत:ला समाजसेवेत झोकून देत आहेत तर दुसरीकडे कोरोनाच्या नावाखाली काही सामाजिक बुरखे परिधान करुन सामान्य मानसांना लुटत आहेत. त्यामुळे, या काळात प्रत्येकाने मानुसकी आणि संवेदनशिलता अंगी बाळगली पाहिजे.
खरंतर, जे स्वत:ला समाजसेवक आणि लोकप्रतिनिधी म्हणून घेतात त्यातील किती लोक आज कोरोनाच्या काळात मदत करीत आहेत? याचे मुल्यांकन समाजातील नागरिकांनी केले पाहिजे. येणार्या काळात निवडणुका आहे त्यामुळे, अचाकन काही डोमकावळे मत मागण्यासाठी आपल्या दारात दिसतील. त्यावेळी, त्यांना पहिला प्रश्न विचारा की? तुम्ही आमच्यासाठी, गावासाठी काय केले? जर त्याला उत्तर देता आले नाही. तर त्या भामट्याला मतदान सोडा.! पाणी देखील पाजू नका. आज कोणता जिल्हा परिषद सदस्य तुमाच्यासाठी धावतो आहे, कोणता नगरसेवक हाकेला साद देतोय, गरजुंना मदत करतोय, कोणता पंचायत समिती सदस्य तुमच्या गणात कार्यरात आहे. हे तुम्हाला माहित आहे खरंतर अक्षरश: बोटावर मोजण्याइतके लोकप्रतिनिधी जनतेच्या पडत्या काळात मैदानात उतरुन काम करताना दिसत आहे. ते जर कधी तुमच्या दारात मत मागण्यासाठी आले तर त्यांना कधी ढावालु नका. कारण, स्वत:च्या जीवावर उदार होऊन त्यांनी तुमचा जीव वाचविला आहे.
आज लोक प्रशासनावर ताशेरे ओढत आहेत. कोणीही उठसुट अधिकार्यांना फोन लावतो आणि त्यांना जाब विचारतो. मात्र, आजही तालुक्यातील महसूल, पोलीस, आरोग्य विभाग हे रात्री 12 ते 1 वाजता झोपतात. कोविड सेंटरवर कोणी काम करायला तयार नाही, काहींनी जॉब सोडले तर काही कर्मचारी अक्षरश: रडत-खडत पण सेवा देत आहेत. तरी देखील त्यांच्या कार्यात जरा देखील कुचराई नाही. त्यामुळे, त्यांच्याशी बोलताना आणि त्यांच्यासोबत वागताना स्वत:च्या जिभेला लागम घाला. अक्षरश: तारेवरची कसरत हे लोक करीत आहेत. आपण, दिवसातून एकदा तरी एखाद्या संशयित व्यक्तीच्या संपर्कात आलो तर पंन्नास वेळा मानात विचार येतात, मला कोरोना होतो की काय? घरी जाऊन वाफ घे, गोळ्या घे, गरम पाणी पी असे नाना प्रयोग करतो. मात्र, हे लोक रोज त्या कोविड बाधितांच्या संपर्कात आहेत. त्यांना काही जीव नाही का? त्यांना कोरोना होत नाही का? त्यांच्या 24 तासात 17 ते 19 तास ड्युट्या लागत आहे. त्यामुळे, त्यांचा देखील जीव जाणला पाहिजे असे आमचे प्रामाणिक मत आहे.
दरम्यानच्या काळात तालुक्यातील रुग्णालयांमधील ऑक्सिजन संपला होता तेव्हा तालुक्यातील तरुणांनी जिल्हाबाहेर पायपिट केली आणि हजारो लोकांचे प्राण वाचविले, त्यानंतर आ. डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखाली कोविड सेंटर सुगाव येथे मोफत जेवणाचे डब्बे पुरविण्याचे काम महाविकास आघाडीतील निवडक पदाधिकार्यांनी केले आहे. तर दुर्दैवाने येथे राष्ट्रावादीचे आमदार असून अगदी बोटावर मोजण्याईतके पदाधिकारी त्यात सामिल आहे. बाकी बड्याबड्या पदांना चिकटून त्यांचे तुटपुंजे सहकार्य आणि जोर बाकी आमदारांच्या वरचा दिसून येतो. तर आमदारांच्या प्रेमापोटी विखे समर्थक आणि काँग्रेस व शिवसेना देखील यात सक्रीय दिसून येत आहे. या पलिकडे यात दैनिक सार्वभौमने देखील खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच एक उत्तम समाजसेवा म्हणून बबलु धुमाळ आणि बाबासाहेब नाईकवाडी यांनी एक छानसा उपक्रम राबविला आहे. ज्या कुटुंबाला त्यांचे मृत व्यक्ती जाळण्यास भिती वाटत असेल, त्यांची आर्थिक परिस्थिती नसेल अशा मृतदेहांना जाळण्याची जबाबदारी या तरुणांनी घेतली आहे. त्यामुळे, एकंदर एकीकडे तालुक्यात श्रेय्यवादाचे राजकारण सुरू आहे. तर दुसरीकडे समाजभान राखून तरुण पुढे येत आहेत. याचे देखील सुख आहे.