अंगातील भूत काढण्यासाठी महिलेला दारु पाजून भोंदुबाबाने केला अत्याचार.! पीडितेचा गळफासचा प्रयत्न.! त्या नराधमाला अटक.!
एका भोंदू बाबाने महिलेला दारु पाजून तिच्यातील भूत उतरविण्याचा बहाणा करत तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बु येथे दि. 23 एप्रिल 2021 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारस घडली. यात बेशरम व हलकट भोंदूस संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी बेड्या ठोकल्या आहे. सावित्रा बाबुराव गडाख (रा. पारेगाव, ता. संगमनेर. जि. अ.नगर) असे या आरोपीचे नाव आहे. खंरतर गेल्या चार दिवसांपुर्वी संगमनेरात पोलिसांवर झालेला हल्ला, कोरोनाची जिल्ह्यात अव्वल असणारी आकडेवारी आणि आता हा निर्लज्ज पणाचा उघड झालेला प्रकार यामुळे संगमनेर तालुका राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथे राहणार्या एका महिलेला सिन्नर तालुक्यातील एक गावात दिले होते. लग्नानंतर काही दिवसांनी या माउलीचे हातपाय कायम दुखत होते. चार पाच वर्षे दवाखाना करुन देखील त्यांना कोणताही आराम मिळाला नाही. त्यामुळे, त्यांना कोणीतरी विक्षिप्त गुरू भेटला आणि त्याने सांगितले की, पारेगाव येथे एक जालीम बाबा आहे. तो लोकांना लिबू, अंगारा व मंत्र टाकून निट करतो. त्याच्या अंगात हावा येते. हे एकल्यानंतर आजाराला कंटाळल्यामुळे पीडित महिलेने आपल्या पतिस सांगून पारेगाव गाठले. त्यावेळी हा मुर्ख भोंदुबाबा अनेकांवर नाना प्रकारची अघोरी विद्या करीत होता. जेव्हा या पीडित महिलेचा नंबर आला तेव्हा त्याने तिला सांगितले की, तुला भूतबाधा झाली आहे ती काढवी लागेल, तेव्हा त्याने अंगारे धुपारे करुन पाण्यात घेण्यास सांगितले आणि तुला काही दिवस माझ्याकडे यावे लागेल सांगून या भोंदु बाबाने त्यांना पुढील वेळी येताना देशी दारुच्या बाटल्या, भेळीचे पुढे, संभाजी बिडी बंडल, मॅक्डोनाल्डच्या दोन खंबे व दोनशे रुपये आणण्यास सांगितले.
ठरल्याप्रमाणे दि. 24 एप्रिल रोजी पीडित महिलेच्या निर्व्यसनी पतीने नको-नको तो शोध लावून चारदोन गावे व शहरे फिरुन देशी दारुच्या बाटल्या, संभाजी बिडी बंडल, मॅक्डोनाल्डच्या दोन खंबे भेळीचे पुडे असे साहित्य जमा केले आणि पुन्हा पारेगाव गाठले. तेव्हा रात्रीचे 8 वाजले होते. तेव्हा सावित्रा गडाख या भोंदुचा धंदा तेजीत सुरू होता. त्याच्या सामोर अनेजण वर्ध्या लावून बसले होते. पीडित महिलेचा नंबर रात्री 1 वाजण्याच्या सुमारास आला होता. या मुर्ख भोंदुने पीडित महिलेला तिच्या पती आणि मुलादेखत दारु पाजली. तिने नकार दिला असता तिला काही भिती घातली गेली आणि इच्छा नसताना अत्याचार करण्याच्या उद्देशाने तिला नशाधीन केले. इतकेच काय.! याने पीडित महिला नशा झाल्यानंतर नको तसे अंगावर लोळविले. आपला रुग्ण बरा झाला पाहिजे त्यामुळे, ही काही विद्या असावी असे तिच्या पतीस व मुलास वाटत होते. तर त्याहुन महत्वाचे म्हणजे हा भोंदू त्यांच्या नात्यातील असल्यामुळे त्याच्यातील नराधमाला ते ओळखू शकले नाही.
दरम्यान हा प्रकार सुरू असताना सावित्रा गडाख या व्यक्तीने पीडित महिलेला काही मंत्र मारल्याचे नाटक केले, तर ज्या ठिकाणी तिचा पती व मुलगा बसलेला होता. त्या ठिकाणापासून काही अंतरावर अगदी अंधारात एका नांगरलेल्या वावरात नेले आणि तिच्या नशेत असल्याचा फायदा घेत तिच्यावर विकृतपणे अत्याचार केला. यावेळी पीडित महिलेने तिच्यातील बळाइतका प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली की, मला पाप लागेल, तेव्हा हा निर्लज्ज बाबा म्हणाला की, याला पाप नाही म्हणत तर प्रेम म्हणतात, यापेक्षा अभद्र बोलुन तिच्या असहाय्यतेचा फायदा घेतला. तर हा प्रकार घडल्यानंतर म्हणला की, तुला भूत उतरविण्यासाठी आणखी दोन वेळा माझ्याकडे यावे लागेल.
त्याच दिवशी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास ही पीडित महिला अगदी असहाय्य होऊन तिच्या घरी परतली. पहाटे पाच वाजता अंघोळ करीत असताना तिला घडलेला प्रसंग आठवला आणि ती एका कोपर्यात धाय मोकलुन रडू लागली. तिच्या भावना इतका हतबल होत्या की, नेमकी नवर्याला काय सांगावं? त्यानंतर होणारे परिणाम काय असतील? त्यामुळे, नि:शब्द होऊन ती रडत राहिली. तीने पतीस एकच विनंती केली की, काही झालं तरी मला त्या भोंदू बाबाकडे पुन्हा नेवू नका. मी मेले तरी हरकत नाही, पण पुन्हा पारेगाव नको. त्यानंतर पतीने तिला धिर दिला आणि मग पीडित महिला बोलती झाली. तोवर तिची मानसिक परिस्थिती पुर्णत: खालावलेली होती. त्यामुळे तिला तत्काळ सिन्नर येथे अॅडमिट करण्यात आले. या दरम्यान त्यांच्या घरातील काही जणांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे हे कुटुंब आणखी अस्थिर झाले होते.
दरम्यान, या पीडित महिलेला इतका सदमा बसला होता की, तीने त्या दिवशीचे सर्व कपडे जाळुन टाकले होते. कारण, त्यावर देखील त्याने जादुटोना केल्याचे भासत होते. तर तिलाच तिची लाज वाटू लागली होती. त्यामुळे, हे आयुष्य आपल्याला नको आहे असे म्हणत पीडित महिलेने तिचे जीवण संपविण्याचा निर्णय घेतला होता. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत या पीडितेने घराच्या छताला दोर बांधला आणि फाशी घेणार, तोच हा प्रकार तिच्या पतीने पाहिला. जे झालं ते विसरुन जा, पुन्हा नव्याने जगने सुरू कर असे म्हणत त्याने तिला धिर दिला. या काळात घरात कोरोना आणि मानसिक तणाव यात बरेच दिवस गेले आणि नंतर या पीडितेने स्वत: पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली आहे. कारण, ती ज्या नराधमाची शिकार झाली त्यानंतर आणखी कोणी त्या भोंदुचा बळी ठरु नये म्हणून त्या माऊलीने धैर्याने पुढे येऊन गुन्हा दाखल केला आहे.
ही अनोखी तक्रार येताच संगमनेर तालुक्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी या भोंदुच्या मुसक्या आवळण्यास एक पथक तयार केले, नरबळी, अंधश्रद्धा आणि बलात्कार अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करुन त्याची चांगलीच भोंदुगिरी काढण्याचे काम पवार यांनी केले आहे. अशा प्रकारचे गुन्हे समाजात घडू नये यासाठी कोणत्याही भोंदूगिरीवर विश्वास ठेऊ नये, आजारी पडल्यास दवाखाण्यात जावे, अंगारे धुपारे घेऊन जर मानसे निट होत असती तर आज कोरोना देशात नसता, डॉक्टरांची निर्मीत्ती झाली नसती, त्यामुळे, कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान ही बातमी फिर्यादीनुसार सविस्तर घेण्यात आली आहे. याचे कारण असे की, आजही दुर्गम भागात असे निर्लज्ज भोंदू कार्यरत आहेत. विशेषत: महिला त्यांना जास्त प्रमाणावर बळी पडतात, असेच अनेक महिलांचे शोषण झाले आहे. मात्र, आब्रु जायला नको म्हणून झाकली मुठ सव्वा लाखाची. असे प्रकार होऊ नये त्यासाठी डोळ्यात अंजन घालणारी ही बातमी आहे.