रेशनच्या आठशे पोत्यांचा भ्रष्टाचार.! 56 लाख रुपयांच्या मुद्देमालासह चौघांना बेड्या.! अकोल्यात 30 मे पर्यंत जनता कर्फ्यु.!

                                    



- आकाश देशमुख

सार्वभौम (राजूर) :- अकोले तालुक्यातील राजूर येथे स्वस्त धान्य रेशनच्या चार ट्रक राजूर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतल्या होत्या. त्यात रेशनच्या आहेत हे सिद्ध करुन देण्यात संदिग्धता आढळून आल्यानंतर पोलिसांनी चारही ट्रक, गहू (525 पोती) व तांदूळ (287 पोती) यांचे कट्टे असा 56 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई राजूर येथे 12 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कोल्हार घोटी रोडवर राजूर स्टेशनच्या समोर करण्यात आली. यात हौशीराम दिनकर देशमुख, अशोक हिरामन देशमुख (रा. केळुंगण, ता. अकोले), योगेश राजेंद्र धुमाळ, अकोले, साई संदेश धुमाळ (रा. धुमाळवाडी, ता. अकोले) अशा चौघांना आरोपी करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर रेशनचा काळा बाजार करण्याच प्रयत्न केला जात होता की काय? ते देखील भर दिवसा. ही फार मोठी शोकांतीका असल्याने अकोले तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील आदिवासी भागात स्वस्त धान्य घेऊन निघालेल्या चार ट्रक राजूर पोलिसांनी संशयित म्हणून ताब्यात घेतल्या होत्या. त्याची चौकशी केली असता या ट्रकमध्ये असलेल्या गोडाऊन मधून घेतल्याची गोडवून किपरची सही नाही, चालकांचे नाव नाही. ज्या गाड्यांमध्ये रेशन मिळून आले आहे. त्या गाड्या शासनाकडे रजिस्टर नाहीत,  त्यामुळे हे धान्य काळाबाजार नेण्याचा प्रयत्न प्रथम दर्शनी दिसून येत होता. त्यामुळे, पोलिसांनी चारही ट्रक ताब्यात घेतल्या याबाबत मा. तहसीलदार यांना ही कळवण्यात आले होते. मात्र, तहसिलदार यांना लेखी पत्र देऊन देखल योग्यते समाधान पोलिसांचे झाले नाही. त्यामुळे, राजूर पोलीस ठाण्याचा सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर पो. कॉ.विजय सदाशिव फटांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता या घटनेत तत्थ किती आणि खरा प्रकार काय? हे जनतेला कळणे गरजेचे आहे. खरंतर अकोले तालुक्यात पुरवठा विभागाकडून नेहमी भोंगळ कारभाराचे दर्शन होत असल्याचा आरोप होत आहे. गेेल्या 15 मे 2020 रोजी देखील अकोले तालुक्यात येणारा रेशनचा 600 पोती तांदुळ भ्रष्टाचारी यंत्रणेने फस्त करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी रोखठोक सार्वभौमने आवाज उठविला आणि संगमनेर पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्या घटनेनंतर कंप्लेट एक वर्षानंतर ही कारवाई झाली आहे. त्यामुळे हा एक योगायोग असला तरी मधल्या काळात कोणी रेशनच्या नावाखाली तोंड काळे केले नसले असे म्हणणे धाडसाचे ठरेल. मात्र, इतक्या कडूकाळ दिवसात देखील अगदी आदिवासी समाजाच्या जनतेच्या तोंडातला घास यांना ओढावासा वाटत असेल तर ही यंत्रणा मेलेल्या मढ्यावरच्या टाळुवरील लोणी चाटणारी आहे की काय? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित होत आहे. 

खरंतर जेव्हा सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी ही कारवाई केली. तेव्हा त्यांनी तत्काळ प्रशासनाशी संपर्क केला होता. लेखी म्हणणे मागविल्यानंतर त्यांचे म्हणणे आले की, हे सर्व आमचेच धान्य आहे. मात्र, गोडाऊन किपर याच्या घरात काही आजारपण आल्यामुळे तो अचानक निघून गेला आहे. त्यामुळे, त्यावर त्याच्या सह्या नाहीत. तर ज्या गाड्यांमध्ये तांदुळ-गहु यांची वाहतूक होत आहे. त्या गाड्यांची आमच्याकडे नोंद नाही. मात्र, तरी देखील आम्ही ते संबंधित ट्रकांमधून वितरणासाठी चालविले होते. यात कोणत्याही प्रकारची संद्धिता नाही. आता हे प्रशासनाच्या दृष्टीने अत्य असे तरी ते कायदेशीर दृष्ट्या पुर्णत: चूक आहे. त्यामुळे, साबळे यांना समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी गाड्या ताब्यात घेऊन त्यांचे वाहन चालक देखील ताब्यात घेतले आहेत. हा प्रशासनाचा भोंगळा कारभार असला तरी तो त्यांच्या दालनात. मात्र, पोलिसाना जर ते चुकीत सापडले तर त्यावर कारवाई होणार हे नक्कीच आहे.

आता यात काही प्रश्न फार अनुत्तरीत राहतात. की, कोरोनात गरिबांच्या पोटाला अन्न नसताना त्यांच्या अन्नात विष कालविण्याची हिंमत आणि मासिकता यांची होते तरी काशी? जर कायदेशीर माल गोडाऊनमधून बाहेर काढला असेल तर त्याची पावती, त्यावर सह्या, वजन, नग, वाहन चालक, गाडी नंबर अशी पुर्तता अनिवार्य असते. हे प्रशासनाला माहित नाही का? आता रेशनच्या ज्या गाडीत रेशन टाकायचे असते ती जिल्हा पुरवठा विभाग यांच्याकडे रजिस्टर केलेेली असते. मात्र, दुर्दैवाने या चार पैकी एकही गाडी रजिस्टर नाही. त्यामुळे, काय भरवसा की, हे लोक ते रेशन वितरीत करण्यासाठीच नेत होते.! इतकेच काय! जे लोक ते रेशन घेऊन चालले होते. त्यापैकी एकाचेही नवा वाहन चालक म्हणून नोंदणीकृत नाही. तर गोडाऊन किपार सुट्टीवर गेला होता तर त्याच्या जागी कोणी नेमले नव्हते का? की, ड्रायव्हर येणार आणि गाडी भरुन घेऊन जाणार. इतका नंगानाच कोणाला सांगितला तर तो पटेल का? त्या सह्या अनावधानाने राहून गेल्या असे म्हटले तर ते लोकांना पटेल का? त्यामुळे, हे रेशनचे काँट्रॅक्ट घेणार्‍या राष्ट्रवादीच्या नेत्यापासून पोलिसांनी चौकशी केली पाहिजे. तर राजुरमध्ये रेशनचा काळा बाजार करणार्‍या असंतोषी व्यक्तींना पोलिसांनी पहिले आपळ्या जाळ्यात घेतले पाहिजे. मात्र, येथे नेमही राष्ट्रवादीचा आमदार होतो. त्यामुळे. धान्य पकडले काय आणि  साहेबांच्ंया एका फोनवर सोडले काय? हे सारखेच आहेत. राजुरमध्ये या रेशन बाजाराचा करता धरता धनी कोण आहे हे पोलीसांना सांगण्याची गजर नाही. फक्त योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. 

4 गाड्यांमधील मुद्देमाल

1)15,40,500/रु. किमतीचे त्यात 2,07,000/-रु. किमतीच्या 50 किलो वजनाच्या 207 गहूच्या गोण्या प्रति किलो 20 रुपये प्रमाणे किंमत अंदाजे 1,33,500/-रु. किमतीच्या 50 किलो वजनाच्या 89 तांदळाच्या गोण्या प्रति किलो तीस रुपये प्रमाणे किंमत अंदाजे व 12,00,000/-रुपये किमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो क्रमांक एमएच 04ई वाय 5291 किंमत अंदाजे

2)13,77,500/-रुपये किमतीचे त्यात 92000/-रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 92 प्रति किलो 20 रुपये प्रमाणे किंमत अंदाजे 85,500/-रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 57 तांदळाच्या गोण्या प्रति किलो तीस रुपये प्रमाणे किंमत अंदाजे व 12,00,000/-रुपये किमतीचा आयशर कंपनी चा टेम्पो एम एच 15 एफ यु 9057 किंमत अंदाजे

3)14,53,000/-रु. किमतीचे त्यात1,30,000/-रु किंमतीच्या 50 किलो वजनाच्या 130 गहू प्रति किलो वीस रुपये प्रमाणे किंमत अंदाजे 1,23,000/-रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 82 तांदळाच्या गोण्या प्रति किलो 30 रुपये प्रमाणे किंमत अंदाजे व 12,00,000/-रु किमतीचा आयशर कंपनी चा टेम्पो एम एच 17ए.जी. 3883 किंमत अंदाजे

4) 12,42,500/-रुपये किमतीचे त्यात 1,24,000/-रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 124 गहूच्या गोण्या प्रति किलो 20 रुपये प्रमाणे किंमत1,18,000/-रु. रुपये किमतीच्या 50 किलो वजनाच्या 79 तांदळाच्या पुण्यात प्रति किलो 30 रुपये प्रमाणे किंमत अंदाजे व 10,00,000/-रु. किमतीचा आयशर कंपनी चा टेम्पो एमएच-17 टी.2900 किंमत अंदाजे असा एकूण-56,13,500 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

महत्वाचे

अकोले तालुक्यात 9 हजार 500 रुग्ण झाले आहेत. तर आज एकाच दिवशा 595 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे. एक खबरदारचा उपाय म्हणून उद्या 15 मे रोजी पासून तर 30 मे 2021 पर्यंत अकोले शहरात आणि तालुक्यात जनता कफ्यु पाळला जाणार आहे. यात फक्त मेडिकल आणि दवाखाणे उघडे राहणार आहेत. तर दुध घालण्यासाठी सकाळी व सायंकाळी दुध डेअरीवर त्याचे संकलन होणार आहे. या व्यतिरिक्त जे दुध वाटतात त्यांना फक्त सकाळी परवानगी असणार आहे. तर संध्याकाळी कोणीही दुध वाटप करणार नाही. या 15 दिवसात किराणा, भाजीपाला हे सर्वच बंद राहणार आहेत. आज सकाळी रोखठोक सार्वभौमने 7 ते 11 चे चोचले पुरविणारे कौतूक बंद करा. असे म्हणत बंदचे आवाहन केले होते. त्यास प्रशासन व सर्वच व्यक्तींनी प्रतिसाद देत एकी केली आणि एकमताने तालुका 15 दिवस बंद असल्याचे घोषित केले आहे.