अकोले संगमनेरसाठी खुशखबर.! प्रतिकुटुंब त्यांच्या खात्यावर २ हजार जमा होणार, जेवणही फुकट.! १ मे पर्यंत लॉकडाऊन.! काय सुरु काय बंद.!

 

सार्वभौम (अकोले/संगमनेर) :-

            अकोले तालुक्यात कोरोनाचे आकडे आता आभाळाला जाऊन भिडले आहेत. रोज शंभर ते दिडशे लोक कोरोना पॉझिटीव्ह सापडत आहेत. तर प्लेगच्या साथी सारखे लोक टपाटप मरत आहेत. संगमनेर तालक्यात कोरोनाचा आकडा १० हजारांच्या वर गेला असून अकोल्यात पाच हजार पार झाला आहे. आता प्रशासन देखील हतबल होताना दिसत असून मृत्युची खरी आकडेवारी पुढे यायला तयार नाही. लोकं डोळ्यादेखत मरतात, अगदी शेजारी किंवा मित्र मरतो, परंतु प्रशासनाल मृत्युचा आकडा विचारला तर तो तसूभरही पुढे सरकलेला नसतो. त्यामुळे, सहाजिकच शंकेचा किडा वळवळ करणे शक्य आहे. आज मंगळवार दि. १३ रोजी निव्वळ आरटीपीसीआर कोरोनाची आकडेवारी अकोल्यात ६८ आहे. या व्यतिरिक्त खाजगी अद्याप माहिती मिळालेली नाही. त्यामुळे, हे असेच आकडे वाढत राहिले तर खरोखर जगणे मुश्किल होऊ शकते. आता आजी-माजी आमदार व प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने 200 शे बेडचे कोविड सेंटर अकोल्यात उभे होत आहे. मात्र, दुर्दैवाने अकोले तालुक्यात सुसज्ज वैद्यकीय सेवा नाही. त्यामुळे, संगमनेरात अकोल्याच्या व्यक्तींना दुय्यम स्थान मिळते. परिनामी उपचारा आभावी लोक अगदी किड्या मुंगिसारखे मरताना दिसत आहे. आज मृत्युचे प्रमाण देखील फार असून दोन दिवसात शंभर लोक आपले जिवण संपवत आहे. आज जिल्ह्यात २ हजार ६५४ रुग्ण मयत झाले आहेत. तर कोरोनाचा हाहाकार संगमनेरमध्ये सुरूच असून आज एकाच दिवशी 219 रुग्ण कोरोना बाधीत आढळून आले आहे. हा आजपर्यंतचा तालुक्यातील सर्वाधिक उच्चांक आहे. त्यामुळे संगमनेरकरांवर कोरोनाचे सावट अधिकच गडद होत चाले आहे. शहरासह ग्रामीणभागात देखील कोरोनाचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांची बेडसाठी धावपळ करावी लागत आहे. आजपर्यंतचा कोरोना बधितांचा आकडा हा 10 हजारांच्या वरती गेला असुन यामध्ये 1 हजार 225 रुग्ण अॅक्टिव्ह आहे तर  71 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

या सगळ्यात आज मुख्यमंत्री महोदय यांनी जो काही लॉकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यात अकोले संगमनेरसाठी फार महत्वाचा ठरला आहे. कारण, अकोले हा आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो. तर संगमनेरचा पठार भाग हा त्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे, लॉकडाऊनच्या काळात येथील आदिवासी जनतेचे जगणे मुश्किल होते. त्याच अनुषंगाने शासनाने आदिवासी कुटुंबांना सहाय्य निधी सुरु केला आहे. अकोले तालुक्याचे माजी आमदार वैभव पिचड आणि विद्यमान आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आदिवासी खावटीबाबत पाठपुरावा केला होता. त्यामुळे, राज्यातील १२ लाख आदिवासी कुटुंबांना आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य मिळणार आहे.

           -"महत्वाचे"-

 कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे  ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यात उद्या बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहणार आहेत. या काळात संपूर्ण संचारबंदी राहणार आहे. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले आहेत.   


राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.


सर्व दुर्बल घटकांना दिलासा


आर्थिक दुर्बल घटकांमधील दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, महिला, वयोवृध्द नागरीक, विधवा, दिव्यांग, असंघटित क्षेत्रातील नागरिक, कामगार, रिक्षाचालक व आदिवासी समाज यांना विचारात घेवून आर्थिक सहाय देण्यात येणार आहे. यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, उद्योग-ऊर्जा व कामगार विभाग, नगर विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या माध्यमातून लाभार्थ्यांना अर्थसहाय देण्यात येणार आहे.


एक महिना मोफत अन्नधान्य


अन्न सुरक्षा योजना लाभार्थी मोफत अन्नधान्य योजनेतून राज्यातील सुमारे सात कोटी लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती ३ किलो गहू, २ किलो तांदूळ याप्रमाणे एक महिना मोफत अन्नधान्य  देण्यात येईल.


शिवभोजन थाळी मोफत


राज्यात शिवभोजन योजनेतून गरजूंना एक महिना शिवभोजन थाळी मोफत देण्यात येतील. सुमारे दोन लाख थाळ्या देण्याचे नियोजन आहे.


निवृत्तीवेतन योजना लाभार्थींना आर्थिक सहाय्य


या विभागाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना, अशा या पाच योजनेतील सुमारे ३५ लाख लाभार्थ्यांना दोन महिन्यांकरिता प्रत्येकी एक हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य आगाऊ देण्यात येईल.

बांधकाम कामगारांना अनुदान

नोंदणीकृत बांधकाम कामगार कल्याण योजनेंतर्गत महाराष्ट्र इमारत व इतर कामगार कल्याणकारी मंडळाच्या निधीमधून राज्यातील नोंदणीकृत अशा सुमारे १२ लाख बांधकाम कामगारांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अनुदान देण्यात येईल. याशिवाय राज्यातील २५ लाख घरेलू कामगारांसाठी विविध कल्याणकारी सहाय्यासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे.


फेरीवाल्यांना आर्थिक सहाय्य


राज्यातील सुमारे पाच लाख फेरीवाल्यांना प्रत्येकी पंधराशे रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येईल. ही रक्कम थेट फेऱीवाल्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील बारा लाख रिक्षाचालकांनाही प्रत्येकी पंधराशे रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येईल.


आदिवासी कुटुंबांना सहाय्य


आदिवासी विकास विभागाच्या खावटी योजनेचा लाभ घेत असलेल्या सुमारे १२ लाख आदिवासी कुटुंबांना प्रति कुटुंब दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य येईल.


कोविडवरील सुविधा उभारणी


याशिवाय जिल्हास्तरावरील टाळेबंदी कालावधीतील व्यवस्थापनासाठी सुमारे ३ हजार ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यांना कोविडवरील औषधोपचार, उपकरणे, सुविधा उभारणी व इतर व्यवस्थेसाठी हा निधी संबंधित जिल्ह्याला देण्यात येईल. याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य शासन व इतर शासकीय संस्था यांना द्यावे लागणारे कर, शुल्क व इतर देय रकमा या एप्रिल व मे या दोन महिन्यांसाठी विनाव्याज भरण्यासाठी परवानगी देण्यात येत आहे.

१ मे पर्यंत लॉकडाऊन सुरु.! 

1. महा. राज्यात 144 (जमावबंदी)लागू 

2. अत्यावश्यक वगळता येणे जाणे बंद

3. रात्री भटकता येणार नाही संचारबंदी असेल  

4. सकाळ ते सायंकाळ बरेचसे निर्बंध लागू

 5.अत्यावश्यक सुरू राहतील 

6.बस आणि लोकल फक्त अत्यावश्यक सेवासाठी सुरू राहतील

7. दररोजच्या बँक सुरू राहतील 

8. पेट्रोल पंप सुरू राहतील

9. भाजीपाला, दूध सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहील

10. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट चालु परंतु फक्त पार्सल सुरू राहिल.

11. रस्त्यावरील खाद्य विक्रेते यांना परवानगी आहे. मात्र, त्यांनी फक्त पार्सल सुविधा द्यावी.

12. गरिबांना 3 किलो गहू 

आणि 2 किलो तांदूळ 

मोफत एक महिन्यात 7 कोटी नागरिकांना मदत मिळेल

13. शिवभोजन थाळी एक महिने मोफत राहणार आहे.

14. उपाशी कोणी राहणार नाही यासाठी शासन प्रशासन सज्ज.!

15. इंदिरा गांधी , संजय गांधी , निराधार , अंध अपंग या योजना मधील 35 लाख नागरिकांना  अधिकचे 1000 रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.

16. नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य ( 12 लाख कामगार) 

17. नोंदणीकृत घरेलू कामगार यांना 1200 रुपये साहाय्य देण्यात येणार आहे.

18. अधिकृत फेरीवाले यांना 1500 रुपये मदत (5 लाख लोक)

19. परवानाधारक रिक्षाचालक यांना 1500 रुपये ( 12 लाख लाभार्थी) 

20. 3000 हजार कोटी जिल्हाधिकारी यांना देणार त्या त्या जिल्ह्यासाठी आवश्यक त्या योजना त्यांनी कराव्यात .