नामदार साहेबांचा ४३ लाखापैकी फक्त ७ लाख निधी खर्च.! मग प्रशासन करतय काय.! कसे लोकं मरायचे नाहीत.! साहेब सत्तेत असून संगमनेर व्हेंटीलेटरवर.!


सार्वभौम (संगमनेर) :-  
                   चाळीस वर्षे सर्व सत्तास्थान मिळुन देखील आरोग्य सुविधांच्या बाबतीत संगमनेर तालुका किती मागे राहीला याचे जळजळीत अंजन घालणारे पत्र सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी समाज माध्यमांमध्ये प्रसारित केले आहे. तालुक्याच्या आरोग्य सुविधेचे पुन्हा एकदा वाभाडे ओढून अनेक प्रश्न पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. तालुक्याचे कुटुंब प्रमुख म्हणुन नामदार बाळासाहेब थोरतांना आरोग्य सुविधा उभ्या करण्यात आलेल्या अपयशाचे खापर देखील या पत्रातुन थोरतांच्या माथी फोडले आहे.
          दरम्यान, गणेश बोऱ्हाडे यांनी कोविड कालावधीत निर्माण झालेल्या आरोग्य सुविधांच्या टंचाईचे विदारक चित्र या पत्रात नमुद केले आहे. त्यांनी या पत्रात म्हणले आहे की, मागील वर्षी केवळ रुग्णांची संख्या वाढली होती, म्हणून घुलेवाडी येथील ट्रामा सेंटरच्या इमारतीमध्ये कोविड रुग्णांवर उपचार सुरू झाले. पण, इथे ना खाटा होत्या ना कोणतीही सुसज्ज सुविधा, तरीही कोविड रुग्ण इथे दाखल होऊ लागले. तिथे असलेली आवश्यकता लक्षात घेऊन संगमनेर व्यवस्थापण नावाच्या ग्रुपमधील सदस्यांनी गोळा केलेल्या आर्थिक मदतीतुन ऑक्सिजनची व्यवस्था उभी राहिली याची आठवण करून देत भविष्यात तुमच्या समर्थकांनी मी काय दिवे लावले हे तुमच्या समर्थकांनी विचारू नये. उलट कोणी कोणी काय दिवे लावले हे आम्ही पडत्या काळात पाहिलेच आहे. म्हणून एक जाणीव ही पत्रात सुरवातीलाच करून दिली आहे.  जशी कोविडची संख्या कमी होऊ लागली त्यानंतर घुलेवाडी येथील आरोग्य केंद्र बंद केले गेले, तिथे असलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांना वेतन ही दिले जात नव्हते. इथले साहित्य ही परत पाठवून देण्यात आले, आता पुन्हा घुलेवाडी येथील कोविड सेंटर सुरू करावे लागले आहे. गेल्या वीस वर्षांपासून आपल्या माध्यमातून संगमनेरला मंत्रीपद आहे. पण, या कालावधीत 200 खटांचे शासकीय उपजिल्हारुग्णालय उभे राहु शकले नाही. याचे दुःख बोऱ्हाडे यांनी व्यक्त करतानाच उपजिल्हारुग्णालयाला परवानगी मिळायची वेळ आणि नामदार थोरतांच्या नातेवाईकांच्या स्व-मालकीच्या रुग्णालयाचा एका मोठ्या रुग्णालयाशी करार करण्याची वेळ, ही योगा-योगाने जुळून आली. असा खोचक टोला लावत बोऱ्हाडे यांनी तांबे यांच्यावर निशाणा साधल्याचे बोलले जात आहे. याकडे लक्षवेधत आता जिल्हा रुग्णालयाची इमारत पूर्ण होयला दोन-तीन वर्षे लागतील आणि सर्व रुग्णालय सुरू व्हायला तीन ते पाच वर्षे कालावधी लागु शकतो. या प्रश्नावरच बोऱ्हाडे यांनी भर दिल्याचे दिसते आहे. तर तांबे व थोरात कुटुंबाला थेट अजेंड्यावर घेतले आहे.
         गणेश बोऱ्हाडे यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या माहिती एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  त्यात म्हटले आहे की, नामदार थोरतांनी आपल्या आमदार निधीतून 43 लाख रुपये जिल्हा प्रशासनाला संगमनेर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधां करता उपलब्ध करून दिले होते. पण त्यातले फक्त आणि फक्त 6 लाख 73 हजार रुपयेच खर्च झाले. उर्वरित निधी खर्च का झाला नाही? याची विचारणा करतानाच हा निधी तालुक्यात वापरला गेला असता तर रुग्णांना मोठी मदत झाली असती. याच्या-त्याच्याकडे पैसे मागण्यापेक्षा हक्काचे ते घेताआले नाही आणि प्रशासन दानशूर व्यक्तींचा शोध घेत बसले. आज तालुक्यात रुग्णांना रुग्णवाहिका नाही, ऑक्सिजनयुक्त बेड नाही, रेमडेसीवर इंजेक्शन उपलब्ध नाही. या बाबी जिल्हा व औषध विभागाशी संबंधित आहेत. त्यांना तुम्ही योग्य आदेश दिले पाहिजे होते. पण ते न झाल्याची आठवण या पत्रात प्रामुख्याने करून देण्यात आली आहे. आता ना. थोरात तालुक्याचे कुटुंब प्रमुख आहेत कुटुंब टिकवण्याची जबाबदारी जशी त्यांच्यावर आहे. तशी नागरिकांवर देखील आहे, तरीही लॉकडाऊनच्या कालावधीत तुमच्याकडून अनेकांनी वाढदिवसाचे सत्कार सोहळे करून घेतले. याला ना. थोरतांनी वडीलकीच्या नात्याने विरोध करायला हवा होता., पण ते घडलेच नाही. उलट प्रदेश अध्यक्ष पदाच्या काळात संगमनेरात घेतलेली व्हर्च्युअल रॅली असो किंवा ग्रामपंचायत निवडणुक कोणतीही बंधने पाळली गेली नाहीत. नियमांचे पालन करण्याबाबत ना. थोरातांनी समर्थकांना सांगायला हवे होते. पण तसे घडले नाही. कारण यापूर्वी ही लॉकडाऊनच्या काळात कंटेन्मेंट झोन निर्माण केले नाहीत व या झोन मधल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोक शोधण्याचे प्रयत्न ही झाले नाही. त्यामुळे, आज रुग्ण संख्या वाढत असल्याचे बोऱ्हाडे यांनी पत्रात गांभीर्याने दाखवुन देतानाच रुग्णांच्या विलगीकरणाच्या बाबतीत ना. थोरतांच्या समर्थकांना एक न्याय आणि सामान्य नागरिकांना वेगळा न्याय अशी भुमिका कशी चालेल? असे पत्रात नमुद केले आहे.
            दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते गणेश बोऱ्हाडे यांनी ना. बाळासाहेब थोरात यांच्यावर कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे खापर फोडले असून, तुमच्या ४० वर्षाचे संगमनेरच्या आरोग्यासाठी उपयोग काय? असा सवाल उपस्थित केला आहे. खरंतर, ४३ लाखांचा निधी प्रशासन खर्ची करु शकले नाही हे तालुक्यासाठी फार धक्का देणारी बाब आहे. अकोले तालुक्यात समशेरपूर ग्रामसेवकाने फक्त सी व्हिटॅमिन्सच्या गोळ्या वाटल्या नाही म्हणून त्यांना निलंबित केले होते. आता ज्यांना या निधीची गरज वाटली नाही. त्यांचे काय करायचे? हा प्रश्न संगमनेरकरांनी साहेबांना विचारला पाहिजे. म्हणजे, एकीकडे रोज मानसे मरत आहेत. शेकडो लोक कोरोना बाधित होत आहेत. त्यास रोखण्यास प्रशासनअपयशी होत असताना त्यांना निधी नको, रिझल्ट द्यायला नको, मृत्युचे प्रमाण घटवायला नको, कोरोनाची आकडेवारी कमी करायला नको. मग, यांना पाहिजे तरी काय? संगमनेरचे चीन होताना पहायचे आहे की काय? असा प्रश्न जनता उपस्थित करु लागली आहे.
         बोऱ्हाडे यांनी नामदार साहेबांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली आहे. यांना बर्थडे धुमधडाक्यात करायला आवडतो, मात्र बहुतांशी कार्यकर्त्यांकडे सामाजिक भान राहिलेले नाही. कोरोनाच्या काळात अपवाद वगळता कोणी पुढे धावलेले दिसले नाही. याला साहेबांनी देखील खतपाणी घातल्याचे त्यातून स्पष्ट केले आहे. साहेबांनी बडे बडे बिल्डर, ठेकेदार केले पण, संगमनेरच्या पडत्या काळात त्यांच्याकडून बॅनरबाजी वगळता काही उत्तरदायीत्व दिसून आले नाही. साहेबांनी कार्यकर्ते इतके मोठे केले की त्यांच्यावर इनकम टॅक्सच्या धाडी पडू लागल्यात. मात्र, साहेबांच्या नावाखाली कार्यकर्ते संगमनेरात काय-काय करतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. साहेब मात्र आपल्या मतांची गोळाबेरीज करण्यात  व्यस्त असतात. संगमनेरात कार्यकर्ते सोडून जनतेकडे आणि मलिदा जमा करणाऱ्या प्रशासनाकडे किती लक्ष  आहे. हे कोविडची आकडेवारी पाहून लक्षात येते. यापेक्षा वेगळे प्रमाण साय हवे.! आता या पत्राची दखल साहेब किती घेतात माहित नाही. मात्र, अशा महत्वाच्या मुद्द्यांना कानामागे टाकले नाही म्हणजे बरे.

कोविडच्या काळात या महामारीचे प्रदुर्भाव रोखण्यासाठी शासनाने ११ नोव्हेंबर २०२० रोजी  जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना लाखो रुपयांचा निधी मंजूर केला होता.  त्यात आमदर अशितोष काळे  (कोपरगाव) यांना कोविडसाठी ४९ लाख ९२ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी जानेवारी २०२१ अगोदर २१ लाख ९३ हजार खर्च केला आहे. बाकी, काय झाले हे त्यांनाच माहित.

 शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना कोविडसाठी ४६ लाख ५६ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी जानेवारी २०२१ अगोदर ३ लाख ४९ हजार खर्च केला आहे. बाकी, काय झाले हे त्यांनाच माहित.

अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांना कोविडसाठी ४९ लाख ९९ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी जानेवारी २०२१ अगोदर ४२ लाख ५२ हजार खर्च केला आहे. तर नंतर पुन्हा १६ लाख ८६ हजार मंजूर झाला होता. तो लहामटे डॉक्टरांनी पुर्णपणे खर्च केला आहे.

श्रीरामपूर आमदार कानडे  यांना कोविडसाठी चार वेळा निधी मंजूर झाला होता. त्यात ३१ लाख ३४ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी जानेवारी २०२१ अगोदर ३० लाख ०५ हजार खर्च केला आहे. म्हणजे जवळ-जवळ सर्वच निधी खर्च केला आहे.

पाथर्डी व शेवगाव तालुक्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांना कोविडसाठी ५२ लाख ६५ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी जानेवारी २०२१ अगोदर २८ लाख ०४ हजार खर्च केला आहे. बाकी,  त्यांनी का खर्च केला नाही त्यांनाच माहित.

राम शिंदे यांना पराभूत करुन पवार कुटुंबाचा चेहरा समोर आला तो म्हणजे राहित पवार. यांना  कोविडसाठी १ कोटी ३९ लाख ६६ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी जानेवारी २०२१ अगोदर ३२ लाख ४७ हजार खर्च केला आहे. बाकी, काय झाले व त्यांनी का खरचले नाही हे त्यांनाच माहित.

नेवासा तालुक्याचे आमदार तथा मंत्री महोदय शंकरराव गडाख यांना कोविडसाठी २९ लाख ९२ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी जानेवारी २०२१ अगोदर २९ लाख ८८ हजार खर्च केला आहे. म्हणजे सर्वच निधी त्यांनी खरचला आहे. 

दक्षिण विभागाचे खासदार डॉ. सुजय विखे यांना कोविडसाठी २ कोटी ४  लाख रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी जानेवारी २०२१ अगोदर १ कोटी ९९ लाख खर्च केला आहे. बाकी, काय झाले हे त्यांनाच माहित.

संगमनेरचे आमदार तथा महा. राज्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांना कोविडसाठी ४३ लाख ३ हजार रुपये निधी मंजूर झाला होता. त्यापैकी त्यांनी जानेवारी २०२१ अगोदर ०६ लाख ७३ हजार खर्च केला आहे. बाकी, काय झाले हे त्यांनाच माहित. विशेष म्हणजे संगमनेरात इतके कोविड रुग्ण असून जिल्ह्यात संगमनेर टॉपर आहे. मात्र, भर कोविडच्या काळात असे निधी मिळून देखील ते योग्यवेळी सत्कर्मी लागत नाही हे फार मोठे दुर्दैव आहे.

 

(टिप :- वरील सर्व माहिती माहिती अधिकारात प्राप्त झालेली आहे.)
    -   सुशांत पावसे