अकोल्यात रुग्ण 178 व 2 मयत .! सोमवार पासून जनता कर्फ्यु!



- सागर शिंदे 
सार्वभौम (अकोले) :-

                       जिल्हाधिकार्‍यांकडून संगमनेर व अकोले तालुक्यासाठी संगमनेर प्रांत यांच्याकडे 482 रेमेडीसिवीर मिळले होते, ते वाटप करण्याचे काम प्रांताधिकार्‍यांनी संगमनेर तहसिलदार अमोल निकम यांच्यावर सोपविले होते. निकम यांनी संगमनेरसाठी 472 रेमेडीसिवीर दिले तर अकोल तालुक्यासाठी केवळ 10 रेमेडीसिवीर दिले. त्यामुळे, मार्कवादी कम्युनिष्ट पक्षाचे डॉ. अजित नवले हे चागलेच भडकले आहेत. त्यांनी उद्या शुक्रवार दि. 17 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1 वाजता सोशल डिस्टन्सीग पाळून शासनाविरुद्ध एल्गार पुकारणार असल्याची घोषणा केली आहे. तर अकोले तालुक्यात कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. आज तालुक्यात पाच हजारांचा आकडा येथे पार झाला असून रोज दिडशेच्या पटीने संख्या वाढते आहे. त्यामुळे, कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी स्थानिक नागरिक, व्यापारी वर्ग व प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे.

काल अकोले तालुक्यात १७८ रुग्ण मिळून आले. त्यानंतर गणोरे येथील ५० वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर, अकोले शहरातील नाईकवाडी वाडा येथील ३४ वर्षीय तरुणाचा गुजरात येथे कोरोनाने मृत्यू झाला आहे. हा तरुण अकोले येथील असला तरी त्याचा आणि तालुक्याचा संपर्क झालेला नाही. मात्र, याचे वडिल पुर्वी कारखाण्यावर कामाला होते, ते मयत झाल्यानंतर मोठ्या संघर्षातून या तरुणाने आपले आयुष्य उभे केले होते. हा नोकरी निमित्त गुजरातला होता. तिकडेच त्याला कोरोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याने अखेरचा श्वास सोडल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, तालुक्यातील लोक जिवाच्या आकांताने बेड मिळेल तिकडे उपचारासाठी दाखल होत आहे. मात्र, ते तिकडेच मयत होतात याची साधी खबर देखील स्थानिक प्रशासनाला होत नाही. लोक पॉझिटीव्ह होतात, बेड शोधतात आणि जगून घरी येतात किंवा तिकडेच मरतात, तेथेल प्रशासन त्यांना जळते किंवा पुरते असा भयानक प्रकार सद्या सुरु आहे. आपला माणूस गेला. हे त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकांना देखील कळत नाही. त्यामुळे, दुसऱ्याच्या भरवशावर बसू नका. काळजी घ्या.

 सोमवार दि. 19 एप्रिल ते शुक्रवार पर्यंत फक्त अत्यावश्यक सेवा त्या देखील सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर प्रत्येक शनिवार आणि रविवार पुर्णत: कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. हा निर्णय नगर जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये लागू असणार आहे. या दरम्यान जर कोणी अति शहणा रस्त्यावर कोणत्याही फालतु कारणास्तव मिळून आला तर त्याला मोठ्या दंडात्मक कारवाईसह पोलिसांच्या महाप्रसादाला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जनतेने सहकार्य करावे अशी विनंती प्रशासनाने केली आहे. तर संगमनेरात 10 हजारांचा टप्पा पार केला असून आज तालुक्यात 168 रुग्ण मिळून आले आहेत. तर जिल्ह्यात एकाच दिवशी 3 हजार 56 रुग्ण पॉझिटीव्ह मिळून आले असून एकट्या कोपरगावमध्ये 730 रुग्ण आहेत.

आज अकोले तालुक्यात राजूर येथे 29 वर्षीय तरुणी, 36 व 63 वर्षीय पुरुष, काताळापूर येथे 45 व 25 वर्षीय पुरुष, निळवंडे येथे 65 पुरुष तर 55 वर्षीय महिला, वारंघुशी येथे 45 वर्षीय पुरुष, पाडाळणे येथे 25 वर्षीय पुरुष, माळेगाव येथे 33 वर्षीय पुरुष, डोंगरगाव येथे 45 वर्षीय पुरुष, गणोरे येथे 39, 65 व 35 वर्षीय पुरुष, वर 65 वर्षीय महिला,  विरगाव येथे 49 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 38 वर्षीय पुरुष, कोंभाळणे येथे 38, 65 व 50 वर्षीय पुरुष तर 62 वर्षीय महिला, पैठण येथे 17 वर्षीय मुलगी 36 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, कोहणे येथे 46 वर्षीय पुरुष तर 48 वर्षीय महिला,  म्हाळादेवी येथे 13 वर्षीय बालिका, 14 वर्षीय बालिका, 75 वर्षीय महिला, 14 वर्षीय बालिका, गरवाडी येथे 62 व 29 वर्षीय पुरुष, 5 वर्षीय बालिका, 20 वर्षीय तरुणी, करंडी येथे 90, 24 वर्षीय पुरुष, चिचोंडी येथे 41 वर्षीय पुरुष, खडकेड (शेंडी) येथे 46 वर्षीय पुरुष, भंडारदार येथे 32 वर्षीय पुरुष, मुतखेल येथे 22 वर्षीय पुरुष, समशेरपूर येथे 40 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय तरुणी, कोंभाळणे येथे 10 वर्षीय बालक, 27 वर्षीय तरुणी,

  सावरगाव येथे 55 वर्षीय पुरुष, कळस येथे 20, 47 वर्षीय पुरुष, 44, 14 वर्षीय महिला, कोतुळ येथे 20 व 18 वर्षीय तरुणी, 16 व 14 वर्षीय तरुण, शिळवंडी येथे 23 व 75 वर्षीय पुरुष, फोफसंडी येथे 46 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 40 वर्षीय पुरुष, पिंपळगाव खांड येथे 30 वर्षीय महिला, 8 वर्षीय बालक, लहित बु 9 वर्षीय बालिका, केळी कोतुळ येथे 24 वर्षीय पुरुष, धामनगाव पाट येथे 32 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 31 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरूष, चास येथे 37 वर्षीय पुरुष, ढोकरी येथे 58 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 35 वर्षीय पुरुष, वाशेरे येथे 74 वर्षीय पुरुष व 18 वर्षीय तरुणी, गांधी चौक अकोले येथे 35 वर्षीय पुरुष, इंदोरी-रुंभोडी येथे 21 वर्षीय तरुण, 26 वर्षीय तरुणी, 29 वर्षीय तरुण, घोटी येथे 73 वर्षीय पुरुष, गोंदोशी येथे 75 वर्षीय पुरुष, गर्दनी येथे 23 वर्षीय पुरुष तर 24 वर्षीय तरुणी व 45 वर्षीय महिला, कळस येथे 38 वर्षीय महिला, अकोले येथे 76 वर्षीय पुरुष, चितळवेढे येथे 42 वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथे 46 वर्षीय पुरुष, म्हळादेवीत येथे 45 वर्षीय महिला, 

गर्दनी येथे 55 वर्षीय पुरुष, रेडे येथे 24 वर्षीय पुरुष, अकोले येथे 54 व 72 वर्षीय महिला, हिवरगाव येथे 48 वर्षीय पुरुष, धुमळवाडी येथे 50 वर्षीय पुरुष, बहिरवाडी येथे 33 वर्षीय पुरुष, अकोले येथे 60, 69, 32, 18, 50 वर्षीय पुरुष, ढोकरी येथे 50 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला, टाकळी येथे 35 वर्षीय पुरुष, धुमळवाडीत येथे 29 वर्षीय पुरुष, डोंगरगाव येथे 55 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 23 वर्षीय पुरुष, परखतपूर येथे 53 वर्षीय महिला, उंचखडक बु येथे 52 वर्षीय पुरुष, रुंभोडी येथे 32 वर्षीय पुरुष, धुमळवाडी येथे 45 वर्षीय महिला, धामनगाव आवारी येथे 37 वर्षीय पुरुष व 32 वर्षीय महिला, तांभोळ येथे 68 वर्षीय महिला, म्हाळदेवी येथे 27 वर्षीय तरुणी, 2 वर्षीय बालिका, डोंगरगाव येथे 70 वर्षीय महिला, अकोले येथे 48 व 42 वर्षीय महिला व 54,20 वर्षीय पुरुष, 17 वर्षीय तरुण, समशेरपूर येथे 78, 40 वर्षीय पुरुष, मुथाळणे येथे 38 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय बालिका, 30 वर्षीय महिला, नाईकरवाडी (समशेरपूर) येथे 20 व 13 वर्षीय तरुणी, पाडळी येथे 68 वर्षीय पुरुष, 15 वर्षीय तरुण, समशेरपूर येथे 15 वर्षीय तरुणी, 52 वर्षीय पुरुष, 38 व 45 वर्षीय महिला, राजूर येथे 18, 32, 30,43, 6

75, 82, 21, 24, 16, 57, 32, 38 वर्षीय पुरुष, 21, 17, 39, 33,62,38 वर्षीय महिला, 12 वर्षीय तरुणी, 11, 10 वर्षीय बालक खानापूर येथे 32 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे 53, 50 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय महिला, टाकळी येथे 25 वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे 35 वर्षीय महिला, सुगाव खु येथे 24 वर्षीय तरुणी, 41, 21 वर्षीय महिला, आंबड येथे 45 वर्षीय पुरुष, अकोले येथे 68 वर्षीय महिला तर 60 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 11 वर्षीय बालिका, 13 वर्षीय बालक, कुंभेफळ येथे 75 वर्षीय पुरुष, 41 वर्षीय महिला, 15 वर्षीय बालिका, तांभोळ येथे 52, 30 वर्षीय पुरुष, मेहेंदुरी येथे 42 वर्षीय महिला अशा 178 रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकूण संख्या 5 हजार 642 इतकी झाली आहे. तरी देखील अकोल्याला केवळ 10 रेमेडीसिवीर येतात हे फार मोठे दुर्दैव आहे. येथील जनतेसाठी झगडून न्याय आणणारा कोणी नाही की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यासाठी डॉ. अजित नवले यांनी पुढाकार घेतल्याचे दिसते आहे. 

अकोलेसह राजूर शहरासह आदिवासी परिसरात रुग्ण संख्येत वाढत आहे. दररोज १०० ते १५० रुग्ण तालुक्यात मिळून येत आहेत.कोरोणाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून,सोमवारच्या आठवडे बाजार बंद झाल्याने इतर दिवशी भाजीपाला किराणा मालासाठी नागरिकांच्या गर्दीने उच्चांक मोडला.अनेक नागरिक विना मास्क भाजीपाला खरेदी करण्यासाठी गुजरी मध्ये फिरत असल्याचे आढळून आले.एकंदरीत राजूर शहरात सोशियल डिस्टन्सिगचा फज्जा उडाला.किराणा दुकानात मोठी गर्दी होऊ लागली,दुकानदारांचा मनमानी कारभार सुरूच होता.मात्र ग्रामपंचायत काही कार्यवाही करताना दिसत नव्हती पण रुग्ण संख्येत वाढ होत होती हे लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित ठेवण्या करिता काही तरी उपाय तर करावा लागेल अशी भूमिका घेत व्यापारी व नागरिकांना मिळून राजूर ग्रामपंचयात ला विश्वासात घेऊन राजूर ग्रामपंचायत ने जनता कर्फ्यु चे नियम असे आहेत.

  दिनांक 17 एप्रिल 2021 रोजी पासून ते 24 एप्रिल 2021 पर्यंत राजूर गावात जनता कर्फ्यु लागू करण्यात आला आहे. दवाखाने व मेडिकल सुरळीत चालू राहतील, ज्या दुकानदारांच्या कुटुंबात कोरोना संक्रमित रुग्ण असतील त्यांनी आपले दुकान 14 दिवस बंद ठेवणे, दुध विक्री सकाळी 7 ते 9 पर्यंत राहतील, या कर्फुमध्ये कोणीही विनाकारण फिरताना दिसेल त्यास पोलिस प्रशासन दंड करेल अशी माहिती राजूर गावचे सरपंच गणपतराव देशमुख यांनी दिली. या वेळी राजूर येथील सर्व व्यापारी व नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले.  यावेळी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे,पोलीस उपनिरीक्षक नितीन खैरनार व कर्मचारी तसेच तलाठी कामगार ज्ञानेश्वर बांबळे,वैद्यकीय अधिकारी रामनाथ दिघे,डॉक्टर शेळके,सरपंच गणपतराव देशमुख,उपसरपंच गोकुळ कानकाटे,भास्करराव एलमामे,पत्रकार व  नागरिकांच्या उपस्थितीत शनिवार पासून ८ दिवसांचा जनता करफू जाहीर करण्यात आला असून या काळात जो कोणी शिस्त भंग करेल व नियम मोडताना आढळून येईल त्यास प्रत्येकी ५००० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येईल असे ग्रामपंचयात कार्यालयाने आव्हान केले आहे.केलेला दंड वसूल हा राजूर येथील कोविड सेंटर येथे असलेल्या रुग्णांना जेवणाची व्यवस्था तसेच गोळ्या औषधांचा खर्च करणे कामी करण्यात येईल असे आव्हान करण्यात आले आहे. यावेळी रोख रक्कम 50 ते 60 हजार रुपये गोळा करण्यात आली आहे. तर राजूर मधील काही भाजी विक्रेत्यांकडून भाजीपाला मोफत देण्याचे आश्वासन दिले आहे.  काही व्यक्तींनी पैसै स्वरूपात तर काहींनी वस्तू स्वरूपात मदत केली आहे.


रेमेडीसिवीर पाहिजे का?

आता रेमेडीसिवीर पाहिजे असल्यात त्यासाठी काय करावे लागेल यासाठी जिल्हाधिकारी यांनी एक आदेश काढला आहे. त्यात ज्या रुग्णालयांना रेमेडीसिवीर पाहिजे आहे. त्यांनी दररोज सकाळी 9 वाजता रुग्णालयांना दिलेल्या ई-मेलवर रुग्णाचे नाव वैगरे मचकूर असणारा फॉर्म भरुन पाठवायचा आहे. त्यावर जबाबदार डॉक्टरांचा सही शिक्का असणे बंधनकारक आहे. त्यासाठी संबंधित रुग्णालयाने एक नोडल अधिकारी नेमायचा आहे. कायदेशी बाबी पुर्ण केल्यानंतर खात्री करुन संबंधित रुग्णालयात रेमेडीसिवीर मिळेल. मात्र, त्यांनी ते रेमेडीसिवीर वापरल्यानंतर त्याची रिकामी बॉटल जपून ठेवायची आहे. जेव्हा त्या दवाखाण्याचे ऑडीट केले जाईल तेव्हा ते देखवायचे आहे. अन्यथा विहीत कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.


राजकारण केले भाडमध्ये.!

अकोले व संगमनेर तालुक्याला एकच प्रांत आहे. त्यांच्याकडे दोन तालुक्याला मिळून रेमेडीसिवीर मिळाले 482 ते वितरीत करण्याचे काम प्रांताधिकार्‍यांनी संगमनेर तहसिलदार अमोल निकम यांच्यावर सोपविली होती. निकम यांनी संगमनेरसाठी दिले 472 तर अकोल तालुक्यासाठी दिले 10. मग हा भेदभाव का? असा प्रश्न विचारला गेला. तेव्हा त्यांनी ऊत्तर दिले की, हे विभाजन आम्ही रुग्णसंखेनुसार करतो आहे. मग रूग्णसंख्या पाहिली तर अकोले व संगमनेर यात रुग्णसंख्या यात फारशी तफावत नाही. तुम्ही 472 आणि 10 यात कोणती व कशी तुलना केली? यात देखील राजकारण होताना दिसत आहेत. अकोल्यात जास्त कमजोरी आहे म्हणून आमच्यावर अन्याय होतोय का? त्यामुळे, उद्या शुक्रवार दि. 17 एप्रिल 2021 रोजी दुपारी 1 वाजता सोशल डिस्टन्सीग पाळून शासनाविरुद्ध एल्गार पुकारणार आहोत. राजकारण गेले भाडमध्ये.!

 - डॉ. अजित नवले


- आकाश देशमुख