अकोल्यात 140 रुग्ण तर संगमनेरात 267 पॉझिटीव्ह.! खा. लोखंडेंवर शाई फेकण्याचा प्रयत्न.!

 

सार्वभौम (संगमनेर) :-

                      संगमनेरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आज संगमनेर मध्ये कोरोनाने उच्चांक गाठला आहे. आज गुरुवार दि.15 एप्रिल रोजी तालुक्यात 267 रुग्ण आढळून आले आहेत. तर मागील आठ दिवसात तब्बल 1 हजार 248 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, संगमनेरमध्ये शहरासह तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. कोरोनाचा दिवसागणिक वाढता आकडा संगमनेरकरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. कारण ऑक्सिजन बेडसाठी रुग्णाच्या नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. तर रेमडीसीवर इंजेक्शनसाठी प्रशासनापुढे हात टेकले आहे. त्यामुळे या कोरोनाच्या परिस्थितीशी संगमनेरकरांना अजुनही कडवी झुंज द्यावी लागणार आहे. आज तालुक्यात 208 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 1 हजार 574 रुग्ण ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

           दरम्यान, आजवर संगमनेर तालुक्यात 52 हजार 261 पेक्षा अधिक संशयितांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. त्यापैकी 11 हजार 192  नागरिक कोरोनाच्या विळख्यात अडकले होते. यावेळी कोरोनाशी लढताना 71 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आता रोज 100 पेक्षा अधिक रुग्ण रोज नव्याने कोरोना  बाधित मिळून येऊ लागले आहेत. आजपर्यंत तालुक्यात प्रशासकीय यंत्रणेनी योग्य ती पाऊले उचली म्हणून रिकवरी रेट हा 85.30 टक्के आहे. त्यामुळे, 9 हजार 547 रुग्ण सुखरूप होऊन घरी परतले आहे. यामागे कोरोना काळात काम करणाऱ्या पोलीस, महसुल व आरोग्य विभागासह सामाजिक संस्था आणि व्यक्तींचा फार मोठा वाटा आहे. आता लग्नसमारंभाचे दिवस सुरू आहे. त्या हर्षापोटी लोक कोरोनाला विसरून गेले असून प्रशासनाची परवानगी न घेता लग्न सोहळे पार पाडताना दिसत आहे. त्यामुळे, लग्न सोहळ्याच्या माध्यमातून कोरोना संगमनेरकरांच्या मानगुटीवर पुन्हा एकदा बसत आहे.

           दरम्यान, शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावर नेवासा येथील पंचायत समिती सभागृहात शाई फेकण्याचा प्रयत्न झाला. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते संजय सुखदान यांनी हा प्रयत्न केला. कोरोना काळात नेवासा तालुक्यासाठी तुम्ही काय केले? असा प्रश्न करत त्यांनी खा.लोखंडेवर शाई टाकण्याचा प्रयत्न केला. पण, वेळीच पोलिसांनी रोखल्याने सुखदान यांना खा.लोखंडे पर्यंत जाता आले नाही. त्यानंतर खा.लोखंडे यांनी सुखदान यांच्याशी चर्चा केली.

        दरम्यान, खा. लोखंडे यांचा कोरोना काळात मदत केली म्हणुन देशात 25 वा नंबर आला आहे. पण, आजपर्यंत त्यांनी कुठं मदत केली असा प्रश्न सामन्य नागरिकाच्या मनात भेडसावत आहे. त्यामुळे खा. लोखंडेवर सोशल मीडियातुन टिकेची झोड उठवली आहे. ते या सामन्य नागरिकांना काय दिलासा देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत. सद्या खा. लोखंडे यांनी शिर्डी मतदारसंघात प्रशासनाबरोबर बैठका घेण्यास सुरवात केली आहे. यात ते ठोस पावले उचलतात की फक्त फोटो काढण्यासाठी बैठका घेतात अशी ही टिका जनतेकडून होत आहे.

तर अकोले तालुक्यात आज १४० रुग्ण मिळून आले आहेत. त्यात बारी येथे ३१ वर्षीय पुरुष, 23 वर्षीय महिला, विरगाव येथे २८ वर्षीय पुरुष, सावरगाव येथे २६ वर्षीय तरुण, ६५ वर्षीय महिला, १८ वर्षीय तरुण, बलठण येथे ३१ वर्षीय पुरुष, चैतन्यपूर येथे ४० वर्षीय पुरुष, ६५ पुरुष, जांभळे येथे ५० वर्षीय पुरुष, १८ वर्षीय मुलगी, ६० वर्षीय महिला, ७० वर्षीय पुरुष, ३९ वर्षीय पुरुष, २२ वर्षीय तरुणी, करंडी येथे २२ वर्षीय तरुणी, १६ वर्षीय तरुणी, २० वर्षीय तरुणी, ब्राम्हणवाडा येथे ५२ वर्षीय पुरुष, कोतुळ येथे ४० वर्षीय पुरुष, ५२ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय तरुणी, ७ वर्षीय बालिका, ४ वर्षीय बालिका, गरवाडी येथे ७ वर्षीय बालिका, कोतुळ येथे २९ वर्षीय तरुष, पिंपळगाव खांड येथे ६६ वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे ५५ वर्षीय महिला, लहित खुर्द येथे ४७ वर्षाय पुरुष, ७० वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिला, विहिर कोहणे येथे २५ वर्षीय तरुणी, २१ वर्षीय तरुण, लहित बु येथे ६५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, शिळवंडी येथे ६७ वर्षीय महिला, वाघापूर येथे ६५ वर्षीय महिला, कोतुळ येथे १८ वर्षीय तरुण, ४२ वर्षीय महिला, रुंभोडी येथे २ वर्षीय बालिका, धुमाळवाडी २९ वर्षीय तरुण, अंबड येथे ६७ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय तरुणी, ५० वर्षीय महिला, ४५ वर्षीय महिला, २२ वर्षीय तरुणी, रुंभोडीत १० वर्षीय तरुण, ३५ वर्षीय महिला, चितळवेढे येथे ३५ वर्षीय महिला, १७ वर्षीय तरुणी, मेहेंदुरी येथे ७० वर्षीय पुरुष, निब्रळ येथे ५० वर्षीय महिला, कळस येथे ४० वर्षीय महिला, बारी येथे ४१ वर्षीय पुरुष, २४ वर्षीय तरुणी, ३२ वर्षीय पुरुष, चिचोंडी येथे ७६ वर्षीय पुरुष, गोंदोशी येथे २८ तरुणी, ६ वर्षीय बालक, भंडारदरा येथे २५ वर्षीय तरुणी, २७ वर्षीय तरुण, ७० वर्षीय पुरुष, मुरशेत येथे ४० वर्षीय पुरुष, ३८ वर्षीय महिला, समशेरपूर येथे ६५ वर्षीय पुरुष, डोंगरगाव येथे ५९ वर्षीय महिला, कोंभाळणे येथे २९ वर्षीय तरुण, नागवाडी समशरपूर येथे २९ वर्षीय तरुणी, वारंघुशीत ४८ वर्षीय महिला, ३२ वर्षीय महिला, ५१ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष, १७ वर्षीय तरुणी, ११ वर्षीय तरुण, ३२ वर्षीय पुरुष, २६ वर्षीय तरुणी, ५२ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष, ३० वर्षीय पुरुष, ५० वर्षीय महिला, ३० वर्षीय महिला, २९ वर्षीय तरुणी, ५० वर्षीय पुरुष, ५ वर्षीय बालक, वाकी येथे ४९ वर्षीय पुरुष, जहागिरदार वाडी २७ वर्षीय पुरुष, ३१ वर्षीय पुरुष, २३ वर्षीय तरुण, ३० वर्षीय महिला, ६० वर्षीय महिला, बारी येथे ७० वर्षीय पुरुष, लिंगदेव येथे ७ वर्षीय बालक, ३४ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, कोहणे येथे ६४ वर्षीय पुरुष, ५७ वर्षीय महिला, डोंगरगाव येथे ४३ पुरुष, बेलापूर येथे ४७ वर्षीय पुरुष, इंदोरीत ४० वर्षीय महिला, पिंपळगाव निपाणी येथे ५५ वर्षीय पुरुष, धामनगाव पाठ येथे ५९ वर्षीय पुरुष, विठे येथे ५३ वर्षीय पुरुष,  धामनगाव आवारी येथे ४६ वर्षीय पुरुष, अकोले शहरात ४२ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, कारखाना रोड येथे ४ वर्षीय बालक, ३२ वर्षीय महिला, आंभोळ येथे ३० वर्षीय महिला, कुंजन हॉटेल परिसर कोल्हार घोटी रोड ५६ वर्षीय पुरुष, संभाजीनगर कॉलनी, सरस्वती कॉलनी येथे ५२ वर्षीय पुरुष, म्हळादेवी येथे ४२ वर्षीय महिला, ३२ वर्षीय पुरुष, विठे येथे ४३ वर्षीय महिला, रुंभोडीत ३५ वर्षीय पुरुष, मेहेंदुरी येथे ३८ वर्षीय पुरुष, चास येथे ३१ वर्षीय पुरुष, धामनगाव पाठ येथे २९ वर्षीय तरुण, २३ वर्षीय तरुण, इंदोरीत ४९ वर्षीय पुरुष, चास येथे २६ वर्षीय तरुणी,कोतुळ येथे ५९ वर्षीय पुरुष, गणोरे येथे २२ वर्षीय तरुण, नेता सुभाष रोड अकोले येथे ३७ वर्षीय पुरुष, मवेशीत ३२ वर्षीय तरुण, २७ वर्षीय तरुणी, ४ वर्षीय बालिका, सुगाव बु येथे ५९ वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे १९ वर्षीय तरुणी, १६ वर्षीय तरुण, उंचखडक खु येथे ३२ वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, ६६ वर्षीय महिला २७ वर्षीय तरुणी, गुरवझाप येथे २३ वर्षीय तरुण, नवलेवाडीत २६ वर्षीय तरुणी, कळस येथे ५१ वर्षीय पुरुष, नवलेवाडीत ४५ वर्षीय महिला, २० वर्षीय तरुण असे आज एकूण १४० रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे, आजपर्यंत अकोल्यात ५ हजार ४६३ रुग्णसंख्या झाली आहे तर ७८ जणांचा आजवर मृत्यू झाला आहे.

       तर, अकोले शहराच्या लगत अगस्ती मंदिर भक्त निवासस्थान येथे उद्यापासून दि. १६ एप्रिल २०२१रोजी १५० ते २०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. त्याची पाहणी डॉ. किरण लहामटे, जिल्हा बॅंकेचे माजी चेअरमन सिताराम पाटील गायकर तसेच तहसिलदार मुकेश कांबळे यांंच्यासह काही प्रतिष्ठित व्यक्तींनी पाहणी केली आहे. तर ऑक्सिजनचे बेड कमी पडताय ते पण  काही दिवसात वाढवले जातील अशी माहिती नोडल अधिकारी डॉ. श्यामकांत शेटे यांनी दिली आहे.