चिंगू मास्तरांचे दानशुरत्व, दिले 15 लाखांचे 50 ऑक्सिजन बेड.! त्या श्रेयवादावर नालायकांचा डोळा.! आज 93 पॉझिटीव्ह, पाच मयत!

सार्वभौम (अकोले) :- 

                         अकोले तालुक्यात प्रशासन हतबल झाले आहे. ऑक्सिजन पुर्णत: संपला आहे. रोज चार ते पाच जणांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत कोणी राजकारणी तालुक्याच्या हितासाठी धावून आला नाही. मात्र, ज्यांना इतिहासाच्या परंपरेत चिंगू म्हणून गणले गेले अशा शिक्षक कर्मचार्‍यांनी तालुक्याचे पालकत्व घेण्यास पुढाकार घेतला आणि थेंबे-थेंबे साचवून त्यांनी पैशाचा समुद्र उभा केला आहे. अक्षरश: व्हाट्सअ‍ॅपवर 15 ते 16 लाख रुपये जमा करुन सुगाव खुर्द येथे 50 ऑक्सिजन बेड उभे केले आहे. त्यानंतर एकएक व्यक्ती पुढे आले आणि त्यांनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे त्यांना जे लोक आजवर चिंगू म्हणत आले, त्यांना या शिक्षकांची चांगलीच चपराख दिली आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हे कोण्या राजकारण्यांचे योगदान नसून बोलक्या बाहुल्यांप्रमाणे मी-मी म्हणत मिरविणार्‍यांच तर योगदान नाहीच नाही. त्यामुळे, याचे सर्व श्रेय्य प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक यांच्यासह सिताराम पाटील गायकर, मधुभाऊ नवले, वैभव पिचड, डॉ. लहामटे, नितीन गोडसे, म्हाळादेवी ट्रस्ट, एडीसीसी स्टाफ, राजेश पाडेकर यांच्यासह काही अन्य काही छोटी मोठी मदत करणार्‍यांचे आहे. त्यामुळे, तेथे कोणी चार आण्याची कोंबडी आणि 12 आण्याची बडबड करुन श्रेय्य लुटण्याचा प्रयत्न करीत असेल तर मी एव केले मी तेव केले या अविर्भावात बोलणार्‍याचे शब्द एका कानाने एका आणि दुसर्‍या कानाने सोडून द्या. आज अकोले तालुक्यात 115 रुग्ण मिळून आले आहेत. तर दोन दिवसात पाच जणांचा बळी गेला आहे.

खरंतर जेव्हा तालुका व्हेंटीलेटवर होता तेव्हा त्याला कोणी वाली नव्हते. मात्र, त्यानंतर एकएक करुन तालुक्यातील तरुणांनी मोट बांधली आणि रेमडिसीवीर व ऑक्सिजन जमा केले. आज अकोले तालुका अशा भयानक परिस्थिती आहे की, येथे फक्त रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार करायला योग्य औषधे नाहीत. योग्यतो आरोग्याचा स्टाप नाही. या तालुक्याचे दुर्दैव असे आहे की, सरकारी दवाखाण्यात दोन व्हेंटीलेटर अगदी नवे कोरे पडून आहेत. फक्त त्यास ऑपरेटर नसल्याने ते धूळ खात पडले आहे. म्हणजे वस्तू आहे परंतु त्यातील तज्ञ नाहीत. अगदी दात आहे तर चने नाही आणि चने असेल तर दात नाही अशी भयानक परिस्थिती येथे पहायला मिळत आहे. तरी देखील तालुक्याचे तहसिलदार, मंडल अधिकारी, विशेषत: आरोग्य अधिकारी नोडल ऑफिसर, पोलीस यंत्रणा, नगरपंचायत हे त्यांच्या परिने तालुक्याचा मोडका डाव सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत ही सर्वात मोठी जमेची बाजू आहे.

वास्तवत: तालुका पोरका झालेला असताना जे देशाला घडवितात त्यांनी पुन्हा तालुक्याला मुर्तरुप देण्याचे काम केले आहे. याचे श्रेय्य कोणाला नाही. तर, ते शिक्षकांचा सदसद बुद्धीला जाते. आपल्या पगाराला कात्री लावून त्यांनी सामाजिक उत्तरदायीत्व आपल्या खांद्यावर घेतले आहे. त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहे. मात्र, अकोले तालुक्यात प्राध्यापकांचा पगार त्यांच्या डिक्कीत मावत नाही. इतकी कमाई आहे. परंतु त्यांच्यातील कर्ण काही जागा होत नाही. खरंतर होईल तरी कसा? प्राध्यापक होण्यासाठी 40 ते 42 लाख रुपये अनेकांना मोजावे लागले आहे असे आरोप देखील झाले आहे. त्यामुळे, इकडे आड तिकडे विहीर, अजून त्यातूनच ते सावरलेले नाहीत, त्यामुळे, त्यांच्याकडून अपेक्षा काय असणार? आणि जुने ते केवळ बघ्याच्या भूमिकेत राहतात, त्यामुळे त्यांचा प्रश्न उरतो कोठे? या सगळ्यात शिक्षक बाकी तालुक्याचा पालक ठरले आहेत.

खरंतर शिक्षकांच्या मदतीला हात देत सिताराम पाटील गायकर यांनी 1 लाख रुपये दिले आहेत. तर त्याच्या पाठोपाठ मधुकर नवले यांनी देखील आपल्या दानशुरतेचे दर्शन घडविले आहे. माजी मंत्री वैभव पिचड यांनी दोन ते अडिच लाखांचा ड्युरा ऑक्सिजन ज्यात 30 जम्बो सिलेंडर बसतात ते देऊ केले आहेत. डॉ. किरण लहामटे यांनी 15 बेड दिले आहेत, तर काही मेडिसीन, माध्यमिकच्या शिक्षकांनी 5 ते 6 लाख आणि प्राथमिक शिक्षकांनी 10 ते 12 लाख असा निधी त्यांनी जमा केला असून जमा करण्याचा प्लो अद्याप सुरूच आहे. या व्यतिरिक्त एडीसीसी बँक अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यातून 1 लाख रुपये रोख कॉश, म्हाळदेवी ट्रस्टच्या वतीने 1 लाख राजेश पाडेकर यांनी 25 हजारांची मदत केली आहे. तर नितीन गोडसे यांनी आपल्या मनुष्यबाळासह मोठा आर्थिक हातभार लावला आहे. त्यांच्यामुळे, ऑक्सिजन लाईन, फिटींग, बेड  हे सोपस्कर गेले आहे. एकंदर या सगळ्यात एकच नमुद करावेसे वाटते की, जेव्हा कोणी या कोविड सेंटरचे श्रेय्य घेण्याचा प्रयत्न करेल, त्याने देखील पहिले आत्मचिंतन केले पाहिजे. दात्यांसह अन्य व्यक्तींचे यात जर काही योगदान असेल तर ते शारिरिक श्रमदान आहे. अन्यथा बाकी तेथे श्रेय्य लुटारुंची संख्या वाढत चालली आहे. 

आज अकोले तालुक्यात 115 मध्ये अकोले येथे 60 वर्षीय पुरुष, धामनगाव येथे 36, 21, 28 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय तरुणी, रेडे येथे 19 वर्षीय पुरुष, धुमळवाडीत 40 वर्षीय दोन महिला, रुंभोडी येथे 34 वर्षीय महिला, 41 वर्षीय पुरुष, गुरवझाप येथे 30, 46 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय तरुणी, निब्रळ येथे 15, 18 वर्षीय तरुण, 60, 42, 70 वर्षीय महिला, शेकेईवाडी येथे 45 वर्षीय महिला, बहिरवाडी येथे 78 वर्षीय पुरुष, 30, 16, 33 वर्षीय महिला, अगस्ति चित्रमंदीर अकोले येथे 60 वर्षीय महिला, सुगाव बु येथे 29 वर्षीय महिला, ढोकरी येथे 70, 44 वर्षीय पुरुष, धुमळवाडी येथे 52, 45, 57, 52, 69 वर्षीय पुरुष, आगार गल्ली अकोले येथे येथे 41 वर्षीय पुरुष, ढोकरी येथे 19 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 58, 47 वर्षीय महिला, उचखडक बु येथे 53 वर्षीय पुरुष. निर्गुडवाडी येथे 43 वर्षीय महिला, धामनगावात 9 वर्षीय बालिका, 30 वर्षीय महिला, माळीझाप येथे 15 वर्षीय तरुण, देवठाण येथे 55 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, शेतकी फार्म अकोले येथे 21 वर्षीय पुरुष, टाकळी येथे 55 वर्षीय महिला, कुभेफळ येथे 12 वर्षीय बालक, 36 व वर्षीय पुरुष, 35, 15, वर्षीय महिला.

 विठे येथे 65 वर्षीय पुरुष, मोग्रस येथे 38 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 23, 85 वर्षीय महिला, 90, 38 पुरुष, शिदवड येथे 48 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, वाघापूर येथे 46 वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे 45, 28 वर्षीय महिला, 25, 24, 50 वर्षीय पुरुष, जाचकवाडी येथे 66, 30 वर्षीय महिला, 43 वर्षीय पुरुष, चैतन्यपूर येथे 30 वर्षीय पुरुष, करंडी येथे 36, 32 वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे 56 वर्षीय महिला, रुंभोडी येथे 51 वर्षीय पुरुष, वाशेरे येथे 47 वर्षीय महिला, राजूर येथे 75 वर्षीय पुरुष, अकोले येथे 37 वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे 33 वर्षीय महिला, आंभोळ येथे 32 वर्षीय पुरुष, राजूर येथे 48 वर्षीय पुरुष, डोंगरगाव 65 वर्षीय महिला, गर्दनी येथे 45 वर्षीय पुरुष, अकोले येथे 55 वर्षीय पुरुष, कोंभाळे येथे 70 वर्षीय महिला, गणोरे येथे 74, 55, 45 वर्षीय महिला, 65, 18, वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 25 वर्षीय पुरुष, पांगोर्ली 55 वर्षीय महिला, अकोले येथे 42 वर्षीय पुरुष, निळवंडे येथे 42 वर्षीय पुरुष, सावरखुटे येथे 42 वर्षीय महिला तर 3 वर्षीय व सहा महिन्याची बालिका.

 नवलेवाडी येथे 55 वर्षीय पुरुष, कारखाना रोड येथे 4 वर्षीय बालक, धुमळवाडी येथे 35 वर्षीय महिला, पिपळदरी येथे 40 वर्षीय पुरुष, चंदगिरवाडी येथे 36 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 80 वर्षीय महिला, विरगाव येथे 51 वर्षीय पुरुष, डोंगरगाव येथे 30 वर्षीय पुरुष, कळस येथे 63 वर्षीय पुरुष, घटघर भंडारदरा येथे 28 वर्षीय महिला, जांभळेत 47 वर्षीय महिला, शेंडी येथे 71 वर्षीय पुरुष, कातळापूर येथे 39 वर्षीय महिला, 70 वर्षीय पुरुष, सावरखुटे येथे 65 वर्षीय पुरुष, राजूर येथे 65 वर्षीय पुरुष, निरगुडवाडी येथे 27 वर्षीय पुरुष, लव्हाळी येथे 52 वर्षीय महिला, म्हाळदेवी येथे 40 वर्षीय पुरुष, 20 वर्षींय महिला, विठा येथे 39 वर्षीय पुरुष अशा 115 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर पाच जणांना योग्य वेळी ऑक्सिजन न मिळाल्याने अगदी काही क्षणात मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.