888 जागांसाठी 2 हजार 678 उताविळ.! थोरात विरोध थोरत गट.! संगमनेरची राजकारण कसे असेल?


सार्वभौम (संगमनेर) :-

                     संगमनेर तालुक्यात 94 ग्रामपंचायतींचा धुरळा सुरू आहे. जो तो आपापली ताकद आजमविण्यासाठी धडपड करताना दिसतो आहे. आता 94 ग्रामपंचायतींमध्ये 328 प्रभाग (वॉड) आहेत तर त्यात 888 सदस्य निवडून द्यायचे आहेत. यावर विराजमान होण्यासाठी आता एकूण 2 हजार 678 इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दि. बुधवार दि. 23 डिसेंबर पासून अर्ज घेण्याची सुरूवात झाली होती. त्यानंतर पहिल्या दिवशी प्रत्येकाने आपापल्या ताकतीचा अंदाज घेत तटस्थ भूमीका घेतली. मात्र, दुसर्‍या दिवशी वरुंडी पठार व संगमनेर खुर्द येथून अर्ज भरण्याचा प्रारंभ झाला. तर त्यानंतर सोमवार दि. 28 डिसेंबर रोजी 76 तर 29 तारखेला 526 तर अंतीम दिवशी 2 हजार 72 व्यक्तींनी निवडणुकीत उडी मारली आहे. त्यामुळे, संगमनेर तालुक्यात अवघ्या 888 जागांसाठी इतके उमेदवार म्हटल्यानंतर निवडणुक घासून होणार यात शंकाच नाही. आता फक्त प्रतिक्षा माघारीची आहे. 

संगमनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषत: ग्रामपंचायतींच्या निवडणुका ह्या फार कुतूहलाच्या असतात. अन्यत्र ठिकाणी तालुक्यातील पुढार्‍यांचे किंवा आजी माजी आमदारांचे दोन गट असतात. या मिनी मंत्रालयावर वर्चस्व कोणाचे! यासाठी काट्याची टक्कर होते. मात्र, संगमनेरात जरा निराळीच गंम्मत पहायला मिळते. ती म्हणजे समर्थक आणि विरोधक या दोन्ही पार्ट्या ह्या थोरात गटाच्याच असतात. त्यांच्या-त्यांच्यातच जंगी राजकीय युद्ध होते. जो कोणी विजयी होईल तो फक्त साहेबांच्या नजरेत नेता म्हणून टिकून राहतो. मात्र, साहेबांचा हात कधी कोणाच्या डोक्यावर पडेल आणि त्याचे स्टार उजळतील, याचा काही नेम नाही. त्यामुळे, येथे काही विरोधक सुद्धा निव्वळ अस्तित्व ठिकविण्यासाठी साहेबांना विरोध दर्शवितात. अन्यथा कोणाचे उतारे कोठे अडकून आहेत. हे तालुक्याला नव्याने सांगण्याची गरज नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे संगमनेर तालुक्यात आता ना. थोरात यांची फार मोठी कसरत असणार आहे. कारण, तळेगाव पट्टा, आश्वी, जोर्वे आणि पठार भागावर त्यांच्या तालुक्यात राजकीय घुसखोरी वाढू शकते. कारण, पठार भागावर आता पिचड कुटुंब काही कार्यकर्त्यांना बळ देत आहे. त्यामुळे, तेथे उद्याचा विचार करता राजकारण तापण्याची शक्यता आहे. एकीकडे डॉ. किरण लहामटे हे स्वत:चे प्रस्त निर्माण करताना दिसत आहे. तर विधानसभा पुन्हा काबीज करण्यासाठी वैभव पिचड यांनी रंगीत तालिम सुरू केली आहे. हा सगळा धोका फक्त पठार भागावर असणार आहे. कारण, हे दोन्ही नेते राजकीय हेतू ठेऊन मतांची गोळाबेरीज करण्याचा प्रयत्न नक्की करताना दिसत आहेत. तर या पलिकडे विधानसभेला विखे पाटलांना आव्हान देणार्‍या 26 गावांचा विषय नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. त्यातील काही गावे आता विखे समर्थकांनी अजेंड्यावर घेतला आहे. त्यामुळे, ही निवडणुक पहाण्याजोगी असणार आहे. हे असे असले तरी शिवसेना आणि अन्य पक्षांना अगदी बोटावर मोजता येईल अशा ठिकाणी आपले वर्चस्व निर्माण करता येऊ शकते. काही पक्षांना तर पॅनल उभा करण्यासाठी मानसे नाहीत त्यामुळे येथील थोरातशहीला शह देण्यासाठी सक्षम असे उमेदवार आणि नेते देखील नसल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान दि. 23 डिसेंबर रोजी ग्रामपंचायतींचे अर्ज भरण्याची मुदत सुरू झाली होती. तर काल दि. 30 डिसेंबर रोजी संपली आहे. यात 2 हजार पेक्षा जास्त हौसे- नवसे-गवसे यांनी निवडणुकीच्या रिंगनात दंड थोपटले आहे. त्यात 94 ग्रामपंचायतीपैकी ओझर खु ग्रामपंचायतीत 26 जणांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. तर कनोलीत 34, रायतेवाडीत 37, हिवरगाव पवसा 32, सांगवी ग्रामपंचायतीत 25, कौठे धांदरफळ येथे 23 अर्ज, मिर्झापूर 17 अर्ज, डिग्रस 37 अर्ज, निमगास टेंभी येथे 11 अर्ज, कुरण 44 अर्ज, समनापूर 48 अर्ज, खारशिंदे 15, पिंपळगाव देपा 37 अर्ज, नांदर खंदरमाळ 19 अर्ज, वरुंडी पठार येथे 10 अर्ज, खंदरमाळवाडी येथे 29 अर्ज, जवळे बाळेश्वर येथे 20 अर्ज, महालवाडी ग्रामपंचायतीचे 15 अर्ज, कर्‍हे 24 अर्ज, सोनेवाडी येथे 20 अर्ज, पिंपळगाव माथा येथे 15 अर्ज, झोळे येथे 30 अर्ज, कौठे बु येथे 25 अर्ज, वनकुटे येथे 17 अर्ज, खांडगाव अर्ज 48, संगमनेर खु अर्ज 34, कुरकुंडीत अर्ज 18, चणेगाव येथून अर्ज 15, दाढ खु येथून अर्ज 24, माळेगाव पठार येथून अर्ज 28, आंबी खालसा येथून अर्ज 18, झरेकाठी येथून अर्ज 17, शेडगाव येथून अर्ज 37, भोजदरी येथून अर्ज 12, अकलापूर येथून अर्ज 29, प्रतापपूर येथून अर्ज 63, मनोली येथून अर्ज 40, शिरसगाव धुपे येथून 21 अर्ज, वडगाव लांडगा येथून 37 अर्ज, मालदाड येथून 58 अर्ज, रायते येथून 13 अर्ज, जाखुरी येथून 30 अर्ज, देवगाव येथून 26 अर्ज, शिरपूर येथून 14 अर्ज, वडगाव पान येथून 32 अर्ज, लोहारे येथून 18 अर्ज, कासारे येथून 39 अर्ज, देवकौठे येथून 22 अर्ज, पारेगाव बु येथून 34 अर्ज, चंदनापूरी येथून 42 अर्ज, सावरगाव तळ येथून 17 अर्ज, खळी 16 अर्ज, पिंप्री लोकी आजमपूर येथून 34 अर्ज, नांदुरी दुमाला येथून 37 अर्ज, पेमगिरी येथून 42 अर्ज, मंगळापूर येथून 41 अर्ज,

वेल्हाळे 35 अर्ज, मिरपूर 24 अर्ज, पळवखेडे 26 अर्ज, औरंगपूर 28 अर्ज, चिंचपूर बु 58 अर्ज, पिंपळे 35 अर्ज, पारेगाव खु 35 अर्ज, कोंची-मांची 17 अर्ज, कोकणगाव 35 अर्ज, खांबे 29 अर्ज, वरवंडी 26 अर्ज, कौठे खु 14 अर्ज, बोटा 47 अर्ज, हिवरगाव पठार 12 अर्ज, शेंडेवाडी 17 अर्ज, म्हसवंडी 13 अर्ज, आंबी दुमाला 29 अर्ज, चिखली 32 अर्ज, कसारा दुमाला 43 अर्ज, माळेगाव हवेली 13 अर्ज, तिगाव 19 अर्ज, सोनोशी 32 अर्ज, सावरगाव घुले 28 अर्ज, पोखरी बाळेश्वर 22 अर्ज, निमगाव खु 18 अर्ज, सावरचोळ 28 अर्ज, निमगाव बु 31 अर्ज, सुकेवाडी 31 अर्ज, कौठे कमळेश्वर 33 अर्ज, मेंढवण 20 अर्ज, खांजापूर 22 अर्ज, शिंदोडी 25 अर्ज, कौठे मलकापूर 20 अर्ज, जवळे कडलग 34 अर्ज, राजापूर 54 अर्ज, शिबलापूर 44 अर्ज,  तर पानोडी येथील 34 अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण 2 हजार 678 इछुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

संगमनेर तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीची ३२८ प्रभागांसाठी ८८८ सदस्यांची निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. तरी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर पर्यंत २ हजार ६७८ अर्ज आले आहे. यामध्ये  ९४ ग्रामपंचायत पैकी ८३ ग्रामपंचायतींवर थोरतांचे निर्विवाद वर्चस्व आहे. पण, विधानसभेला शिर्डी मतदारसंघातील १४ ग्रामपंचायती पैकी  ११ ग्रामपंचायत या विखे पाटील यांच्या ताब्यात आहे तर कनोली,ओझर "बु" व मनोली आशा तीन ग्रामपंचायत ना.थोरात यांच्या ही वर्चस्वाखाली आहेत. जरी ११ ग्रामपंचायत विखे पाटील यांच्या ताब्यात असल्या तरी तेथील ग्रामपंचायत सदस्य संख्या थोरात यांची विखे यांच्या तुल्यबळ इतकीच आहे. पण, सरपंचपद हे विखे पाटील यांच्याकडे अधिक आहे. परंतु, या १४ ग्रामपंचायतिच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. कारण तेथे थोरात-विखे गटातील एकास-एक सदस्य आमने-सामने लढणार आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

          संगमनेर तालुक्यातील २६ गावे ही शिर्डी विधानसभेला जोडली गेली. तेथे काही दिवसांनपुर्वी जिल्हापरिषद व पंचायतसमितीची निवडणूक झाली. तेव्हा थोरात व विखे दोघेही काँग्रेस मध्ये होते. त्यामुळे उमेदवारांना हाताचा पंजा चिन्हे आणण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. मात्र, पंजाचे चिन्ह विखे गटाला मिळाले पण थोरात गटाने अपक्ष निवडणूक लढत विखे गटाला पराभुत केले. तेव्हा मात्र शिवसेना आणि भाजपने जोर्वे व आश्वि गटामध्ये बघायची भुमिका घेतली होती. आता मात्र विखे भाजप मध्ये आहे. त्यामुळे येथे  विखे व थोरात अशीच लढत होणार आहे. या १४ ग्रामपंचायत वगळता तालुक्यातील ८० ग्रामपंचायत मध्ये शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचे तालुक्यात संपूर्ण पॅनल देखील झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे येथे थोरात विरोधकांचा विरोध हा बुळगा विरोध असल्याचे पाहायला मिळत आहे. गावो-गावी थोरतांचे दोन पॅनल आहे. त्यामध्येच जुगलबंदी पाहायला मिळत आहे.  त्यामुळे या ८० गावात थोरतांचेच वर्चस्व राहील असे राजकीय अभ्यासकांना वाटत आहे.

  , दरम्यान तालुक्यातील ९४ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने २१ तारखीला बैठक घेऊन कोअर कमिटी स्थापन केली. पण ते फक्त नाममात्र असल्याचे पाहायला मिळत आहे. एकदा बैठक झाली सोशल मीडियावर फोटो फिरवले आणि नंतर काय?तर शिवसैनिकांना साधा फॉम् भरण्यासाठी देखील सुविधा नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्याना तारेवरचीच कसरत करावी लागली. त्यामुळे ग्रामीण भागातील शिवसेने कडुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. खरंतर गेली ६ वर्षांपासून खा. लोखंडे हे शिवसेने कडुन लोकप्रतिनिधीत्व करतात. पण एक कार्यलय देखील फॉम् भरण्यासाठी त्यांना उभे करता आले नाही. एवढेच काय ज्या शिवसैनिकांनी रक्ताचं पाणी करून संगमनेर तालुक्यातुन लोकसभेला खा. लोखंडेंना  ७ हजार ६२५ मतांचे लीड दिले. त्यांच्या साठी एक बैठक वगळता लोखंडे यांनी संगमनेरकडे पुन्हा पाहिले देखील नाही. गेली सहावर्षांपासून त्यांना थोरतांन विरुध्द कार्यकर्त्यांची महूर्तमेढ रोवता आली नाही. त्यामुळे आज गावा-गावात साधा पॅनल देखील उभा करता आला नाही.

- सुशांत पावसे