ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे गार्‍हाणे थेट खा.सुप्रिया सुळेंच्या दरबारी! डॉ. लहामटेंना बळ देणार.!

  

सार्वभौम (अकोले) :- 

                     अकोले तालुक्यात डॉ. किरण लहामटे हे परिवर्तनाचे मानकरी ठरले आहेत. त्याच्यामुळे 40 वर्षानंतर प्रस्तापितांच्या गडला सुरूंग लागला आहे. मात्र, दुर्दैवाने राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांनाच हे यश अनेकांना देखवत नाही. डॉक्टरांच्या तोंडावर गोडगोड बोलायचे आणि मागेपुढे फिरुन मी नाही त्यातला अशा अविर्भावात मिरवायचे अशी दुटप्पी भुमीका पार पाडत काहींनी डॉक्टांची प्रतिमा मलिन करण्याचा जणुकाय ठेकाच घेतला आहे असे वागताना दिसत आहेत. इतकेच काय! विधानसभेत आणि पवार कुटुंबाकडे साहेबांचे उनेधुणे करुन त्यांची किम्मत कशी कमी होईल असा उपद्रव सुरू आहे. म्हणून, हा प्रकार मोडीत काढून अकोले तालुक्याच्या विकासासाठी विद्यार्थी परिषदेचे एक शिष्ठमंडळ थेट मुंबईत जाऊन खा. सुप्रियाताई सुळे यांना भेटले. त्यांनी अकोले तालुक्यातील अनेक गोष्टींचा उलगडा करीत डॉक्टरांच्या प्रांजळ स्वभावाचे प्रतिनिधीत्व केले. त्यानंतर खा. सुळे यांनी या शिष्ठमंडळाशी दिलखुलास संवाद साधत मी योग्य वेळी योग्य निर्णय घेईल. मात्र, तालुक्याच्या विकासासाठी व पक्ष बंधणीसाठी  तुम्ही प्रयत्न करा असे आवाहन ताईंनी केले आहे. त्यांच्या या भेटीनंतर तालुक्यात येणार्‍या काळात काही बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर डॉ. किरण लहामटे यांना पक्ष बळ देणार असून येणार्‍या काळात डॉक्टरांच्या भोवती सरकारी गोतावळा देखील दिसण्याची शक्यता आहे. इंतजार आहे तो फक्त मंत्रीमंडळ विस्ताराचा..!

विधानसभेच्या अभुतपुर्व यशानंतर डॉ. किरण लहामटे यांची महाराष्ट्राला नव्याने ओळख झाली. एक वर्षानंतर अक्षरश: या मानसाने पायाला भिंगरी बांधून तालुक्याच्या घराघात जाऊन सामान्य मानसाला गळ्याला लावले. हे करीत असताना त्यांनी विरोधकांना घाम फोडला खरा. मात्र, दुर्दैवाने त्याच्या सोबत राहणार्‍या व्यक्तींनीच त्यांना बदनाम करण्याचा घाट घातला होता. म्हणजे 1720 ते 1740 या दशकात जसे बाजीराव पेशव्याने सगळ्या देशावर अधिराज्य गाजविले होते. मात्र, दुर्दैवाने या महान योद्ध्यास त्याच्या काही साथिदारांनी साथ दिली नाही. परिनामी त्याला अपयशाला सामोरे जावे लागले होते. तसेच काही डॉक्टरांच्या बाबतीत दिसून येऊ लागले आहे. कारण, त्यांनी इतके मोठे अशक्य युद्ध जिंकले. मात्र, आता त्यांना त्यांच्यातीलच काही लोक बदनाम करु पाहत आहे. त्यामुळे, हे त्यांच्या कार्यकर्त्यांना पहावेनासे झाले आणि त्यांनी थेट मुंबई गाठली.

आता, हा सर्व उहापोह ते शरद पवार साहेबांनाच सांगू शकले असते. मात्र, त्यांनी बरोबर मर्मावर घाव घातला. कारण, अकोले तालुक्याच्या राजकारणात ना पवार साहेब ना दादा, ना पाटील ना मुश्रीफ हे कोणीच फारसे लक्ष घालत नाही. मात्र, सुप्रिया सुळे यांची अकोल्यातून थेट हॉटलाईन चालते. म्हणून तर हे शिष्ठमंडळ थेट ताईंच्या दरबारात जाऊन दाखल झाले. आता येथे काय चर्चा झाली, आणि या तरूणांनी काय खेद व्यक्त केला आणि तो कोणाबाबात यावर सविस्तर लेख लिहावा लागेल. मात्र, तालुक्यात जे काही राजकारण सुरू आहे. ते पक्षासाठी घातक असून पक्ष वाढीला आळा बसणारे आहे. त्यामुळे, काही निवडक लोकांची नावे घेत या विद्यार्थ्यांनी थेट तालुक्यातील काही व्यक्तींवर हल्लाबोल केला. अर्थात ही विद्यार्थी चुक की बरोबर हे तालुक्यातील काही जाणकारांना माहित आहे. मात्र, तालुक्यातील खदखद आता थेट बारामतीच्या कोर्टात जाऊन पोहचली आहे. यात एक विशेष म्हणावे लागेल. की, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीतील एक नाराज गट पवार साहेब अथवा जयंत पाटील यांना भेटण्यासाठी जाणार होता. मात्र, पत्रव्यवाहर होऊन देखील त्यांना मुहुर्त निघाला नाही. किंवा त्यांची हिंमत झाली नाही असे समजा. पण, ही खदखद बेधडक विद्यार्थ्यांच्या तोंडातून बाहेर पडली.

संसदपट्टू सुप्रियाताई यांनी अकोल्यातून ज्या काही गाड्या भरुन गेल्या होत्या, त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या. प्रत्येकाच्या मनात काय भडास आहे ती ऐकूण घेतली. त्यावर उत्तर देताना ताईंना अगदी समर्पक भाषेत उत्तरे दिली. ज्या पद्धतीने लोक डॉ. किरण लहामटे यांना बदनाम करण्याचे काम करतात हे उध्वस्त करण्याचे काम या विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यामुळे, येणार्‍या काळात डॉक्टरांना पवार साहेब योग्यते बळ देतील आणि बोलणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या जातील असाच काहीसा संदेश ताईंकडून मिळाला आहे. डॉक्टर हे देव माणूस असून जर कोणी त्यांच्याबाबत कान भरवत असेल तर कोणाचे काही एक न एकता डॉक्टरांच्या पाठीशी आपण आजवर जसे ठाम उभे राहिलात तसे येणार्‍या काळात देखील उभे राहावे अशी विनंती प्रभात चौधरी यांनी केली. यावेळी संकेत लांडे, दत्ता लांडगे, अमोल बाराते, राहुल चव्हाण, नकुल ढगे, तनुजा घोलप, सानिका थोरात यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी आपली कौफियत मांडली.