आ. डॉ. लहामटेंच्या पीएची भयंकर मोठी चूक.! कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे हे तर तपासा...
सार्वभौम (अकोले) :-
दलाली आणि भ्रष्टाचार ही आपल्या देशाला लागलेली एक वाळवी आहे. त्यामुळे, हा विकासाच्या मार्गावर असणारा देश कधी विकसित होईल अशी कोणी अपेक्षा देखील ठेऊ नये. खरंतर लोकशाहीचे चारही स्तभ कोलमडल्याने कोणाच्या बुडाखाली किती अंधार आहे. हे सांगण्याचे आणि सज्जनतेचा आविर्भाव आणण्याचा कोणी आव आणित असेल तर त्यांचे बुरखे फाडलेच पाहिजे. हे सर्व मांडण्याचे कारण म्हणजे, गेल्या चारदोन दिवसांपासून लोकाभिमूख डॉक्टर किरण लहामटे यांचे स्वीय सहायक (पीए) यांच्यावर चिखलफेक होत आहे. खरंतर ते चुक असतील किंवा त्यांनी खंडणी, धमक्या, वसुल्या, दमदाट्या सुरू केल्या असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. मात्र, त्यांना धमकाविणे, त्यांना नकळत ब्लॅकमेल करणे, त्यांना फोन करुन वारंवार टॉर्चर करणे, हे कुठला शहानपणा म्हणावा? हेच कळेनासे झाले आहे. शेजारील तालुक्यातून आला म्हणून कोणाचे पोट दुखू लागले तर कोणाचे टेंडर काढून देत नाही म्हणून रोष धरुन कोणी सुपार्या देत आहे. कधी पोलीस अधिकार्यांच्या बदल्या करु नये म्हणून कोणी टारगेट करते आहे तर कोणी दिवाळीला खर्ची दिली नाही म्हणून टारगेट करते आहे. जनतेच्या समोर जे अविर्भावाने मांडले जाते ते प्रत्येकवेळी सत्य असतेच असे नाही. मात्र, त्या मागे दुसरी बाजू देखील असते. हे नाकारुन चालणार नाही. असेच काहीसे या पीए बाबत झाल्याचे दिसते आहे. त्यामुळे, डॉ. किरण लहामटे साहेबांना अनेक चाहत्यांची विनंती आहे. की, एकीव गोष्टी आणि सुपार्या घेऊन केलेल्या बदनामीला तुम्ही बळी पडू नका. चौकशी करा आणि पीए दोषी असेल तर थेट कठोर कारवाई करा. मात्र, एखाद्या उमेदीत आलेल्या तरुणावर अन्याय करू नका. अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
खरंतर एक फार जुनी म्हण आहे. जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. आता डॉ. किरण लहामटे यांना लोकांनी डोक्यावर घेतले आणि नकळत त्यांना मोठेपणाचा बहुमान मान मिळाला. आता त्यांना बदनाम करण्यासाठी कोण काय-काय षडयंत्र रचते आहे. हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. मात्र, ते तापड असल्यामुळे भल्याभल्यांना पुरून उरतात. त्यामुळे, आता त्यांचा राजकीय नाद सध्यातरी कोणी करत नाही. मात्र, त्यांच्यानंतर त्यांच्या पीएला तालुक्यातून हकलावून लावून तालुक्यातील आमदार एकटे कसे पडतील आणि तालुक्यात कामे होणार कशी नाहीत. हे साध्य करण्यासाठी जणूकाय एका विशिष्ट यंत्रणेने ठेकाच घेतला आहे की काय! हेच समजायला तयार नाही. त्यामुळे, उगच काहीतरी कुरापती काढायच्या आणि हळुच एखादे पिल्लू सोडून आमदारांची यंत्रणा कोलॉप्स कारायची असे काहीसे घडताना दिसत आहे.
खरंतर डॉक्टरांच्या पीएवर आरोप प्रत्यारोप झाले. गेल्या कित्तेक दिवसांनंतरच का हे आरोप पुढे आले देव जाणे. दिवाळीत कदाचित माध्यमांना त्यांनी खुश केले असते तर इतका त्रास झाला नसता, कदाचित पोलीस ठाण्यांतून काहींना जे काही मलिदे मिळतात ते बंद होतील की काय म्हणून डॉक्टर जे काही पीआयची बदली मागत आहे. तो देखील रोष मनाशी बाळगून त्याचा कड पीएवर काढत असल्याचे बोलले जात आहे. तर डॉक्टरांचे काही असे समर्थक आहेत ज्यांना ठेकेदारी करायची आहे. मात्र, त्यांना ती मिळत नाही, त्यामुळे याच पक्षातील काही अतृप्त आत्मे माध्यमांना पुढे करुन त्यांची पोळी भाजू पाहत आहे. त्यामुळे, घरचा भेदी आणि लंका दहन अशी परिस्थिती राष्ट्रवादीत दिसू लागली आहे. हे जर असेच सुरू राहिले तर मात्र, याा तालुक्याला फार मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. याकडे डॉक्टरांनी काना डोळा करुन अकोल्याचा विकास करण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे.
आत, अनेकांना वाटते की, पीए संगमनेरचे आहेत. मात्र, तुम्हाला सांगू इच्छितो की, अकोले तालुक्यातून डॉक्टरांनी जे काही पीए नेमले होते. त्यापैकी सध्या कोण राहिले आहे? कारण, आपला स्वाभिमान तेव्हाच जागा होतो. संगमनेरच्या पीएने तरी डॉक्टरांच्या स्वभावाशी मिळते जुळते घेत एक नोकरी म्हणून त्यांची भूमिका आजवर चोख बजावली आहे. मात्र, दुर्दैवाने त्यांचे काम अनेकांच्या डोळ्यात सलताना दिसत आहे. पीएने गाडी घेतली असे अनेकांचे मत आहे. मात्र, एखादा व्यक्ती काम करीत असेल तर त्याच्या आयुष्याची गोळाबेरीज म्हणजे फक्त मरेपर्यंत कष्टच असते का? कोणी दलाली करून गाड्या घेतल्या तर कोणी ब्लॅकमेल करून बंगले बांधले. अकोले तालुक्यात असे कित्तेक ठेकेदार आहेत त्यांची कुकर्मे उकरली तर त्यांना पळता भूई थोडी होईल. त्यामुळे, दुसर्याच्या बुडाखाली वाकुन पाहताना आपल्या बुडाखाली किती अंधार आहे. हे देखील आरोप करणार्याने पाहिले पाहिजे. मात्र, रोखठोक सार्वभौम एक गोष्ट स्पष्ट करते की, जर या पीएच्या विरोधात कोणाकडे अपसंपदा, हाप्तेखोरी, ब्लॅकमेलिंग, टक्केवारी याबाबत पुरावे असतील तर त्याने कायदेशीर कारवाई करावी. उगच माध्यमांच्या आडून वार करु नये. कारण, यात पुर्णत: पत्रकारीता इतकी बदनाम झाली आहे की, आमच्यात पत्रकार शिल्लक राहिलेत की नाही? कि केवळ प्रस्तापितांनी ब्लिकमिलरच पोसले आहेत! असा प्रश्न पडतो आहे. त्यामुळे, ज्याच्याकडे पुरावे असेल त्याने पत्रकारांच्या कुबड्या हाती न घेता थेट पोलीस ठाण्याची दारे ठोठावली पाहिजे.
हा निव्वळ बदनामीचा प्रकार.!
विरोधक माझ्या स्वीय सहायकाच्या नावे जी बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत तो योग्य नाही. हे एक षडयंत्र असून मी त्याच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मी कोणत्याही ठेकेदारास ओळखत नाही, ना कोणाकडून काही मागणी केली. त्यामुळे, ही बदनामी थांबविली नाही तरी यांना योग्यवेळी उत्तरे दिली जातील. मी स्वत: चूक करत नाही आणि कोणाची चूक खपून घेत नाही. त्यामुळे, मला खात्री आहे. पीएकडून कोणतीही चुकीची गोष्ट होणार नाही. विरोधकांकडे लक्ष देणे हे मुर्खपणाचे ठरेल.
- डॉक्टर किरण लहामटे
कायदेशीर न्याय मागेल.!
मी कोणत्याही प्रकारची चूक केलेली नाही. केली असेल तर त्यांनी पुरावे द्यावेत. बाहेरचा व्यक्ती म्हणून माझी पदोपदी अवहेलना केली आहे. एक आवडीचे काम म्हणून मी माझ्या कर्तव्याशी एकनिष्ठ आहे. बाकी वाटले तर येणार्या काळात मी कायदेशीर मार्गाने देखील न्याय मागू शकतो. साहेबांनी माझ्यावर नेहमी विश्वास दाखविला आहे. त्यांच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही.
- स्वीय सहायक,