महाविकास आघाडीची खिंड लढविणारे काँग्रेसचे बाजीप्रभू-ना.बाळासाहेब थोरात
महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांची मोठी समृद्ध परंपरा आहे. स्वातंत्र्यानंतर 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण यांनी कृषी व औद्योगिक क्रांतीचा पाया घालून आधुनिक महाराष्ट्र निर्माण केला. त्यांनी साहित्य, कला ,क्रीडा अशा सर्व क्षेत्रात भरीव योगदान दिले. हाच सुसंस्कृत वारसा जपत संगमनेरचे नेतृत्व नामदार बाळासाहेब थोरात यांनी 1985 पासून राजकारणात आपली वाटचाल सुरू केली. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूल, कृषी, शालेय शिक्षण, जलसंधारण, रोहयो असे महत्वाची विविध पदे त्यांनी भूषवली. या सर्व काळात उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेले निळवंडे धरण पुर्ण केले. मोठ मोठ्या बोगद्यांसह कालव्यांची कामे सुरु केली. संगमनेरचा सहकार सक्षमपणे सांभाळतांना रायपातळीवर संगमनेरचे नाव अग्रभागी नेले. या सर्व कामांची दखल घेत श्रीमती सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या अतिमहत्वाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर कायमस्वरुपी सदस्य म्हणून निवड केली. याचबरोबर गुजरात व हिमाचल प्रदेशामध्ये महत्वाची जबाबदारी ना.थोरातांनी सांभाळली.
2019 हे वर्षे महाराष्ट्र व देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे होतेे. एप्रिल महिन्यामध्ये लोकसभेची निवडणूक झाली आणि काँग्रेस पक्षाचा मोठा दारुण पराभव झाला. यात अवघा एकच उमेदवार निवडून आल्याने या पक्षातून अनेकांनी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला. अशा अवघड परिस्थितीमध्ये काँग्रेसचे केंद्रीय नेतृत्व श्रीमती सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी स्वच्छ व निष्ठावान नेते असलेले ना.बाळासाहेब थोरात यांची 14 जुलै 2019 रोजी प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. अशा अडचणीच्या काळात प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे ही तारेवरची कसरत होती मात्र, स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात यांचे चिरंजीव असलेले ना. बाळासाहेब थोरात मागे हटले नाही. संकटाच्या वेळी लढायची असते, पळायचे नसते हे ब्रिद वाक्य घेवून त्यांनी सर्वांमध्ये चैतन्य निर्माण केले.
अशातच महाराष्ट्रावर मोदी, शहा यांच्या रूपाने दिल्लीवरून राजकीय तोफा धडकू लागल्या होत्या. यात 80 वर्षाचे तरूण योद्धे शरदचंद्रजी पवार मैदानात उतरले त्यांच्या दिमतीला काँग्रेसचे बाजीप्रभु नामदार बाळासाहेब थोरात यांनी देखील पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन दंड थोपटले. महाराष्ट्रात सर्वत्र झंझावाती प्रचार करत अडचणीच्या काळात काँग्रेसच्या उमेदवारांना ताकद दिली. त्यानंतर पराभवाच्या मानसिकतेतून पक्ष बाहेर काढत पूर्वीपेक्षा अधिक जागा मिळून दिल्या. या विजयाबरोबरच 24 ऑक्टोबर 2019 रोजी सलग 8 वेळेस विक्रमी मताधिक्याने विजयी होण्याचा मान नामदार बाळासाहेब थोरात यांनी मिळविला.
सध्याच्या विधानसभेत सर्वाधिक काळ सलग 8 वेळा प्रतिनिधीत्व करणारे ते एकमेव नेते ठरले. निकालानंतर राज्यामध्ये अस्थिरता निर्माण झाली. शिवसेनेने प्रस्ताव दिला तर पाठिंबा देण्याचा विचार करू असे नामदार थोरात यांनी प्रथम सांगितले आणि राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या. एक महिनाभर झालेला राजकीय क्लायमॅक्स सुरू होता. त्यानंतर श्रीमती सोनिया गांधी, शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
या सरकार स्थापनेमध्ये संगमनेरचे नेतृत्व नामदार बाळासाहेब थोरात यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. प्रसिद्धीपासून चार हात दूर राहत त्यांनी अतिशय चाणाक्षपणे व्यूहरचना केली आणि तीन पक्षांचे सरकार महाराष्ट्रात आले. यामध्ये ते 26 नोव्हेंबर 2019 रोजी नामदार बाळासाहेब थोरात यांची काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड झाली तर 28 नोव्हेंबर 2019 ला शिवतीर्थावर महाविकास आघाडीच्या ऐतिहासिक भव्य शपथविधीत नामदार उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेण्याचा मान काँग्रेसकडून नामदार थोरात यांना मिळाला. पुन्हा एकदा महाराष्ट्राला अपेक्षित होतं महसूल विभागाची जबाबदारी नामदार बाळासाहेब थोरात यांना मिळणार आणि त्याप्रमाणे 12 डिसेंबर 2019 रोजी नामदार उद्धव ठाकरे यांनी नामदार बाळासाहेब थोरात यांच्यावर संपूर्ण विश्वास टाकत महसूल, ऊर्जा, शालेय शिक्षण, अपारंपारिक ऊर्जा, वैद्यकीय शिक्षण अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपविली. अडचणीच्या काळामध्ये पक्षाला भरारी देणारे हे नेतृत्व म्हणजे काँग्रेसचे खरे खुरे बाजीप्रभु ठरले आहेत.
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच शेतकर्यांना दोन लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात आली. कोणत्याही अटी शिवाय दिलेली कर्जमाफी ही शेतकर्यांसाठी मोठी दिलासादायक ठरली. गोरगरिब शेतकरी, कामगार सर्वसामान्यांसाठी चांगले निर्णय घेणारे हे सरकार खर्या अर्थाने रायातील जनतेचे सरकार झाले.
मात्र फेब्रुवारी 2020 पासून जगासह देशावर कोरोनाचे संकट आले. मार्चपासून कोरोना रोखण्यासाठी राज्यासह सर्वत्र लॉकडाऊन झाला आणि फाळणी नंतरचे सर्वात मोठे स्थलांतर देशाने पाहिले. या संकट काळात नामदार थोरातांनी पुन्हा एकदा महत्वपूर्ण जबाबदारी उचलली. या काळात ना. थोरातांचे घर हे वॉररुम बनले. मजूर, गोरगरिब, आश्रितांसाठी हे मदत केंद्र बनले. 24 तास राज्यभर सेवा देण्यासाठी काँग्रेसची फौज तयार झाली. सरकार पातळीवर शासन खूप मोठे काम करत होते. महसूल विभाग शासनाचा कणा असून या विभागाचे धुरा नामदार थोरात समर्थपणे सांभाळत होते. त्या काळात ना.थोरातांनी दररोज जिल्हानिहाय आढावा घेत कोरोना रोखण्यासाठी सकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत सातत्याने काम केले तर जिल्ह्या - जिल्ह्यात अन्नछत्र उघडले, औषधोपचार दिले. श्रीमती सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली परप्रांतीयांचा रेल्वेच्या प्रवासाचा खर्च केला. कोरोना पाठोपाठ निसर्ग चक्रीवादळाचे मोठे संकट आले. त्या पाठोपाठ अतिवृष्टी असे शेतकर्यांवर संकट कोसळले. नामदार थोरात यांनी मुख्यमंत्री नामदार उध्दव ठाकरे यांचे समवेत विविध भागांचे दौरे करत शेतकर्यांना मोठी मदत मिळवून दिली.
संकटाबरोबर लढतांना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानले. विकास कामांचा धडाका सुरु ठेवला. अशा अडचणीत कठीण प्रसंगात ना.थोरात यांची कार्यपध्दती, संयम, दुरदृष्टी, मदत कार्य हे सगळ्या रज्याने पाहिले. जनसामान्यांसाठी लढणारा हा राजकारणातील राजहंस कठीण प्रसंगी गोरगरिबांसाठी बाजीप्रभू होवून मदतीसाठी धावले.
वर्षपुर्तीत महत्वाचे निर्णय
1. दोन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफी
2.
कोरोना संकटाचा मुकाबला करतांना प्रशासनाचा कणा असलेल्या महसूल विभागाचे नेतृत्व
3. काँग्रेसकडून गावोगावी अन्नछत्र, मदतकार्य, औषधांचे वाटप
4. परप्रांतीय मजूरांसाठी रेल्वे प्रवासाची सुविधा
5. सातत्याने कोरोना रोखण्यासाठी आढावा व सूचना
6. निसर्ग चक्रीवादळामधील कोकणातील व राज्यातील शेतकर्यांना मदत
7. अतिवृष्टीतील रायातील शेतकर्यांना मदत
महसूल विभाग
1.
तलाठ्याच्या डिजिटल स्वाक्षरीने सुमारे 29 लाख खातेदारांनी घेतला सातबारा तर सुमारे 3 लाख खातेदारांनी डाऊनलोड केले 8 अ खाते उतारे
2.
आठ दशकानंतर सातबारा मध्ये होणार 12 प्रकारचे बदल.वॉटर पार्क,युनिक कोड आदी बदलांमुळे बनावट सातबारा करण्याच्या गैरप्रकाराला आळा.
3.
महसूल चोरीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारशी संबंधित आर्थिक व्यवहारांसाठी यापुढे पॅन क्रमांक अनिवार्य
4.
आजी माजी सैनिकांना शासकीय जमीन प्रदान करण्यासंदर्भात उत्पन्नाची वार्षिक मर्यादा 1 लाख रुपयांवरुन 8 लाख करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती
5. खंडकरी शेतकर्यांचे प्रश्न मार्गी
6.
अहमदनगर जिल्ह्यातील निळवंडे धरणासाठी 1100 कोटींची तरतूद व कालव्यांच्या कामे वेगाने सुरु
- नामदेव कहांडळ (लेखक)