आरे देवा.! अकोल्याच्या CAची संगमनेरात फसवणूक! तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल!

 सार्वभौम (संगमनेर) :- 

                        संगमनेरात बस स्टॅण्ट परिसरातील एका सीएची बनावट शिक्के तयार करुन व सह्या ठोकून फसवणूक करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार मंगळवार दि. 15 सप्टेंबर 2020 पुर्वी घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथील तरुण व चिखली येथे राहणार्‍या अनोळखी तरुणीनेे फसवणूक केल्याप्रकरणी विकास सुधाकर वैद्य (वय 29, रा. सुगाव खु, ता. अकोले) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश दयानंद भोसलेे (रा. पिंपरणे, ता. संगमनेर) व सुवर्णा अशोक वर्पे (रा. चिखली. ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, विकास वैद्य हे सीए असून संगमनेर बस स्थानक परिसरात त्यांचे कार्यालय आहे. तर आरोपी गणेश व सुवर्णा यांचे विद्यानगर येथे जुनी एसबीआय जवळ जीएसटी सुविधा सेंटर असे ऑफिस आहे. या कार्यालयात बसून गणेश दयानंद भोसलेे व सुवर्णा अशोक वर्पे यांनी मोठा घोटाळा करुन ठेवला. वैद्य हे त्यांना ओळखत नसताना देखील आरोपींनी काही अक्षेपहार्य कागदपत्रे तयार केली होती. तर त्यावर वैद्य यांच्या नावाचे बनावट शिक्के मारुन बनावट सही करत मोठी अफरातफर केली. तसेच या शिक्क्यांचा गैरवापर वापर करुन या अनोळखी व्यक्तींनी वैद्य यांच्या नावाचा देखील गैरवापर केला आहे. त्याच बरोबर स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी बनावट प्रोजेक्ट तयार करुन लोकांची फसवणूक केली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात गणेश दयानंद भोसलेे (रा. पिंपरणे, ता. संगमनेर) व सुवर्णा अशोक वर्पे (रा. चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्हाची सखोल माहिती पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी घेतली आहे. त्यांनी सखोल तपास करण्यासाठी हा गुन्हा पोलीस उपनिरीक्षक रोहिदास माळी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

तर संगमनेर तालुक्यातील एक विदारक सत्य असे की, येथे सरकारी अधिकार्‍यांना हाताशी धरुन अनेक अवैध कामे वैध करुन घेतले जातात. वर्ग 2 च्या जमिनी तसेच वतन व बक्षिसपात्र, हाडकी हाडवळे आणि बरेच काही प्लॉटींग गहाळ केले जातात तर काही जमिनी मुळ मालकाला देखील माहित होत नाही. त्या अचानक कोणाच्यातरी नावे होतात. संगमनेरात अशी फार मोठी यंत्रणा काम करते आहे. जिल्ह्यात कोेठे नव्हे इतकी भयंकर व्यवस्था महसुलमंत्र्यांच्या तालुक्यात चालते हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. मात्र, करणार तरी काय? राजा बोले दल हाले त्यामुळे झाकली मुठ सव्वा लाखाची असे करीत सरकारी अधिकारी देखील येथे सोकावून गेले आहेत. त्यामुळे येथे काही लोक कष्टाने नव्हे तर अशा प्रकारची प्रोफेशनल लुटमारी करीत लखपती व कोट्यावधीश झाले आहेत असे बोलले जात आहे.