अकोल्यात कोरोनाची हजारी, 155 अजारी तर बाकी गेले घरी.! 23 रुग्ण दोन जणांचा बळी.!
तर अकोले तालुक्यात 23 रुग्णांची भर पडली आहे. त्यात गणोरे येथे 52 व 30 वर्षींय महिला तर अवघ्या 4 महिन्यांचा मुलगा, 33 वर्षीय पुरुष, तर 5 वर्षीय बालक, 28 तरुणी, विरगाव येथे 37 वर्षीय पुरुष, 10 वर्षीय मुलगा, 3 वर्षीय बालिका, नवलेवाडी 57 वर्षीय पुरुष, रेडे येथे 25 वर्षीय तरुण, कोतुळ येथे 46 वर्षीय महिला, आंभोळ येथे 35 वर्षीय पुरुष, शाहुनगर येथे 52 वर्षीय पुरुष, राजूर येथे 49 व 58 वर्षीय पुरुष, सावरगाव पाट 21 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगी, विरगाव येथे 36 वर्षीय महिला, राजूर येथे 55 वर्षीय पुरुष, औरंगपूर 44 वर्षीय पुरुष, राजूर 47 वर्षीय पुरुष अशा 23 जणांची भर पडली आहे. तर गर्दणी येथे 75 वर्षीय वृद्ध व इंदोरी येथील 68 वर्षीय पुरुष अशा दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात मृत्युंची संख्या 20 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान दोन मयत बाबत नोडल अधिकारी डॉ. शामकांत शेटे यांनी दुजोरा दिला आहे.
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार आज तब्बल ५७३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९ हजार ०८५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४३३३ इतकी झाली आहे. बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६७, राहाता ०४, पाथर्डी ०२, नगर ग्रामीण ०४ श्रीरामपूर १५, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा १९, श्रीगोंदा ०१, पारनेर ०३, अकोले ०१, राहुरी ०९, कोपरगाव ०४,जामखेड ०२, मिलिटरी हॉस्पिटल ११ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ५७३ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा १६९, संगमनेर ५०, राहाता १९, पाथर्डी १९, नगर ग्रा २५, श्रीरामपूर २६, कॅन्टोन्मेंट ०५, नेवासा ५१, श्रीगोंदा ४२, पारनेर २८, अकोले १६, राहुरी २३, शेवगाव ४५, कोपरगाव २७, जामखेड ११, कर्जत १६, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या आता २९ कजार ०८५ तर उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ४ हजार ३३३ झाली आसून ५३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आजवर एकूण रूग्ण संख्या ३३ हजार ९५७ इतकी झालेली आहे.