पिचड साहेबांच्या बंगल्यासमोर पोलीस पाटलाचा अपघात कि खून! हे व्हिडिओ पहा आणि मग तुम्हीच सांगा.!

 

संग्रहीत फोटो

सार्वभौम (राजूर) :-

                       अकोले तालुक्यातील राजूर येथे माजी मंत्री मधुकर पिचड साहेब यांच्या बंगल्यासमोर एक संशयास्पद अपघात झाला आहे. तो अपघात आपण पाहिल्यानंतर तो खरोखर अपघात आहे की, खून! असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहणार नाही. त्यात एका बेशीस्त वाहन चालकामुळे एका निरापराध पोलीस पाटलाचा जीव गेला आहे. त्यामुळे, या गुन्ह्यात केवळ अकस्मात मृत्यू किंवा सहळगहळ गुन्हे दाखल न करता या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे. तसेच कलम 302 किंवा 304 अशा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. अशा प्रकारची मागणी आता पुढे येऊ लागली आहे. सोमवारी झालेल्या गुन्ह्याचा व्हिडिओ रोखठोक सार्वभौमला अनेकांनी टाकला आहे. याबाबत अनेकांना शंका असून किमान यात माणूस मेल्यानंतर तरी त्याच्यावर राजकारण किंवा दुर्लक्ष न करता त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे, मयत धोंडीराम मंगा करवार (रा. बाभुळवंडी, ता. अकोले) यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. तर पोलिसांनी आरोपी विकास चंद्रकांत चोथवे (रा. राजूर. ता. अकोले) याला आरोपी केले असून फेटल म्हणजे एक शुल्लक गुन्हा दाखल केला आहे. मात्र खरा हा आरोपी नसून शंकर पाबळकर नामक व्यक्तीने हा अपघात केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, पोलिसांची दिशाभूल करुन वाहन चालक परवाना असणाऱ्या व्यक्तीला आरोपी दाखविण्यात आल्याचा घाट घातल्याचे समोर येऊ लागले आहे. मात्र, राजूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हे अशा प्रकारे अन्य व्यक्तीस आरोपी म्हणून स्विकारणार नाहीत. ते एक कडक व शिस्तप्रिय अधिकारी असून जो आरोपी आहे. त्यालाच बेड्या ठोकल्याशिवाय ते शांत राहणार नाहीत असे अनेकांना वाटते आहे. त्यामुळे, कोणी कितीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. तरी अकोले तालुक्यातील सुगाव बु येथे झालेल्या अपघाताप्रमाणे येथे असे काही होईल याची शंका फार कमी आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोमवार दि. 14 सप्टेंबर 2020 रोजी पोलीस पाटील धोंडीराम करवार हे राजूर येथे कामानिमित्त आले होते. हा अगदी सामान्य व प्रमाणिक माणूस त्यांचे काम अटोपल्यानंतर ते सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घराकडे निघाले होते. एका ठिकाणी पार्क केेलेली गाडी काडून त्याच्यासोबत असणारे ढवळा बहिरु लेंडे या व्यक्तीला बसवून त्यांनी अगदी काही मिटरवर त्यांची एम. एच 04 सीएक्स 6107 ही गाडी नेली. त्याच वेळी एका बेशीस्त वाहन चालक अकोल्याकडून भंडारदार्‍याकडे जात होता. माजी मंत्री मधुकर पिचड साहेबांच्या बंगल्यासमोरच असताना हा एम. एच 04 डीएस 9661 पिकअप वाला समोरून विरुद्ध दिशेने आला. पहिल्यांदा तो रस्त्याच्या एका बाजूने व्यवस्थित चालला होता मात्र, त्याने ही दुचाकी पाहिली आणि लगचे अगदी स्टेअरिंग दुचाकीच्या दिशेने फिरवून त्यांना उडवून दिले. त्यानंतर पुन्हा गाडी आपल्या बाजूने घेत पुन्हा समोरुन आलेली दुसरी गाडी उडणार नाही याची काळजी घेत त्याने गाडी चालवून तो पुन्हा पिचड साहेबांच्या बंगल्याशेजारुन राजूर गावात निघून गेला. हा संपुर्ण प्रकार माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या बंगल्याच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. साहेबांनी सहकार्य करीत तो व्हिडिओ पोलिसांना दिला असता घडला प्रकार समोर आला आहे.


आता हा व्हिडीओ पहिल्यानंतर कदाचित जर या प्रकरणाचा सखोल तपास झाला तर यात कलम 302 (खुनाचा गुन्हा) दाखल होऊ शकतो. कारण, खरोखर हा प्रकार एक संशयास्पद असून पोलिसांसाठी चौलेंजींग आहे. खरंतर लगेच कोणताही गुन्हा दाखल करावा अशी काही घाई नाही. मात्र, किमान सखोल तपास तरी व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे जर हा व्हिडिओ पाहिला तर एक आठवण जरुर होते की, हा वाहन चालक पुण्यातील अनेकांना उडवून देत जीव घेणार्‍या बस चालक लक्ष्मण माने याच्यासारखा विकृत प्रवृत्तीचा आहे का? त्याने मद्य वैगरे प्राषन केले आहे का? या गुन्हाची पार्श्वभूमी काय आहे? यांचा काही वैर आहे का? कि यामागे आणखी कोणाचा हात आहे. की याला गाडी चालवता येत नव्हती? याची सखोल चौकशी होणे अपेक्षीत आहे. तुर्तात जरी आपल्याला वाटले की, यापैकी काहीच नाही. तरी देखील मयत यांच्या नातेवाईकांनी राजूर पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्याकडे घडलेल्या प्रसंगाचे चित्रीकरण दाखविणे आवश्यक आहे. असे झाल्यास या गुन्ह्यात किमान कमल 304 (सदोष मनुष्य वध) हा गुन्हा नोंदविला जाऊ शकतो. त्यामुळे, त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणे आवश्यक आहे.

दरम्यान पोलिसांनी नियमानुसार पहिल्यांदा कलम 304 (अ), 279, 337, 338, 427 मो. व्हेइकल अ‍ॅक्ट 184 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व कलम कोणताही अपघात झाल्यानंतर लागतात. यात काही विशेष नाही. मात्र, जर घडलेला प्रकार सीसीटीव्हत स्पष्ट दिसतो आहे. ही हयगय नाही कर जाणिवपुर्वक घडविलेला प्रकार दिसतो आहे. तसेही अपघात झाल्यानंतर किमान मदत केली असती तरी कोेणतीही शंका आली नसती. मात्र, एकाला उडवून दुसरी गाडी उडणार नाही याची पुर्णत: काळजी घेतल्याचे दिसते आहे. तर तो घटनेनंतर तेथे न थांबता पळून गेला आहे. त्यामुळे, तर्क वितर्क लक्षात घेऊन या घटनेचा तपास व्हावा इतकीच मागणी अनेकांनी केली आहे. यात सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील हे संवेदनशील अधिकारी नक्कीच लक्ष घालतील असे मत राजुरच्या नागरिकांनी व्यक्त केले आहे. तर एक महत्वाचे म्हणजे. जर गाडीचा इन्शुरन्स असेल आणि वाहन चालकाकडे परवाना नसेल तरी मयताच्या कटुंबियांना इन्शुरन्सची कायदेशीर रक्कक मिळते. त्यामुळे, काही अपघातात चोर सोडून सन्याशाला फाशी देण्याचा जो घाट घातला जातो तो चूक आहे. या वाहन मालकाने पोलिसांच्या डोळ्यात धुळ फेकली आहे. तर ज्याच्याकडे लायसन आहे. त्याने नकळत बनावट गुन्ह्याला सपोर्ट केला आहे. असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे, यात पोलीस नेमकी काय भुमिका घेतात याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.