शंका घेऊन पतीने पत्नीला ठार मारले.! नवा संसार उधाळला, गुन्हा दाखल!
पत्नीचे पुण्यात काहीतरी गुटरगू सुरू असल्याची वर शंका घेत पतीने तिच्या डोक्यावर वार करुन तिला ठार मारल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेत पहिल्यांदा आकस्मात मृत्युची नोंद केली होती. मात्र, कालांतरांने कलम 174 नुसार तपासाअंती तो अकस्मात मृत्यू नसून ती हत्या असल्याचे समोर आला आहे. याप्रकरणी मयत मुलीचे पालक महेश जगन्नाथ ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्षा कृष्णा जाधव (वय 23, रा. टाकळीभान) असे मयत विवाहीतेचे नाव आहे. तर यात कृष्णा विठ्ठल जाधव (वय 31) यास आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वर्षा आणि कृष्णा यांचे सन 2016 च्या दरम्यान विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांचा गेली केली दिवस अतिशय चांगले चालला होता. आधून मधून किरकोळ वाद होत होता. मात्र, तो इतका टोकाला कधी गेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसानंतर त्यांच्यातील एकमेकांवरील विश्वास डळमळीत झाला आणि ते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत सुटले. त्यामुळे, शंकेचा किडा संसारात घुसल्यामुळे त्यांच्यातर रोज टोकाचे वाद होत होते. हा वाद दोन्ही कुटुंबांनी सोडविण्याचा प्रयत्न केला. एक सामंजस्य म्हणून काही लोकांनी त्यांच्यात मध्यस्ती देखील केली. मात्र, कृष्णाच्या डोक्यात जे काही खुळ भरलं होते. ते काही निघता निघत नव्हते. त्यामुळे तो तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत होता. अर्थातच त्यामुळे दोघांमधील वाद विकोप्याला गेले होते. तुझे पुण्यात काहीतरी गुटरगू सुरू आहे असे म्हणत त्याने वर्षाला विचारणा केली. मात्र, असे काही नाही म्हणत या पलिकडे काही उत्तर आले नाही. दरम्यान, कृष्णा याने आपल्या पत्नीच्या डोक्यात काहीतरी टणक वस्तू मारुन तिला जखमी केले होते. त्यानंतर तिला जास्त मार लागल्याने तिला नगरच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर मयत मुलीच्या पालकांनी आक्रमक पवित्रा घेतला. मयत मुलीचे शवविच्छेदन नगर किंवा औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात नको तर थेट पुण्यातील ससून रूग्णालयात करण्यावर ते ठाम राहीला. तोवर श्रीरामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. दरम्यान जेव्हा ससून येथील मेडिकल रिपोर्ट आले तेव्हा त्यात कॉज ऑफ डेथ ब्रेनमध्ये इंटरनल इंज्युरी असल्याचे सांगण्यात आले. मयत वर्षा जाधव हिच्या डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झालेला होता तर गळ्याला देखील मार लागलेला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर हा नैसर्गिक मृत्यू नसून पत्नीची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या घटनेप्रकरणी महेश ढवळे यांनी फिर्याद दिली असून यात कृष्णा जाधव याच्यावर 302 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक ख्ान करीत आहेत.
तर याच श्रीरामपूर येथे दुसरा खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. यात अन्वर सरदार पठाण (वय 59, रा. मिल्लतनगर, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी हा त्यांच्या मुलाग आहे. त्याने हातातील तलवारीने मला जीवे मारण्याच्या उद्देशाने माझ्यावर वार केला. त्यात अन्वर पठाण हे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी घेतलेल्या फिर्यादीनुसार अजीज उर्फ अज्जु अन्वर पठाण (वय 23, रा. मिल्लतनगर, श्रीरामपूर) याला आरोपी करण्यात आले आहे. त्यामुळे, बापाने लेकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.