अकोले बंदचा वाद उफाळला.! दुकाने चालु ठेवा पाहू कोण काय कारतय.! अकोल्यात पुन्हा 28 रूग्णांची भर, संगमनेरात 5 रूग्ण.!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यात आज दुपारी 28 रुग्णांची भर पडली आहे. तर संगमनेरात देखील पाच रूग्ण मिळून आले आहेत. तर अकोले तालुक्यात आता अकोले बंद करण्याहून मोठे दुमत निर्माण झालेल्याचा पहायला मिळत आहे. इतकेच काय! काहीही झाले तरी आम्ही दुकाने बंद करणार नाही. जे धनदांडगे आहेत त्यांची दुकाने महिनाभर बंद राहिली तरी त्यांना काही हरकत नाही. मात्र, ज्यांचे पोट हातावर आहे. ज्यांनी कर्ज काढून व्यावसाय सुरू केले आहेत. त्यांच्या भावना एकादा कोणीतरी तपासल्या पाहिजे. गेल्या सात महिन्यांपासून हाताला काम काही, दुकाने बंद आहेत, कर्जाचा डोंगर चढतोच आहे. त्यामुळे, ज्यांची दुकाने नाहीत त्यांनीच अकोले बंदचा बोभाटा सुरू केला आहे. तर सरकारी अधिकारी देखील स्वत:च्या डोक्याला झंजट नको म्हणून अशा बंदच्या बैठकींना हजेर्या लावतात. यापुर्वी जे मुुख्याधिकारी होते. त्यांनी अकोले बंदला थेट नकार देऊन लेखी पत्रक दिले होते. मात्र, आत्ताचे अधिकारी कानाखालचे असल्यासारखे वागतात आणि पदाधिकारी व लोकप्रतिनिधींच्या मांडीला मांडी लावून बसतात. खरंतर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारण, एकीकडे सरकार सर्व बाजारपेठा खुल्या करण्याचे आवाहन करतात, देशाची आर्थिक परिस्थिती उंचाविण्याचे काम करतात आणि शहरातील अधिकारी आपल्यावरील जबाबदारी झटकत शहर बंद कसे होईल याचा विचार करतात. त्यामुळे त्यांची देखील तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करणार असल्याची माहिती नाही व्यापार्यांनी दिली आहे. तर दुकाने चालु ठेवा पाहु कोण काय करतय अशी ठोस भूमिका बस स्टॅण्ट परिसरातील व्यापार्यांनी घेतली आहे. त्यामुळे उद्यापासून व्यापारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान आज अकोले तालुक्यात समशेरपूर येथे 14 वर्षीय तरुण, धामनगाव आवारी येथे 52 वर्षीय पुरूष, ढोकरी येथे 52 वर्षीय महिला, राधानगर कॉलनी अकोले येथे 34 व 33 वर्षीय पुरूष, नवलेवाडी अकोले येेथे 11 वर्षीय मुलागा व 32 वर्षीय महिला, शेरणखेल येथे 58 वर्षीय पुरूष, समशेरपूर येथे 20 वर्षीय तरुण, लिंगदेव येथे 48 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालक, 82 वर्षीय पुरूष, धामनगाव पाट येथे 19 वर्षीय मुलगा, पाडाळणे येथे 39 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगी, पिंपरकणे येथे 40 वर्षीय पुरूष, पाडाळणे येथे 36 वर्षीय महिला व 65 वर्षीय पुरूष, राजूर येथे 35 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुगली, पाडाळणे येथे 70 वर्षीय पुरूष, राजूर येथे 42 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक व 17 वर्षीय मुलगी, पाडाळणे येथे 20 वर्षीय तरूणी, राजूर येथे 54 वर्षीय पुरूष असे आज एकूण 28 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 856 वर गेली असून मयतांची संख्या 15 पर्यंत जाऊन पोहचली आहे. तर संगमनेर तालुक्यात पाच रूग्ण सापडले आहेत. तर संगमनेर तालुक्यात पाच रूग्ण सापडले आहेत. त्यात हिवरगाव पठार येथील 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून गुंजाळवाडीत 37 वर्षीय पुरुष, ढोलेवाडीत 48 वर्षीय पुरूष, घुलेवाडीत 75 वर्षीय महिला, कौठे बु येथे 62 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला अशा पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
ही आकडेवरी आता अशीच वाढती राहणार आहे. मात्र, याला भिवून व्यावहार ठप्प ठेवणे योग्य नाही. असे तालुक्यातील व्यावसायिकांना वाटते आहे. तर याबाबत अकोले तालुक्याचे आमदार राजूर गाव बंद ठेवल्यानंतर आवाज उठवितात आणि अकोले शहर बंद करण्याचा निर्णय त्यांना न विचारता घेतला जातो. हा खर्या अर्थाने अपमान आहे. त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी तालुका बंद न करता दुकाने उघडे ठेऊन काळजी घेण्याचे आवाहन केले पाहिजे असे छोट्या व्यापार्यांना वाटते आहे. शेजारी संगमनेरात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. तरी देखील तालुका बंद नाही. येथे मात्र, भल्याभल्यांचा सुरबुडा सुरू असल्याचे दिसते आहे. काही झाले तरी जो कोणी दुकान चालु ठेवणार्याला त्रास देइल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल अशी भूमिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे उद्यापासून व्यापारी नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
- शंकर संगारे