अकोल्यात 54 तर संगमनेरात 55 रुग्णांची भर.! स्वॅब व पॉझिटीव्हची सरासरी वाढली.!

सार्वभौम (संगमनेर) :- 

                      अकोले तालुक्यात आज नव्याने 54 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे तालुक्यातील संख्या आता 1 हजार 204 इतकी झाली आहे. तर संगमनेर तालुक्यात 2 हजार 665 रुग्णांची भर पडली आहे. तर अकोले तालुक्यात दिवसभरात 92 स्वॅब घेण्यात आले होते. त्यात 54 जण पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे, दोन्ही तालुक्यात स्वॅबच्या तुलनेत पॉझिटीव्हची सरासरी वाढती दिसून येत नाही. म्हणजे पुर्वी कोरोनाची जितकी भिती होती, तितकी आता लोकांना वाटत नाही. तर प्रशासन स्वॅब घेते आणि ते निगेटीव्ह येईल असे कोणाला वाटत नाही. त्यामुळे, कोरोनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बदलत चालला आहे. एकीकडे डॉक्टर लोक देखील पीपी किट घालताना दिसत नाही. तर बिलं मात्र भरमसाठ निघत आहे. तर दुसरीकडे स्वॅब घेणारे मास्क वगळता कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाही. त्यामुळे, कोरोना आजकाल संशोधनाचा विषय असल्याचे बोलले जात आहे.

 तर अकोले तालुक्यात आज कोतुळ येथे 26 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरूण, अबितखिंड येथे 50 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 21 वर्षीय तरुणी, 49 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष,  28 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय पुरुष, निब्रळ येथे 40 वर्षीय पुरुष,51 वर्षीय पुरुष, 66 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 22 वर्षीय तरुण, बाजारपेठ अकोले येथे 37 वर्षीय पुरुष, बेलापूर येथे 62 वर्षीय पुरुष, औरंगपूर येथे 69 वर्षीय पुरुष, सुगाव बु येथे 85 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, कोतुळ येथे 45 वर्षीय पुरुष, राजूर येथे 15 वर्षीय तरुणी, म्हाळदेवी येथे 19 वर्षीय तरुण, महालक्ष्मी रोड अकोले येथे 3 वर्षीय बालिका, नवलेवाडी येथे 56 वर्षीय पुरुष, निब्रळ येथे 57 वर्षीय पुरुष, बोरी येथे 29 वर्षीय पुरुष, कुभेफळ येथे 42 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुणी, अकोले येथे 38 वर्षीय पुरुष, राजूर येथे 63 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण, 15 वर्षीय तरुण, 56 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय तरुण, निळवंडे येथे 47 वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे 75 वर्षीय पुरुष, राजूर येथे 60 वर्षीय महिला, लहित येथे 74 वर्षीय महिला, राजूर येथे 57 वर्षीय पुरुष, राजूर पोलीस लाईन येथे 69 वर्षीय पुरुष, गर्दनी येथे 24 वर्षीय तरुण, कुंभेफळ येथे 60 वर्षीय दोन पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे 69 वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथे 49 वर्षीय पुरुष, निब्रळ येथे 22 वर्षीय तरुणी, 60 वर्षीय महिला, 16 वर्षीय तरुणी, 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, अकोले येथे 28 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, इंदोरी येथे 20 वर्षीय तरुणी, अकोलेत 61 वर्षीय महिला अशा 54 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 


 तर संगमनेर तालुक्यात झोले येथे 31 वर्षीय महिला, बोरबन येथे 33 वर्षीय पुरुष, धांदरफळ बु येथे 34 वर्षीय पुरुष, 16 वर्षीय बालक, चिंचपूर येथे 52, 38, 48, 34 वर्षीय पुरुष, रायतेवाडीत 70 वर्षीय महिला, निमज येथे 32 वर्षीय पुरुष, पेमगिरी येथे 22 वर्षीय तरुण, संगमनेर खुर्द येथे 52 वर्षीय महिला, तळेगाव दिघे येथे 78 वर्षीय पुरुष, वडगाव पान येथे 24 व 27 वर्षीय तरुण, 58 वर्षीय पुरुष, मालेगाव हवेली येथे 22 वर्षीय तरुणी, गुंजाळवाडीत 25 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 51 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय दोन महिला, 3 वर्षीय बालक, गुंजाळवाडीत 67 व 47 वर्षीय पुरुष, पावबाकी रोड येथे 50 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, 11 व 5 वर्षीय मुली, आश्वी खुर्द येथे 38 वर्षीय पुरुष, भारत नगर येथे 28 वर्षीय तरुणी, 32 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, मालदाड रोड येथे 11 वर्षीय बालक, शिवाजी नगर येथे 71 वर्षीय पुरुष, शेडगाव येथे 58, 60 वर्षीय पुरुष, वर्षीय महिला, सायखिंडीत 60 वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे 72 वर्षीय पुरुष, निमगाव भोजापूर येथे 55 वर्षीय पुरुष, सुकेवाडीत 51 वर्षीय पुरुष, कोल्हेवाडीत 32 वर्षीय पुरुष, कासारा दुमाला 29 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 48 वर्षीय पुरुष, महात्मा फुले येथे 33 वर्षीय महिला, घुलेवाडीत 67 वर्षीय पुरुष, देवकौठे येथे 39 वर्षीय महिला, निमगाव बु येथे 34 व 52 वर्षीय पुरुष, मंगळापूर येथे 58 वर्षीय पुरुष, खांडगाव येथे 28 वर्षीय तरुणी, गणेश नगर येथे 49 वर्षीय पुरुष, ओझर खु येथे 35 वर्षीय पुरुष, संगमनेरात 76 वर्षीय पुरुष, घुलेवाडीत 48 वर्षीय पुरुष अशा 55 रुग्णांची भर पडली आहे.