आटीआयचा कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात, 50 हजार मागितले व 30 हजार स्विकारले.!

सार्वभौम (कोपरगाव) :-

                       कोपरगाव तालुक्यातील औद्यागीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे एका निवृत्त स्टोअरकीपर यांच्याकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली. यातील 30 हजार रोख रक्कम स्वीकारताना विलास चिमाजी कुसाळकर (वय 52) यास नगरच्या लाचलुचपत विभागाने बेड्या ठोकल्या आहे. या बहाद्दराने निवृत्त कर्मचार्‍याला सांगितले होते की, मी तुमच्याकडून चार्ज घेतला तेव्हा स्टेआरमध्ये काही वस्तू कमी होत्या. त्यामुळे त्यांचा सातव्या वेतन आयोगानूसार मिळणारा लाभ त्याने रोखून धरला होता. त्याचे प्रकरण निकाली काढण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 50 हजार रुपयांची मागणी केली होती. त्यातील 30 हजार रुपये रोख स्वीकारताना आरोपी कुसाळकर याला बेड्या ठोकल्या आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक लाचलुचपत विभागाचे पोलीस अधिक्षक सुनिल कडासने यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी पोलीस दलातील एक मोठा मासा गळाला लावला होता. त्यानंतर भल्याभल्यांवर ट्रॅप होऊ शकतो असा विश्वास देखील जनतेत जागा झाला होता. त्यानंतर लागेच नगरच्या लाचलुचपत विभागाने ही चांगली कारवाई केली आहे. कारण, कोपरगाव तालुक्यातील औद्यागीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे ऑगस्ट 2018 मध्ये एक कर्मचारी रिटायर झाले होते. त्यांच्या  जाग्यावर विलास चिमाजी कुसाळकर हे हजर झाले होते. मात्र, या झोलर व्यक्तीने संबंधित निवृत्त व्यक्तीला सांगितले की, मी जेव्हा तुमच्याकडून स्टोअर रुमचा चार्ज घेतला तेव्हा त्यात लाखो रुपयांचे साहित्य कमी होते. तर काही वस्तू गहाळ झालेल्या होत्या. त्यामुळे, हेच कारण सांगून सेवानिवृत्तीनंतर नियमानुसार मिळणारे आर्थिक लाभ पेन्शन, सातवे वेतन आयोगाचा फरक रोखून धरण्यात आला. तर कुसाळकर याने तक्रारदारला सांगितले की, येथील गहाळ झालेल्या वस्तू खरेदी करुन 50 हजार रुपये दिले तर तुमचा चार्ज क्लेअर करुन देत तसा अहवाल वरिष्ठांना देतो. असे म्हणत 50 हजार रुपयांची लाच मागितली होती.

दरम्यान, याबाबत नगरच्या लाचलुचपत विभागात तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर 50 हजार रुपयांची तडजोड म्हणून 30 हजार रुपये पहिल्यांदा देण्याचे ठरले होते. ही रक्कम मंगळवार दि. 22 सप्टेबर रोजी पुणतांबा चौफुली येथे आनंद परमिट रुम समोर ठरलेल्या वेळेत देण्यात आली. दरम्यान जेव्हा ही डिल करण्यात आली असता तेथे लाचलुचपत विभागाने कुसाळकर हा दोषी असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर छापा टाकला व त्याला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. त्याने यापुर्वी अशा प्रकारची लाच मागितली आहे. का? त्याच्या बँक अकाऊंटमध्ये किती पैसा आहे अशी वेगवेगळ्या पद्धतीना चौकशी करत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. लाचलुचपत विभाग पुढील चौकशी करीत आहे.