अकोल्यात 20 वा बळी 38 पॉझिटीव्ह.! तहसिलदारांनी घेतला अत्यंत महत्वाचा निर्णय..!
सार्वभौम (अकोले) :-
आता अकोले तालुक्यात 38 रुग्णांची भर पडली आहे. तर काल मुळ औरंगपूर व सध्या इंदोरी येथे राहणार्या 44 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यु झाल्याची माहिती हाती आली आहे. रॅपीड अॅन्टीजन टेस्टनुसार 34 तर खाजगी रुग्णालयातून चार अशा 37 जणांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर तालुक्याची संख्या 1 हजार 278 इतकी झाली आहे. तर राजूर, अकोले शहर, कोतुळ यांसारखी मोठी गावे आज कोरोनाने बाधीत झाले आहेत. तर आज एक महत्वाची गोष्ट म्हणजे उद्या दुपारी 12 वाजता तहसिलदार मुकेश कांबळे यांनी एक सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. यात ते तालुक्यात सध्या कोविडची काय परिस्थिती सुरू आहे त्याचा वृत्तांत सर्वांसमोर मांडणार आहे. तालुक्यात अनेक नेत्यांनी तसेच माध्यमांनी आणि सोशल मीडियातून नको-नको तशा अफवा पसरविल्या आहेत. त्यावरील पडदा उठविण्यासाठी कांबळे यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. खरंतर अन्य तालुक्यांच्या तुलनेत मुकेश कांबळे यांनी जी तालुक्याची परिस्थिती हताळली आहे. त्यावर जर कोणी अक्षेप घेत असेल तर तो त्या व्यक्तीचा मुर्खपणा असेल. कारण, चारही बाजुंनी कोरोना आ वासून उभा असताना मधेच अकोले तालुका अजूनही अटोक्यात आहे. हे त्यांचे व आरोग्य खात्याचे डॉ. इंद्रजित गंभिरे, डॉ. शामकांत शेटे यांच्यासारख्या अनेकांच्या कामाचे फलित नाहीतर काय आहे. त्यामुळे, उद्या प्रश्न आणि उत्तर यांत चांगलीच चर्चा रंगणार असल्याचे वाटते आहे.
आज अकोले तालुक्यात कळस येथे 42 वर्षीय महिला व 52 वर्षीय पुरुष, नवलेवाडीत 59 वर्षीय पुरुष, अकोल्यात 56 वर्षीय पुरुष, राजूर येथे 18 वर्षीय बालक, 21 वर्षीय तरुणी, 42 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय पुरुष, पिंपळगाव निपाणी येथे 65 वर्षीय महिला, गणोरे येथे 38 वर्षीय पुरुष, तर पिंपळगाव निपाणीत 60 वर्षीय महिला, कोतुळ येथे 50 वर्षीय महिला, सुगाव बु येथे 55 वर्षीय पुरुष, अकोल्यात 56 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, रुंभोडीत 45 वर्षीय पुरुष, निब्रळ येथे 55 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, 31 व 30 वर्षीय पुरुष, कुंभेफळ येथे 25 वर्षीय तरुणी, अकोल्यात 21 वर्षीय तरुणी, 29 वर्षीय तरुण, 25 वर्षीय तरुणी, 13 व 10 वर्षीय मुलगी, कोतुळ येथे 50 व 48 वर्षीय पुरुष, 16 व 20 वर्षीय बालिक, 45 वर्षीय महिला, 12 वर्षीय मुलगी, 7 वर्षीय बालक, 28 वर्षीय तरुणी, 60 वर्षीय महिला अशा एकूण 38 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, उद्या होणारी ही बैठक तालुक्याच्या हितासाठी एक वेगळे वळण देऊन जाणारी ठरणार आहे. काय गरजेचे आहे हे लोकांनी सांगण्यापेक्षा स्वत: प्रशासन यावर भाष्य करणार आहे. तर अनेक पक्षांचे महाशय एकाच ठिकाणी येणार असल्यामुळे शक्यतो तालुक्याला अधिक चांगली सुविधा मिळण्याची शक्यता आहे. तर या बैठकीला काही निवडक व्यक्ती असणार असून गल्लीबोळात असणार्या पदाधिकार्यांनी तेथे गर्दी करण्याची फारशी घाई करणे चुकीचे ठरणार आहे. त्यामुळे, उद्या खर्या अर्थाने तालुक्याला जी गरज होती. त्यावर विचार मंथन होणार असल्यामुळे तालुक्यात जे राजकीय वातावरण गढूळ झाले आहे. त्यापेक्षा मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचे नागरिकांनी एक समाधान व्यक्त केले आहे.
तर एकीकडे असे गैरसमज आणि भिती परसल्यामुळे जो कोणी व्यक्ती बाधित होतो. तो भितीपोटी आजारी पडत आहे ती कोणी पळून जात आहे. आज असाच एक 29 वर्षीय तरुण खानापूर येथील कोविड सेंटरमधून पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तर गेल्या पंधरा दिवसांपुर्वी विठे येथील एक वृद्ध व्यक्ती अकोल्यातून पळाला आणि अखेर उपचारा आभावी त्यांचा मृत्यू झाला होता. या घटनांसाठी समाजातील लोकांनी जागरुकता करण्यासाठी पुढाकार घेणे अपेक्षीत आहे. तर यापुर्वी नितीन नाईकवाडी, संदिप शेणकर हे तरुण बाधित व्यक्तींना मोठा धिर देण्याचे काम करत होते. मात्र, जसे कारखाना रोडवरील सावट दुर झाले तसे त्यांनी मुळ शहराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते आहे. मात्र, या दोन व्यक्तींनी काय शहराचा मक्ता घेतलेला नाही. भलेभले लोकप्रतिनिधी लपून बसले असून प्रत्येक प्रभागानिहाय समुपदेशन उपक्रम सुरू करणे गरजेचे आहे.