माथेफिरू गुंजाळचा आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला, क्षणात नागरिकांनी खताळांभोवती चक्रव्यूह केले, आरोपी पोलिसांच्या ताब्यात.!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे संगमनेर फेस्टिव्हल या सार्वजनीक कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना आज गुरुवार दि.28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 7:40 दरम्यान घडली. यामध्ये खांडगाव येथील तरूण प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ या तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असुन एका ऑफीस मध्ये डांबून ठेवले. तेथे हजारो तरुण कार्यकर्ते जमल्याने या तरुणाला ऑफीसच्या बाहेर काढण्यात आले नाही. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली. तेव्हा आमदार अमोल खताळ हे घटनास्थळी आले. त्यानंतर जमावाला शांत करण्याचे आव्हान यावेळी आ. अमोल खताळ यांनी केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिक-पुणे हायवेवर मालपाणी लॉन्स आहे. तेथे राजस्थान युवक मित्र मंडळाचा संगमनेर फेस्टिवल आयोजीत केले आहे. तेथे मनोरंजनाचा सुंदर असा कार्यक्रम आयोजीत केला होता. या फेस्टिवलच्या उद्घाटनप्रसंगी आ. अमोल खताळ हे कार्यक्रमस्थळी आले होते. त्यांनी या कार्यक्रमाचे उदघाट्न केले. कार्यक्रम संपुन ते लोकांना हात मिळवुन पुढील कार्यक्रमाला चाले होते. त्यावेळी खांडगाव येथील तरुण प्रसाद गुंजाळ हा शेकडो लोकांमधून पळत आला आणि थेट आ. अमोल खताळ यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी आमदार अमोल खताळ यांना सुरक्षारक्षक असणाऱ्या पोलिसाने त्याला तात्काळ पकडले. आणि ताब्यात घेतले तो पर्यंत तरुणांमध्ये रोष निर्माण झाला होता.
दरम्यान, या नाटकातून प्रसाद गुंजाळ या तरुणाला ताब्यात घेण्यात आले. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. म्हणुन या तरुणाला मालपाणी लॉन्स येथील ऑफीस मध्ये डांबण्यात आले. त्यावेळी काही आमदार समर्थक ऑफीस बाहेर ठाण मांडुन होते. घटनास्थळी काहीकाळ तणावपूर्ण वातावरण पाहिला मिळाले. शेकडो पोलीस घटनास्थळी आले तरी देखील गर्दी शांत होईना. त्यानंतर आ. अमोल खताळ हे घटनास्थळी आले. त्यांनी सर्व कार्यकर्त्यांना शांत बसण्याचे आव्हान केले. त्यानंतर सर्व जमावाला बाहेर काढण्यात आले. यावेळी संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमला तर शहरासह ग्रामीण भागांतून हजारो कार्यकर्ते घटनास्थळी धावत आले. सोशल मीडियावर सर्वत्र निषेधाचे पोस्ट करण्यात आल्या. तर चंदनापुरी येथे आ. खताळ यांच्या समर्थकांकडुन रस्त्यावर टायर जाळण्यात आले.
दरम्यान महायुतीचे आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला. असून हल्लेखोरांवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीसांना दिल्या असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. घटनेची माहीती मिळताच मंत्री विखे पाटील यांनी आ.अमोल खताळ यांच्याशी संपर्क साधून त्यांची चौकशी केली. अतिरीक्त पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांनाही त्यांनी हल्लेखोराच्या तपासाचे आदेश दिले. माध्यमांशी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की, ज्यांना लोकशाही मान्य होत नाही त्यांना ठोकशाहीच मान्य असते. असे हल्ले करून महायुतीच्या कार्यकर्त्याचा आत्मविश्वास कमी करण्याचा कोणी कितीही प्रयत्न करीत असतील तर त्यांना त्यामध्ये यश येणार नाही. महायुतीचे कार्यकर्ते त्याच पध्दतीने उतर देतील.
याचा आका कोण आहे शोधा.!
माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी कुठल्याही प्रकारचा कायदा हातात घेऊ नका. या मागचा "आका" कोण आहे. याचा आपण शोध घेऊ. पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. बाहेरचे देखील या घटनेत शिरकाव केला असेल. त्यांना देखील वेळीच ओळखा. ते या घटनेचा गैरफायदा घेऊन भांडवल करू शकतात. सर्व कार्यकर्त्यांनी गडबड गोंधळ न करता बाहेर या पोलीसांना त्यांचे काम करुद्या.
-आमदार अमोल खताळ
(संगमनेर विधानसभा मतदारसंघ)
मी जाहिर निषेध करतो आ. सत्यजित तांबे
संगमनेर येथे माझे सहकारी, आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा प्रयत्नाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो.! प्रतिनिधी वर कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे! पोलीस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने सखोल आणि निपक्ष चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे ही अपेक्षा, अशी प्रतिक्रिया आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली.