संगमनेरात ३९ तर अकोल्यात ३५ रुग्ण.! बंदला ख्वाडा, कंगणा प्रमाणे धमक्यांचा फंडा सुरु.!
सार्वभौम (अकोले/संगमनेर) :-
अकोले तालुक्यात आज ३३ रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे, आज काही नव्या गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे समोर आले आहे. तर वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी अकोले बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मात्र हा बंद मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सोपडला आहे. यात एक गोष्ट भयानाक दृष्ट्या समोर आली आहे. ती अशी की, प्रशासनाने काही दुकानदारांना अक्षरश: ब्लॅकमेल केल्याची धक्कादायक माहिती काही दुकानदारांनी सांगितली आहे. की, जे दुकानदार उद्याच्या बंदमध्ये सहभाग घेणार नाही, त्यांची यापुर्वी चित्रफित काढली आहे. की, ज्यांनी ७ वाजण्याच्या आत दुकाने बंद केली नव्हती त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा घाट घातला आहे. म्हणजे हा प्रकार तर कंगणा राणावर सारखा झाला. जर तुमच्या मताशी सहमत असाल तर तुमच्यावर कारवाई नाही आणि विरोधात गेलात तर तुमच्यावर कारवाई म्हणजे सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याचा घाट प्रशासनाने घालता आहे की काय ? असा प्रश्न व्यावसायिकांनी उपस्थित केला आहे. तर प्रशासनाच्या आडून जे कोणी दलाली करण्याचा प्रयत्न करीत आहे, एव्हाना धमकी देत आहेत त्यांच्या नाकावर टिचून काही व्यावसायिक दुकाने सुरु ठेवणार आहे. विशेष म्हणजे सरकार देऊळे सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे, शाळा सुरु ठेवण्यासाठी नियोजन करीत आहे. तर दुसरीकडे अकोल्यातील काही मुठभर लोकांनी अकोले बंदचा घाट घालण्याचा प्रयत्न केला आहे. तो आम्ही मोडीत काढणार असल्याच्या प्रतिक्रिया काही व्यावसायिकांनी दिल्या आहेत. काहीही झाले तरी कोणाचीही धिटाई आम्ही सहन करणार नाही. गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही अशी खमकी भुमिका काही व्यावयायिकांनी घेतली आहे. त्यामुळे, सोमवार ते रविवार असा बंदचा निर्णय कोणकोण पाळणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संगमनेर तालुक्यात आज ३९ रुग्णांची भर पडली त्यात पद्मनगर येथे ६३ वर्षीय पुरुष भरीतकर मळा येथे ४५ वर्षीय पुरुष मालदाड रोड येथे ३४ वर्षीय पुरुष घुलेवाडी येथे १७ वर्षीय २ मुलं १५ वर्षीय मुलगा अश्वि खुर्द येथे ५५ वर्षीय महिला चिकणी येथे ६५ वर्षीय महिला साकुर येथे ४२ वर्षीय पुरुष चंदनापुरी येथे १६ वर्षीय मुलगा गणेशनगर येथे ३० वर्षीय महिला अश्वि बु. येथे २८ वर्षीय तरुण घुलेवाडी येथे ६१ वर्षीय पुरुष सावतामाळी नगर ५५ वर्षीय पुरुष ढोलेवाडी येथे ६८ व ४० वर्षीय महिला , २५ व २१ वर्षीय तरुण गिरीराज विहार कॉलनी ३२ वर्षीय महिला ६ वर्षीय मुलगा पोखरी हवेली येथे ५० वर्षीय महिला देवकौठें येथे ६५ वर्षीय महिला हिवरगाव पावसा येथे ४८ वर्षीय महिला ५० वर्षीय पुरुष गुंजाळवाडी येथे ६२ वर्षीयपुरुष घुलेवाडी येथे ५५ वर्षीय पुरुष रेहमत नगर येथे ४५ वर्षीय पुरुष विद्यानगर येथे ६१ व ६८ वर्षीय पुरुष आणि ५२ वर्षीय महिला जोर्वे येथे ४१ वर्षीय पुरुष भरीतकर मळा येथे ५८ वर्षीय पुरुष ओझर खु. येथे ५५ वर्षीय महिला गणेशनगर येथे ५७ वर्षीय महिला अशा ३० जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत तर दुपारी पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. तर संगमनेर तालुक्यात पाच रूग्ण सापडले आहेत. त्यात हिवरगाव पठार येथील 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून गुंजाळवाडीत 37 वर्षीय पुरुष, ढोलेवाडीत 48 वर्षीय पुरूष, घुलेवाडीत 75 वर्षीय महिला, कौठे बु येथे 62 वर्षीय पुरुष व 55 वर्षीय महिला अशा पाच जणांना कोरोनाची बाधा झाली आहे
दरम्यान आज अकोले तालुक्यातील आंभोळ येथे राहणारा ७० वर्षीय व्यक्ती अहमदनगर येथे उपचार घेत असताना मयत झाला आहे. तसेच समशेरपूरात 14 वर्षीय तरुण, धामनगाव आवारी येथे 52 वर्षीय पुरूष, ढोकरी येथे 52 वर्षीय महिला, राधानगर कॉलनी अकोले येथे 34 व 33 वर्षीय पुरूष, नवलेवाडी अकोले येेथे 11 वर्षीय मुलागा व 32 वर्षीय महिला, शेरणखेल येथे 58 वर्षीय पुरूष, समशेरपूर येथे 20 वर्षीय तरुण, लिंगदेव येथे 48 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालक, 82 वर्षीय पुरूष, धामनगाव पाट येथे 19 वर्षीय मुलगा, पाडाळणे येथे 39 वर्षीय पुरूष, 34 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगी, पिंपरकणे येथे 40 वर्षीय पुरूष, पाडाळणे येथे 36 वर्षीय महिला व 65 वर्षीय पुरूष, राजूर येथे 35 वर्षीय महिला, 11 वर्षीय मुगली, पाडाळणे येथे 70 वर्षीय पुरूष, राजूर येथे 42 वर्षीय महिला, 9 वर्षीय बालक व 17 वर्षीय मुलगी, पाडाळणे येथे 20 वर्षीय तरूणी, राजूर येथे 54 वर्षीय पुरूष असे आज एकूण 28 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या 856 वर गेली असून मयतांची संख्या 15 पर्यंत जाऊन पोहचली आहे. तर अकोल्यात रात्री उशिरा चार अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात पिंपळदरी येथे २९ वर्षीय पुरुष व राजूर येथे ४३ वर्षीय पुुुरुष अशा दोघांचे रिपोर्ट कोरोना बाधित आले आहेत.
आमच्यासारख्या अनेक छोट्या व्यावसायिकांनी कर्ज घेऊन व्यवसाय सुरू केले आहेत. त्याचे व्याज बंद नाही, दुकानाचे गाळे भाड्याने आहेत. ते भाडे बंद नाहीत, दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे. आतापर्यंत करोना संबंधित काळजी घेऊनच व्यवसाय सुरू होता मग आता अचानक काय झाले? या बंदमध्ये मोठ्या धनदांडग्या लोकांना काही फरक पडणार नाही. मात्र, हातावरच्या रोजनदारीच्या लोकांचा पोट पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यामुळे, काहीही झाले तरी आम्ही बंद वैगरे पाळणार नाही. दुकाने सुरु ठेवणार आहे.
- विशाल देशमुख (कृषि व्यावसायिक)
अहमदनगर जिल्हा रुग्णालयातून आज तब्बल ७०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २५ हजार ४३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.७५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल शुक्रवारी सायंकाळी सहा वाजलेपासून तर आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ५०१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४११६ इतकी झाली आहे. तर जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये १०९, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १८४ आणि अँटीजेन चाचणीत २०८ रुग्ण बाधीत आढळले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४०, संगमनेर १०, नगर ग्रामीण ०३, श्रीरामपूर ०१, कॅंटोन्मेंट ०५, नेवासा ०१, श्रीगोंदा ०१, पारनेर ०१, अकोले २१, राहुरी १९, शेवगाव ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १८४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. त्यामध्ये, मनपा ३९, संगमनेर १२, राहाता १८, पाथर्डी ०३, नगर ग्रामीण १०, श्रीरामपुर ३१, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०९, श्रीगोंदा ०१, पारनेर ०६,अकोले ०८, राहुरी २४, कोपरगांव ०४, जामखेड ०८ आणि कर्जत ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज २०८ जण बाधित आढळून आले. यामध्ये, मनपा ३३, संगमनेर १०, राहाता ४२, पाथर्डी १७, श्रीरामपूर ०५, श्रीगोंदा २०, पारनेर ०९, अकोले २८, राहुरी ०२, शेवगाव ०१, कोपरगाव ०७, जामखेड १३ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज ७०६ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २०२, संगमनेर ७१, राहाता ६०, पाथर्डी ४३, नगर ग्रा.३५, श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट १४, नेवासा ४४, श्रीगोंदा २७, पारनेर २६, अकोले ४२, राहुरी ३०, शेवगाव ११, कोपरगाव ३९, जामखेड १९ कर्जत १७ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे. तर बरे झालेली रुग्ण संख्या २५ हजार ४३७ इतकी असून उपचार सुरू असलेले रूग्ण संख्या ४ हजार ११६ इतकी आहे. तर ४६२ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकूण रूग्ण संख्या आता ३० हजार ०९५ इतकी झाली आहे.