संगमनेरात चंदनापुरी व साकुरसह तालुक्यात ३६ रुग्ण तर अकोल्यात ४२ रुग्णांचा उच्चांक.!
सार्वभौम (संगमनेर) :-
अकोले तालुक्यात व संगमनेर येथे कोरोनाचे रुग्ण आता दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसते आहे. येेथे रोज नवे रूग्ण मिळून येत आहेत. तर संपर्कात आलेल्यांची संख्या मात्र, मोठी होत चालली आहे. यावर उपाय म्हणून प्रशासनाने काहीतरी उपायोजना करणे गरजेचे आहे. तर वैयक्तीक प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. अकोले शहरात कोरोनाची बाधा झालेल्या संखेने आज उच्चांक गाठला आहे. तर काही ठिकाणी उद्रेख वाढत चालला आहे. आता कारखाना रोडवर रुग्ण कमी झाले आहे. मात्र, त्याने संपुर्ण शहर रगेट केले आहे. तर आता प्रशासनाने वेगळा फंडा सुरु केला आहे. आता प्रत्येक पीएससीमध्ये कोरोना तपासण्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे आज तपासणी वाढविल्याने रुग्ण वाढले आहे. त्यामुळे, देवठाण, धुमाळवाडी, कोतुळ, म्हाळदेवी व खानापूर पीएससी अंतर्गत आज काही टेस्ट घेण्यात आल्या आहेत. तेथे 41 जण बाधित मिळून आले आहेत. तर आज रात्री आंबड येथे ऱुग्ण मिळून आला आहे.
यात आज रेडे येथे 55 व 32 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय पुरुष सात वर्षाची बालिका, 55 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय तरुण तर अवघ्या 12 वर्षाची बालिका यांचा सामावेश आहे. तर नवलेवाडी येथे 25 वर्षीय तरुण, धुमाळवाडी येथे 54 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 50 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे 27 वर्षीय तरुणी, 40 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला तर अवघ्या पाच वर्षाचा बालक, 21 वर्षीय तरुणी, 45 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय तरुण, 26 वर्षीय पुरुष, खानापूर येथे 53 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनीत 28 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 15 वर्षीय बालक व 17 वर्षीय तरुणी, आंभोळ येथे 35 वर्षीय पुरुष, तर ब्राम्हणवाडा येथे 8 व पाच वर्षाची बालिका तर 45, 85 व 45 वर्षीय महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 55, 80, 55, 35 वर्षीय पुरूष तसेच 23, 26 व 23 वर्षीय तरुणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर जामगाव येथे 44 वर्षीय पुरुष, हानुमान मंदिराजवळ अकोले येथे 49 वर्षीय पुरुष त कोतुळ येथे 66 वर्षीय पुरुष, तर सर्वात महत्वाचे म्हणजे आंबड येथे आज नव्याने कोरोनाचा रुग्ण मिळून आला आहे. त्यामुळे, आंबड परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा रुग्ण स्थानिक प्रशासनाकडून नव्हे तर थेट खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. तर आज त्यांचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. त्यामुळे तालुक्यात आता आज एकाच दिवसात 42 जणांना कोरोनाची बाधा झाली असून हा सर्वात मोठा उच्चांक कोरोनाने गाठला आहे.
संगमनेर मध्ये एका पाठोपाठ एक कोरोनाचा धक्का बसतच आहे.आज पुन्हा नव्याने ३६ रुग्ण आढळुन आले आहे. काल शहरात एकही रुग्ण आढळुन आला नव्हता. परंतु आज शहरात ७रुग्ण आढळुन आले आहे. शहरात सुतार गल्ली येथे ५७वर्षीय पुरुष तर अभिनवनगर येथे २५ वर्षीय व५४वर्षीय महिला आणि ५६वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर मार्केटयार्ड येथे २२वर्षीय महिला व साळीवाडा येथे ४२वर्षीय महिला व जनतानगर येथे ५७वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज तालुक्यात २९रुग्ण आढळुन आले आहे. त्यात चंदनापुरी येथे एकटा गावात आज ११रुग्ण आढळुन आले आहे. यामध्ये ६महिला तर ५पुरुषांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर राजापूर येथे ४५वर्षीय २४वर्षीय आणि ४८वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. तर संगमनेर खुर्द येथे ३०वर्षीय पुरुष व कोल्हेवाडी येथे ४५वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे. साकुर येथे २५वर्षीय व५०वर्षीय महिलेला आणि५६वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे.कुरकुटवाडी येथे ६२वर्षीय महिला तर आश्विबु येथे २५वर्षीय पुरुष व पिंपळगाव कोंझीरा येथे ५५वर्षीय पुरुष तर रहीमपूर ४८वर्षीय व५४वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. तर औरंगपुर येथे ५५वर्षीय महिला व वडगाव पान येथे ६१वर्षीय पुरुषाला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे शहरासह तालुक्यातील एकुण कोरोनाबधितांची संख्या १हजार ४३१वर जाऊन पोहचली आहे.