आपल्या खासदारास कोरोनाची बाधा.! तर अकोले शहरात कोरोनाचे थैमान.! आज पुन्हा 41 रुग्णांची भर.!

 

सार्वभौम (अकोले) :- अकोले तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आता दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसते आहे. येेथे रोज नवे रूग्ण मिळून येत आहेत. मात्र, नवा एरिया बाधित होण्याचे प्रमाण फार कमी आहे. तर संपर्कात आलेल्यांची संख्या मात्र, रग्गड होत चालली आहे. यावर उपाय म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. अकोले शहराला कारखाना रोडच्या माध्यमातून कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर तेथील उद्रेख वाढत गेला आणि कालांतराने तेथे रुग्ण कमी देखील झाले. मात्र, आता कोरोना आणखी थोडा खाली सरकला आणि त्याने महालक्ष्मी कॉलनी टारगेट केली. आता एकाच कुटुंबावर अतिरेख करीत त्याने एकाचा जीव देखील घेतला. तरी देखील त्याचे मन शांत झाले नाही. तर आज धुमाळवाडी, म्हाळदेवी व खानापूर पीएससी अंतर्गत आज काही टेस्ट घेण्यात आल्या आहेत. तेथे 41 जण बाधित मिळून आले आहेत. तर कोतुळ आणि ब्राम्हणवाडा येथे देखील काही संशयितांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत.

यात आज रेडे येथे 55 व 32 वर्षीय महिला, 34 वर्षीय पुरुष, 27 वर्षीय पुरुष सात वर्षाची बालिका, 55 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय तरुण तर अवघ्या 12 वर्षाची बालिका यांचा सामावेश आहे. तर नवलेवाडी येथे 25 वर्षीय तरुण, धुमाळवाडी येथे 54 वर्षीय पुरुष, देवठाण येथे 50 वर्षीय पुरुष, धुमाळवाडी येथे 27 वर्षीय तरुणी, 40 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, 33 वर्षीय महिला तर अवघ्या पाच वर्षाचा बालक, 21 वर्षीय तरुणी, 45 वर्षीय पुरुष, 14 वर्षीय तरुण, 26 वर्षीय पुरुष, खानापूर येथे 53 वर्षीय पुरुष, महालक्ष्मी कॉलनीत 28 वर्षीय पुरुष, धुमाळवाडीत 15 वर्षीय बालक व 17 वर्षीय तरुणी, आंभोळ येथे 35 वर्षीय पुरुष, तर ब्राम्हणवाडा येथे 8 व पाच वर्षाची बालिका तर 45, 85 व 45 वर्षीय महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 55, 80, 55, 35 वर्षीय पुरूष तसेच 23, 26 व 23 वर्षीय तरुणांना कोरोनाची बाधा झाली आहे.  तर जामगाव येथे 44 वर्षीय पुरुष, हानुमान मंदिराजवळ अकोले येथे 49 वर्षीय पुरुष त कोतुळ येथे 66 वर्षीय पुरुष अशा 41 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. 


दरम्यान आता गणेश उत्सव सुरू आहे. त्यामुळे, प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे. आपल्यामुळे कोणाला बाधा होऊ नये किंवा आपल्या भावनांवर थोडे विरजण घालून प्रशासनाच्या नियमांचे पालन केले पाहिजे. काही लोक आरत्या घेण्यासाठी, प्रसाद वाटप करण्यासाठी, तसेच स्नेहभाव म्हणून एकमेकांच्या संपर्कात येत आहेत. त्यामुळे हा प्रादुर्भाव वाढण्यास मदत होऊ लागली आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, नागपूरचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी तपसाणी केली खरी मात्र, त्यांना कोणत्याही प्रकारचे सिमटन्स आढळून येत नव्हते. मात्र, त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, आपण ठणठणीत आहोत आणि त्याला काय होते? असे म्हणून आपल्या पायाला बांधलेली भिंगरी काढून ठेवा. शक्यतो गर्दीत जाऊ नका, मास्कचा वापर करा, हाताला सॅनिटायझर लावा असे झाले तरच अकोल्यातील कोरोना हद्दपार होऊ शकतो. अन्यथा येणार्‍या काळात त्याचा अतिरेख आपल्याला पहायला मिळेल यात शंकाच नाही.                       

दरम्यान तालुक्यात एका दु:खद घटना अशी पहायला मिळत आहे. की, आरोग्य विभाग यांची प्रचंड ताणाताण होताना दिसत आहे. आरोग्य सेवकांचा हालगर्जीपणा आजकाल समोर येऊ लागला आहे. त्याला कारणही तसेच आहे. की, त्यांना वेळोवेळी मास्कचा पुरवठा नाही, हॅण्डग्लोज नाही, पीपी किट नाही म्हणजे बहुतांशी प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध होत नाही अशी माहिती प्रत्यक्ष काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी दिली आहे. तर प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, काही वस्तु आहेत, काही नाहीत, मात्र, आता तालुक्यांसाठी पैसे आले आहेत. त्यातून वस्तू मागविल्या जाणार आहेत. आता ही झाली प्रशासनाची बाजू. मात्र, तालुक्यात भलेभले अधिकारी व नेते असून देखील ते केवळ बोलण्यातच पटाईत आहेत की काय? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. येथे वेळप्रसंगी सामाजिक संघटना पुढे यायला तयार नाही. कोणी सामाजिक भावनेतून मदत करायला तयार नाही. मात्र, विरगाव येथील रावसाहेब वाकचौरे यांनी तहसिल कार्यालय व खानापूर कोविड सेंटर येथे 10 ते 12 हजारांचे दोन सॅनिटायझर मशिन दिले आहे. असे सामाजिक भान असणारी मानसे मदत करतात मात्र, या कानाची खबर त्या कानाला लागत नाही. परंतु पोपट नेत्यांचा सुळसुळाट पहायचा असेल तर एखादे स्टेज उभे करा आणि मग बघा सामाजिक विषयावर आणि चळवळीवर बोलणारे महारथी किती उर ताणून बोलताना दिसतील. परंतु जेव्हा देण्याघेण्याचा प्रश्न उभा राहिला की अशा नेत्यांच्या तुटवडा दिसून येतो. ही मानसिकता कोठेतरी थांबली पाहिजे.

खासदारांना कोरोनाची बाधा.!

नगर जिल्ह्यातील उत्तरेतील शिर्डीचे खासदार यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर घरात एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांची पत्नी व मुलाचा देखील अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे, त्यांच्या संपर्कात असणार्‍यांमध्ये एकच खळबळ उडली आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी खासदार महोदय यांनी एका कोविड सेंटरला भेट दिली होती. त्यानंतर ते फारसे बाहेर कोठे दिसून आले नाही. त्यांना त्रास होऊ लागला असता ते स्वत:हून घरी थांबले होते. त्यामुळे, त्यांच्यामुळे बाहेर कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याच्या शक्यता फार कमी असल्याचे बोलले जात आहे. मात्र, त्यांच्यावर आता उपचार सुरू करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या सानिध्यात जे कोणी आले होते. त्यांनी स्वत:हून होमक्वारंटाईन होऊन घ्यावे आणि त्रास होत असेल तर तपासणी करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.