नगरच्या पोलीस दलाचा सन्मान, अ‍ॅड. विनोद चव्हाण यांच्यासह अनेकजण वेगवेगळ्या पदाने सन्मानित.!


सार्वभौम (अहमदनगर) :- मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊनी फक्त लढ म्हणा.! हे कुसुमाग्रजांचे वाक्य ऐकल्यानंतर भेल्याभल्यांना प्रेरणा मिळते. तशीच काहीशी प्रेरणा घेऊन खाकीचा अभिमान उंचावणार्‍या अधिकारी कर्मचार्‍यांना सरकारने प्रेरणा देण्यासाठी आणि त्यांच्या पंखात बळ भरण्यासाठी कर्तव्यदक्ष आणि कोविड योद्ध्यांचा सन्मान केला आहे. यात काही अधिकार्‍यांनी अगदी शुन्यातून आभाळाला गवसणी घातली आहे. तर काहींच्या आयुष्यावर भोल्याभल्या कादंबर्‍या व्हाव्यात अशा नेत्रदिपक कामगिर्‍या या अधिकार्‍यांनी केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कर्तुवाचा गवगवा झालाच पाहिजे. म्हणून पोलीस दलातील सन्मानीत आणि ज्यांचा सन्मान झाला नाही त्या सर्व खाक्या वर्दीला रोखठोक सार्वभौम सलाम करीत आहे.

यात पहिली याशोगाथा म्हणजे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील डोंगरगण गावचे रहिवासी व सध्या स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विनोद दिलीप चव्हाण. या कर्तव्यदक्ष अधिकार्‍यास भारत सरकार गृहमंत्रालय नवी दिल्ली यांच्यावतीने दिले जाणारे आंतरिक सुरक्षा सेवा पदक हे यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांचे हस्ते देण्यात आले. आज 73 व्या स्वातंत्र्य दिन यवतमाळ येथे हा सोहळा पार पडला. याप्रसंगी यवतमाळचे जिल्हाधिकारी एमडी सिंह जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी सलग दोन वर्ष जम्मू काश्मीर माओवादी वर्चस्व असलेले जिल्हे तसेच पूर्वेकडील राज्य यातील कठीण व खडतर अशा ठिकाणी नोकरी केल्यानंतर तेथे हे दिलेल्या या सेवेत दरम्यान अत्युच्च कामगिरी करणार्‍या पोलीस अधिकारी कर्मचारी यांना  आंतरिक सुरक्षा पदके भारतातील पोलीस दलाला पदक देण्यात येते. सपोनी अ‍ॅड. विनोद चव्हाण पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून 2010 मध्ये निवडले गेले होते. त्यांनी नाशिक येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची नेमणूक महाराष्ट्रातील नक्षलवादी चळवळीचा  प्रभाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्रथमच केली गेली होती. सन 2011 ते 2014 यामध्ये त्यांनी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या विरुद्ध कार्यरत असलेले कमांडो 60 या पथकाचे नेतृत्व करून त्याठिकाणी सलग तीन वर्ष अशीच कामगिरी केली. त्यांच्या या कामगिरीमुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने त्यांना यापूर्वी सन 2016 साली कठीण व खडतर सेवा पदक हे मिळालेले आहे. अ‍ॅड. विनोद चव्हाण यांनी त्यानंतर 2014 ते 2019 दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील नगर तालुका पोलीस ठाणे ,भिंगार पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, कोतवाली पोलिस ठाणे येथे प्रभारी अधिकारी म्हणून नोकरी केलेली आहे. तर त्यांनी एलएलबी, एलएलएम, पत्रकारीती डिग्री (डिजे), एमबीए अशा अनेक पदव्या हस्तगत केल्या आहेत. त्यांच्या सौभाग्यवती न्यायाधिश पदावर रुढ असून हे एक आदर्श कुटुब आहे. चव्हाण हे जून 2019 पासून ते यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा याठिकाणी कार्यरत आहेत. त्यांना मिळालेले पदकाबाबत त्यांचे नातेवाईक व आष्टी तालुक्यातील त्यांचे मित्र परिवार यांनी अभिनंदन केले आहे.

तर श्रीगोंद्याचे सुपुत्र व अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक हरीश दत्तात्रय खेडकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने देण्यात येणारे राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. खेडकर हे श्रीगोंदा येथील रहिवासी असून, त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण श्रीगोंदा येथे झाले आहे. रयत शिक्षण संस्थेच्या महादजी शिंदे विद्यालयात त्यांनी माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथे झाले. त्यांनी आपल्या सेवा कालावधीत अनेक खुनाचे आणि दरोड्याचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांना आतापर्यंत 431 बक्षिसे 45 प्रशस्तीपत्रके मिळाली आहेत. त्यांनी नागपूर, जालना, पुणे, सातारा, बुलढाणा, ठाणे, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यात 28 वर्ष सेवा केली आहे. 

तर डॉ. शिवाजी पवार (एसीपी पुणे), पोलीस उपाधिक्षक नारायण शिरगावकर (बारामती), पोलीस उपाधिक्षक अनिल घेरडीकर (कर्जत) पोलीस निरीक्षक तर राज्य पोलीस दलात उल्लेखनिय कामगिरी केलेले अकोल्याच्या मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत जन्मलेले पोलीस निरीक्षक सुर्यकांत बांगर यांना देखील राष्ट्रपती पदक मिळाले आहे. बांगर यांनी रायगड, रत्नागिरी, ठाणे, बुलढाणा, धारावी, मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करुन आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविला आहे. बांगरे यांनी 400 पेक्षा जास्त गुन्ह्यांचा तपास लावला आहे. त्यामुळे त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक सतिष शिरसाठ कोतवाली पोलीस ठाणे यांना देखील अंतरीक सुरक्षा पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच सहा. फौजदार रऊफ शेख, मन्सुर सय्यद (एलसीबी नगर), अनिल गाडेकर (सिटी ट्राफीक, नगर), राजेंद्र सुपेकर (डीएसबी, नगर) रविंद्र कुलकर्णी (भिंगार कॅम्प पोलीस ठाणे), काशिनाथ खराटे (जिवीशाखा), मधुकर शिंदे (एलसीबी), शैलेश उपासणी (जिवीशा), कैलास सोनार (कोतवाली), अजित पटारे (राहाता), सतिष शिरसाठ (कोतवाली), राहिदास गुंडाळ (कोतवाली) नगरचे रहिवासी सुहास सुरेश आव्हाड (पाईपलाईन हाडको),  पोलीस हेड्रकॉन्स्टेबल अर्जुन बडे (पोलीस उपाधिक्षक नगर कार्यालय) अशा कर्तव्यदक्ष खाकीचा शासनाने सन्मान केला आहे. तर घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश लोेंढे व शहर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बाळासाहेब यादव यांना प्रशासनाने कोविड योद्धा म्हणून सन्मानित केले आहे. 

- सागर शिंदे