भंडारदरा तांत्रिकदृष्ट्या भरले.! पाणी निळवंड्यात, अकोले तालुक्यात साचले 23.43 टिएमसी पाणी तर 108,480 हेक्टर जमीन संगमापर्यंत ओलीताखाली.!
- सागर शिंदे
भंडारदरा (प्रतिनिधी) :- गेल्या दोन दिवसांत अकोले तालुक्यातील भंडारदरा व निळवंडे ही दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाला आहे. गेले 20 दिवस पावसाने तालुक्यात पाठ फिरविली होती. आधुनमधून श्रावणसरी, आणि रिपरीप यामुळे धरणात थोंब-थेंब साचून तो 80 टक्के भरला होता. मात्र, दोन दिवसापासून रतनवाडी व घाटघर या पाणलोट क्षेत्रात पावसाने थैमान घातले आहे. तब्बल 83 मिलिमीटर पाऊस झाला. त्यामुळे भंडारदरा तांत्रिकदृष्ट्या भरुनही हजारो क्युसेस पाण्याची आवाक रोज वाढली आहे. त्यामुळे येणारे पाणी सरळ खाली सोडण्यात आले आहे. तर निळवंडे पाणलोट क्षेत्रात टिटवीच्या ओढ्यातून व क्रुष्णावंती नदीतून मोठी आवक होत आहे. तरी सध्या भंडारदार्यातून 3 हजार 268 क्युसेस ने पाणी सोडण्यात आले आहे. तर ते केवळ निळवंडे धरणापर्यंत असून खाली प्रवरा नदीत 750 क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा या महिन्याच्या ३१ तारखेनंतर ओव्हरफुल होतो. तोवर त्याचा खाली विसर्ग केला जातो. गेल्या वर्षी भंडारदरा 2 ऑगस्टला भरला होता. मात्र, यावर्षी पानलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्यामुळे तो भरणार्यासाठी 16 ऑगस्ट उजडला आहे. तर गेल्या वर्षी यावेळी भंडरदर्यातून 34 हजार क्युसेसने पाणी खाली सोडण्यात आले होते. यावर्षी पावसाने अक्षरश: वाट पहायला लवली आहे. तर आदिवासी भागात आवणी धोक्यात आली होती. मात्र, आठवड्याभरातील पावसाने शेत हिरवाईने नटले आहे.
भंडारदरा आणि निळवंडे तसेच अन्य बंधार्यांची किंम्मत आज येथील काही लोकांना नसेल. मात्र, त्यापासून तालुका कसा नटला आहे. यासाठी रोखठोक सार्वभौमचा हा स्पेशल रिपोर्ट पाहिल्यानंतर अनेकांचे डोळे उघडे होतील. कारण, विदर्भात नजर पुरणार नाही. इतक्या दूर-दूर ओसाड जमिनी आहेत. का? हे तुम्हाला नव्याने सांगायला नको. हीच परिस्थिती अकोल्यासह संगमनेर, लोणी राहाता, कोपरगाव व नेवासा या तालुक्यांमध्ये असती. परंतु, नशिब येथील शेतकर्यांचे की, तब्बल 20.76 टिएमसी पाणी एकट्या अकोले तालुक्यात पावसाच्या पाण्यामुळे 91 हजार 251 हेक्टर शेती ओलीताखाली येते आहे. हे पाटपाण्याचे काम माजी मंत्री मधुकर पिचड यांनी केलेे आहे. तर याच बळावर उत्तर नगर जिल्ह्याने हरित क्रांतीचे धडे गिरविले आहेत. हे अगदी सगळेत मान्य करतात. आज राज्यात अ.नगर आणि त्यात अकोले तालुका क्षेत्रफळाच्या दृष्टीने (1,505.08) सर्वात मोठे आहे. त्यात डोंगर दर्या, गडकोट किल्ले आणि नदी नाले यांचे अमाप आणि अप्रतिम सैंदर्य आहे. त्याचा फायदा घेत येथे 12 लघुपाठबंधारे आणि 11 कोल्हापुर पॅटर्न प्रमाणे बंधारे शासनाने केले आहेत. तर, भंडारदार्याचे संगोपन आणि निळवंडे धरणाच्या रुपाने येथे आमृताचे साठे निर्माण झाले आहेत.तर आढळासह तालुक्यात 23.43 टिएमसी पाण्याचा साठा आहे. त्यातून निव्वळ बंधार्यांचा विचार केला. तर, 17 हजार 229 हेक्टर जमीन ओलीताखाली आलेली आहे. हीच अकडेवारी भंडारदरा, निळवंडे व आढळा धरणाची मिळून घेतली. तर, 108,480 हेक्टर जमीन संगमापर्यंत ओलीताखाली येते.
तर लघुपाठ बंधारे मार्फत बोरी-बदगी, पाडोशी, सांगवी, घोटी शिळवंडी, अंबीत, कोथळे, शिरपुंजे, बलठण, टिटवी, वाकी, पिंपळगाव खांड या धरणांची कामे झाली आहेत. आज मितीस तालुक्यातील छोटे-मोठे पाणीसाठी सर्व भरले आहेत. या सर्व बंधार्यांमध्ये 2 हजार 269.8 दशलक्ष घनफुट म्हणजे 2.2698 टिएमसी पाणी साचते. त्यामुळे, अकोले तालुक्यात या परिसरातील 13 हजार 29 हेक्टर शेती ओलीताखाली येते. तर खडकी, शिसवद, साकीरवाडी, पैठण, पाडाळणे, धामनगाव पाट, पिंपळगाव खांब, लिंगदेव, लहित, चास व पिंपळदरी असे 11 कोल्हापुरी कॅनॉल बांधले. त्यात 403.23 दसलक्ष घनफुट पाणी साचते. तर शासनाच्या सर्वेक्षणानुसार 3 हजार 940 हेक्टर जमीनी या पाण्यामुळे ओलीताखाली येेतात. या व्यतिरिक्त भंडारदरा, निळवंडे व आढळा यांच्यात 20.76 टिएमसी पाणि साचते. त्या पाण्यात सरासरी 20 हजार हेक्टर शेती आलीताखाली येते. त्यामुळे तालुक्यातील 23.43 टिएमसी पाण्यावर 27 हजार 229 हेक्टर जामीन पाण्याखाली. येते.
जर कदाचित या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर अशा पद्धतीने केला नसता तर आज अकोले तालुक्याची परिस्थिती नंदुरबार आणि गडचिरोली व पालघर तालुक्यातील आदिवासी समाजासारखी असती. तर हे फार दुरचे उदा. आहे. साधे संगमनेर तालुक्यात पठारावर नजर टाकली तर भरमसाठी दर्या खार्या आणि नदी नेले. पण आजही येथे हजारो एकर काळीभोर जमीन असून देखील येथील शेतकरी भुकेलेला आहे. येथील बहुजन समाज पाण्यावाचून तडफडतो आहे. येथील आदीवासी समाज उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वनवन करताना दिसतो. त्यामुळे, निसर्ग आणि शरद पवार, अजित पवार आणि मधुकर पिचड यांचे पाण्याबाबात या तालुक्यावर फार उपकार आहे. म्हणून तर शेतीला मुबलक पाणी मिळल्याने येथे जोड व्यावसाय म्हणून दुध उत्पादन सुरु झाले. शेळी, जनावरे, कुकुट पालन असे अनेक व्यावसाय पुढे आले. त्यामुळे अल्पभूधारक का होईना. पण, तो सदन शेतकरी म्हणून ओळखाला जात आहे. इतकेच काय! या पाणीसाठ्यांमुळे तालुक्यात घाटघर प्रकल्प, भंडारदरा, निळवंडे हायड्रो प्रोजेक्ट यांची निर्मिती झाली. दरम्यान आज भंडारदारा तांत्रीकदृष्ट्या भरला आहे. आज धरणाच्या पाणीपातळी जलाशय परिचलन सुचिनुसार धरणात 10,336 दलघफू पाणीसाठी ठेवण्यात आला आहे. तर जी अतिरिक्त आवक झाली होती. त्यापैकी सकाळी 6 वाजता सांडव्याद्वारे 2 हजार 436 क्युसेक्स व विद्युतगृहाद्वारे 832 क्युसेक्स असा एकुण 3 हजार 268 क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला आहे. तर आज दि. 16 ऑगस्ट 2020 रोजी धरणाची पाणी पातळी 743.920 मीटर व पाणीसाठा 10,336 दलघफू आहे.
धरणांची सांड नाही, जुने व्हिडिओ वायरल! |
गेल्या दोन दिवसात पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे आज तांत्रीकदृष्ट्या धरण भरले आहे. 31 ऑगस्ट रोजी धरण पुर्णत: अंशी भरले जाईल. त्यामुळे, जी पाणलोट क्षेत्रातून आवक होत आहे. ती खाली निळवंडे धरणात सोडण्यात आली आहे. तर प्रवरेत 750 क्युसेक्सने पाणी खाली सोडले आहे. त्यामुळे जी नदिकाठची गावे आहेत त्यांनी सतर्क रहावे, कोणी नदिपात्रात उतरु नये, शेतीची अवजारे व संसाधणे पाण्यात किंवा नदिकाठी असतील ती काढून घ्यावीत. पाण्याच्या माहितीबाबत कोणी अफवा पसरवू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी योग्य माहिती प्रसारीत करण्यात येईल. त्यामुळे, प्रत्येकाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे.
- अभिजीत देशमुख
(सहा.कार्यकारी अभियंता,भंडारदारा)
------------------------------------------------------------
84 लाख वाचकाच्या रोखठोक सार्वभौम या पोर्टलवर आपल्या व्यावसायाची जाहिरात देण्यासाठी संपर्क साधा : अकोले 8888782010, 8208533006, संगमनेर : 8308139547, राजूर 9011223312, अकोले: 9373239144
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 380 दिवसात 600 लेखांचे 82 लाख वाचक)